स्वर्गलोकातही कोरोना

मंगेश सपकाळ , मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया)

“देवा, देवा दार उघड देवा…. “
“काय झालं मरायला”
“देवा ते ….”
“अरे ये, लांब राहा. दोन मीटर लांब राहा पहिले” 
“देवा, परमेश्वरा, करुणाकरा…. “
“कुठेय .. कुठेय …. अरे तुझ्या आयचा कोरोना… घाबरवू नको ना बायपास झालाय रे” 
“नाही नाही, अरे करुणाकरा म्हटलं” 
“ते जाऊ दे, कशाला झक मारायला आलास इथं”

“अरे काय करून ठेवलंयस, किती तो विध्वंस.. आवर देवा आवर”
“ते आम्ही नाही, त्या साल्या हरामखोर…. “
“देवा, भाषा देवा, भाषा”
“आय मिन ते अल्लाने नाहीतर त्या जिजसने चालू केला असेल… आम्ही काय येडे आहोत का रे”

तेवढ्यात फोनची रिंग वाजते, …..

…. टीनिनिक टिनिनक फुस्स, टीनिनिक टिनिनक फुस्स….

“देवा ही रे कुठली रिंगटोन” 
“अरे महादेवाचा कॉल… तू जरा थांब… “
———–

“हॅलो, इंद्र स्पिकींग…. हा महादेव बोला” 
“अरे माझा नाग सापडेना झालाय… पाहिलास का कुठे” 
“महादेवा, कालच्या मिटिंग मध्ये एक ठराव पास झालाय… की”
“ते ठीक आहे, पण नाग सापडेना झालाय”
“नाही, तेच सांगतोय. कोरोना जाईपर्यंत नाग, साप, वाघ, सिंह, उंदीर, डुक्कर, हत्ती…. अगदी शेषनाग देखील सगळं स्वर्गाबाहेरच्या टेकडीवर सेल्फ आयसोलेशनमध्ये राहतील”
“अरे काय फालतुगिरी आहे ही… मी पाळत नाही असले नियम. उगाच तांडव करायला लावू नको”

“माफ करा, पण नियम म्हणजे नियम. उगाच पोलिसांना बोलवायची वेळ येऊ देऊ नका, महादेवा” 
“अरे….. , आप तो बुरा मान गये…. त्याचं काय आहे की, गणेशाने नुसता बाजार उठवलाय रे, त्याचा उंदीर नाहीये तर… “
“तसदीबद्दल क्षमा, पण सध्या काळजी घेणं गरजेचं आहे. माँ दुर्गाजींच्या वाघाचा ‘कोरोना रिजल्ट’ पॉजिटीव्ह आल्यापासून नियम कडक केलेत” 
“असं होय…. सो सॅड. मी फेसबुकवर दिलगिरी व्यक्त करतो …. “
(मागून, भोकाड पसरलेल्या आवाजात, “पप्पा माझा मिकी माऊस…. ऊं “…. )

“ऐकलंत इंद्रा, हे असं आहे सकाळपासून. ‘गणेश बाळा, इंद्र काका काय म्हणाले, का बोलावू पोलिसांना ? अगं पार्वती, अगं थोडा मळ असेल तर गणेशाला एक उंदीर बनवून देतेस का ? 
(मागून आवाज, “हां, म्हंजे तुम्ही परत त्याच्याशी युद्ध करा आणि त्याचं मुंडकं उडवा.. हेच हवंय तुला” …. “अगं सॉरी म्हटलं ना तुला. आता का जुनं उकरून काढतेस ? ) 
“ये बडी इंद्रा, ते वॅक्सीनचं बघ ना बाबा लवकर…. धिस ‘वर्क फ्रॉम होम, शीट मॅन… आत्महत्या करणार आहे लवकरच …. चलो बाय”

—————–

“देवा, काय रे हे, इथे तर पृथ्वीहून हालत वाईट आहे रे” 
“अरे मग काय,. दिवसरात्र वैताग आहे नुसता… त्याच्या आयच्या त्या चिंक्यांच्या… “
“देवा, अरे त्यांनी काय केलं, ते स्वतः बेजार आहेत रे” 
“ही बातमी वाच, कालच व्हॅट्सऍपवर आलेय. म्हणजे खरीच असणार ना. कोणी का म्हणून व्हॅट्सऍपवर खोटं बोलेल. टेल ना टेल टेल”

तेवढ्यात बाहेर हल्ला-गुल्ला

“इंद्र कुठाय, कुठाय इंद्र तो” 
“अरे रामचंद्रा, लक्ष्मणा… काय, झालं काय”
“काय झालं, लाज वाटते का विचारायला ? तुम्ही हनुमानाला १४ दिवस आयसोलेशनसाठी द्रोणागिरीवर ठेवलाय. हाऊ डेअर यु, ब्लडी… “
“लँग्वेज देवा, प्लिज, आय रिक्वेस्ट. हौस म्हणून ठेवला नाहीये. बाहेरून आता कोणीही आलं तरी त्याला आता १४ दिवस आयसोलेशनमध्ये राहावंच लागेल”
“डॅमिट… “
“आणि आम्ही त्याला आधीच सांगितलेलं, इकडे तिकडे उडू नको, पण हा आयोद्धेतच जा, श्रीलंकेतच जा…. म्हणतो, “थांब मी श्रीलंका जाळून आलो”… कितीवेळा सांगितलं की रावण मेलाय, तो देश पण आता वेगळा झालाय.. पण ह्याला कळलं तर नशीब. शेवटी माक…..ड ! ” 
“इंद्रा …. इंद्रा ….. इंद्रा ….. 
“दादा, हळू…. अरे मान लचकेल. आधीच सीता वहिनी नाही घरी, त्यात लव-कुश…… ते सीरिअल पाहणं कमी करना जरा” 
“ओह….. इंद्रा, अबनी जबान को लगाम दे….. हे नाय चॉल बे, नाय चॉल बे… चल लक्ष्मणा, लेट्स गो.. रामायण पाहायची वेळ झाली.”

