संपादकीय संस्थेचं तर अवमूल्यन इतकं झालं की किती उत्पन्न मिळवून देणं हाच निकष ग्राह्य धरुन बहुसंख्य निवासी/कार्यकारी /संपादकपदाचा लिलाव होऊ लागला . त्याच्या हाताखालीलही बहुसंख्य पत्रकारांची एखाद्या पोलिस स्टेशन सारखी ‘बोली’ लागू लागली लिहिता संपादक दुर्मिळ झाला आणि ‘व्यवस्थापकीय संपादक’ अशी नवी जमात उदयाला आली . हे अगदी सरसकट नाही पण , मोठ्या प्रमाणावर घडलं , नक्कीच घडलं , हे मात्र खरं . उचलेगिरी करणारे भुरटे संपादक झाले , ही मजल पुढे अग्रलेख मागे घेण्याच्या नीचांकाइतकी घसरली . पण , जे घडलं ते व्यवस्थापनाला म्हणजे मालकांना हवं तसं घडलं आणि त्याचा घनघोर फायदा व्यवस्थापकीय यंत्रणेनं उचलला ; इतका मोठ्या प्रमाणात उचलला की पत्रकारितेची मूल्य आणि विश्वासाहर्तेची लक्तरं निघाली . पण त्या विषयावर नंतर पुन्हा केव्हा तरी .
बर्दापूरकर सर,
अभिनंदन आणि धन्यवाद
“पब्लिक ऑडिट” च्या मधतामातून तुम्ही झणझणीत चपराक दिली. खरोखरच असे व्हायलाच पाहिजे.
सत्य परिस्थिती मांडली आहे सर
हे होणे गरजेचे आहे
अगदी समर्पक आणि वास्तववादी विश्लेषण. या निमित्ताने disaster management विषयही संस्थांनी हाताळून गंगाजळी निर्माण केली पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीत किमान एक वर्ष तरी कामगारांना पोसेल एवढी क्षमता मालकांची आहे. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये ही म्हण आता कालबाह्य झाली पाहिजे.. कारण पोशिंदा लाखांच्याच मुळावर उठला आहे.
प्रवीणजी, नेहमीप्रमाणेच परखड, वस्तुस्थिती आधारित, पत्रकारांच्या संघटनेला एकतेच्या बळाची प्रेरणा देणारं व सर्वांच्या डोळ्यात एकाचवेळी एका बोटाने झणझणीत अंजन घालणारा लेख… नमन व प्रणाम