—————–

“पाहिलंस ना, हे सगळं असं आहे… काय सांगू तुला. दोन मिनिट शांतता नाही” 
“पण देवा, तू त्या कोरोनाला आवर का घालत नाहीस” 
“अरे ते काय, भक्तांना चुतिया बनवण्याएवढं सोपं आहे का ? अरे त्याला वेळ लागतो. आमची पूर्ण टीम कामाला लागलेय. प्रजापती, अश्विनी-कुमार, धन्वंतरी, महर्षी दधीची…. सगळे रात्रंदिवस झटतायेत”
“अरे पण काही…. “

तेवढ्यात रिंग वाजते,

… पप्पी दे पप्पी दे प्पपी दे पप्पी दे पारुला…

“हाय जानु… कशी आहेस माझी उर्वशी”
“आम्ही नॉय बोलणॉर. तुम्ही म्हटला होता ना काल येणार आणि आपण ऐरावतावरून फिरायला जाणार म्हणून… “
“अगं, समजून घे… हत्ती बाहेर आयसोलेशनमध्ये आहे गं. आणि संचारबंदी चालू आहे. समजून घे” 
“खोटारडे कुठले” 
“अगं नाही गं माझी बर्फी. मला नाही का वाटत तुला भेटायला यावं. अगं दोन टीश्शु बॉक्स संपलेत गं तुझ्या आठवणीत. हे जरा संपू दे. बाँडेज ट्राय करू” 
“इश्श… यु नॉटी, कुत्ता”
“भौ भौ…. बाय लव यु”

“अहंमम अहंम….”
“हुश्श. साला या कोरोना काळात गर्लफ्रेंड टिकवणं किती अवघड आहे, नाही. जरा लक्ष नाही दिलं कि हातातून सुटलीच म्हणून समज. ह्या चिंक्यांच्या आयच्या” 
“पण….”
“त्यात सगळ्या प्राण्यांना आयसोलेशन मध्ये ठेवल्यापासुन देवांत पण थोडी नाराजगी आहे”
“पण ती काय, गाय.. ती तर आहे Allowed…. तिला नाही ठेवलं” 
“नाही ना. एकतर दत्त तुला माहीतच आहे… भडकला की कुत्रे सोडतो अंगावर. गाई इथेच राहील, या एका शब्दावर तो शांत राहिलाय. आणि बाकी आमची आयुर्वेदाची टीम आहे, त्यांना पण गाईची मदत होते”
“अच्छा.. ते गोमूत्र… वगैरे त्यासाठी ना”
“नाही नाही. दुध द्यायला. रात्रंदिवस काम म्हणजे चहा आला ,,, मग म्हटलं एक अक्खी गाईच ठेवा. सकाळी तिला चहापत्ती आणि थोडा ऊस खायला घातला कि, तासाभरात चहा तय्यार, पहिल्या धारेचा. तू घेणार ?”
“नाही, नको…. पण ते गोमूत्र…” 
“छे रे…. ते गोमूत्र वगैरे, चुतिया बनवायचे धंदे लोकांना. माझा सपोर्ट नाहीये. पण विरोध केला तर लोकं लगेच इलेक्शनच्या वेळी लफडं करतात रे… म्हणून नकोच विरोध”

तेवढ्यात, एक रॅली जाते….

“माझा सपोर्ट कमळालाच… ‘कमळ हाच एकमेव ध्यास’… ‘कमळ खिलेगा, कमळ फुलेगा’… ‘शाकाहारी असणे, हि काळाची गरज’. ‘वाहन पण प्लांट-बेस्ड हवं’. तरंच या विश्वाचं रक्षण होईल…. चल रे कमळा टुणूक टुणूक… “

“देवा, हे काय होतं काय. हा कोण दाढीवाला माणूस ?”
“पाहिलंस, हे असं आहे. म्हाताऱ्याला फेफरं चढतंय. ब्रह्मदेव आहेत ते. बेणं कमीचं नाहीये. प्रचार करत सुटलंय.”

“बाप रे… एकंदर इकडची परिस्थिती अवघड दिसतेय. पण कोरोना इकडे कसा आला ?”
“हे तुमच्या पृथ्वीवरच्या भक्तांमुळे… “
“ते कसं काय… “
“आता ते धावा घेतात देवाचा, मग देवांना जावं लागतंय. आता ते लोक मास्क पण घालेनात आणि अंतरही पाळेनात. आले कि पडले पायात. मग काय करायचं ?”
“अरेरे अरेरे” 
“म्ह्णून आम्ही लवकरच ‘बॉर्डर रिस्ट्रिक्शन’ टाकणार आहोत”
“ते म्हणजे ?”
“उद्यापासून पुढचे सहा महिने कम्प्लिट लॉकडाऊन. आमचा एकही देव खाली जाणार नाही.” 
“मग भक्त रे …. ? त्यांचं काय …. ते रामभरोसे ? ” 
“हो… आम्ही वाचलो तर त्यांचं बघु. पहिले आमचा विठोबा, मग त्यांचा पोटोबा”

“तू पण निघ आता… चल निघ… निघ इथून… चल …. चल पळ” 
“देवा…. देवा ….. दे….वा ….. दे ……. ….. “

(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा अभ्यासपूर्ण व परखड वेध घेतात)

Previous articleप्रसारमाध्यमांवरील ‘कोरोना इफेक्ट’
Next articleरात्र महाभयंकर वैऱ्याची आहे ,  आपण गंभीर कधी होणार ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.