लग्नाळूंचा बाजार

डॉ अनुभूती मेटकर पाटील

चान ,टोपण नाव ,आज मुळीच उत्सुक नव्हता कुठे जाण्यासाठी. आई सतत मागे लागली होती, “अरे ! जा रे बाज़ाराला जा रे!”. मात्र त्याला काहीच उत्साह  नव्हता वाटत. गेले काही आठवड़े तो हेच काम करीत होता.आज तो जवळपास चाळीशीला आला होता आणि आता तर मनाने खचत चालला होता.आपल्याला जीवनसंगिनी मिळेल ही आशाच त्याने सोडली होती. अजूनही एकाही मुलीने त्याला होकार दिलेला नव्हता. “आई पुढल्या रविवारी जातो न !”, तो म्हणतो,  “नाही रे बाळा, आज होईल काहीतरी चांगले , आशा ठेव!”  आई म्हणते.

जवळपास सार्वत्रिक होतेय है चित्र आज चीन मधील शांघाई शहरात .

गेले काही वर्षांपासून तिथे एक आगळावेगळा बाजार भरतोय. दर रविवारी .पिपल्स पार्क मध्ये.  तरुण मुले मुली दर रविवारी येतात,  काही ‘चोखंद निवडघ्यायला, तर काही आपले नशीब आजमावायला. काही तर जवळपास 0 पर्यंत अविवाहित असतात आणि इथे आपले जमेल या आशेने येतात. त्यांच्या जवळ आपापले बॉयोडाटा असतात. कधीकधी आपापल्या आईवडीलांसोबत असतात मुले मुली. मुले जास्त अन मुली कमी. लग्नाची बोलणी पण तिथेच करतात.कोणीच मध्यस्थ नाही की मैरिज ब्यूरो नाही. मुलाला मुलीला घरी नेण्याआधीची सगळी बोलणी तिथेच होतात. रीती भाती आणि पुढील सोपस्कार त्यानंतर! आपापल्या घरी बोलावून. आता बीजिंग मध्ये झोंगशन पार्क मध्ये हाच बाजार blind date corner नावाने भरतोय.आता शनिवारी देखील भरायला लागलाय, हा मेळावा. गरजच तशी वाढतेय.

 साधारणतः २००५ मध्ये अशा लग्नाच्या बाजाराची कल्पना तिथल्या एकाला बागेत मॉर्निंग वॉक करताना जमलेल्या लोकांच्या गप्पान्तुन सुचली. आपापली दुःखे ती माणसे बोलत होती.सर्वांनी सकाळी मुलांना बोलावले, ओळख पाळख करून मग एकमेकांना सूचवायला सुरुवात केली. पण काम होईल ते कसले? . नवीन काळातील ती मुले.त्यांना choices आणि varities हव्यात.मग आली लग्न बाजाराची प्रत्यक्ष सुरुवात .पाऊस असो की उन्हें. छत्री घेवून आपापला बॉयोडाटा ( वय ,शिक्षण ,संपत्ती, गाड्या, संस्कार ? ,अपेक्षा अगदी चीनी राशी भविष्य पण) घेवून ही मुले अन ाही मुली सकाळी या बगिच्यात बसतात. सर्व चौकशी करतात.पालक ही असतात आणि जमले तसे, जमतेवढे ‘ जस्ट’ करून आयुष्याची नवीन सुरुवात करू पाहतात. काही शिक्षित मुले आपल्या पालकांना इथे जावू देत नाहीत, तरी पालकच जातात, पारंपारिक कुटुंब आणि सुना जावई शोधायला.  (आपल्याकडे हेच काम एखादे लग्न लागूनगेल्यावर सुलग्न लावणे ते लग्नातील जेवण या काळात अनुभवी वडीलधारी मंडळी करतात, कळत नकळत लग्नाळू मुले –मुली पण हे काम करतात) .पारंपारिक चीनी समाजामध्ये मुलीचे लग्न २७ वर्षाच्या आतव्हायला हवे असते, नाहीतर तिला shengnu म्हणजे उरलेली स्त्री म्हणतात.

चीन मध्ये एक मुल नीती आल्यापासुन हे असे होवू शकते,याचे काही लोकांनी भाकित देखील केले होते. साधारणतः १९७९  पासून तिथे लोकसंख्येला आळा घालण्या्या दृष्टीने तेथील कम्युनिस्ट सरकारने one child norm  ( एकच मुल कायदा ) लागू केला होता.जवळपास बंधनकारक . तेथील सरकारी अधिकारी दुसरे मुल होण्यात असेल तर त्या जोडप्याला गर्भपाताला उद्युक्त करीत असत, किंवा खुप मोठा दंड ठोठावत असत . चीन मध्ये काही आपल्यासारखा गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा नाही. तेथील  शहरी लोक , शेतकरी ,खेड़यातील जनता मग एकच मुल ठेवायचे तर तो मुलगाच ,या भावनेने मुलगेच जन्माला घालायचे. मुलींची संख्या इतक्या वर्षात तिथे फारच कमी झालीय ( १००  मुलींच्या तुलनेत ११५ मुले) हे घडले ,ते ह्या ‘compulsary सोबतच्या optional ‘ भागामुळे. आता सध्या २०१५ पासून चीनने तो कायदा मागे घेतलाय.

  आज चीनच्या आर्थिक सामाजिक आणि औद्योगिक धोरणामुळे प्रत्येकाच्या हाताला काम आहे, सगळी मुले कमावती देखील आहेत.प्रचंड मेहनती आहेत .चीनच्या जनतेच्या IQ तसाही जागतिक average पेक्षा जास्त (१०५) आहे(  भारतात तो ८० ते ९० आहे, उप सहारा अफ्रिकेच्या लोकांसारखा). त्यामुळे चौकस बुध्दिवंत चोखंदळपणा आलाच. मग काय प्रत्येक मुलगी राणी, अन प्रत्येक हुशार, सुंदर आणि श्रीमंत मुलगा राजा. अशा selective choices मध्ये मध्यम श्रेणीतील आणि निम्न श्रेणीतील मुलांना हवी ती काय, एखादी तरी लग्नाला मुलगीच मिळणे दुरापास्त झाले आहे. (अविवाहित लोकांना तिथे जगणे ही सोपे नाही, त्यांना गुआंग्गुन म्हणजे सुकी टहनी किंवा bare branches म्हणतात) .  तिथे आतापर्यंत depression नावाचा मानसिक आजाराचे प्रमाणही जास्त होते. अनेक कारणांपैकी है सुद्धा त्याचे एक कारण असू शकेल.

सध्या तिथे या लग्न जुळवण्याच्या मोहिमेत सरकारने लक्ष घालून मदतीचा हात पुढे करायला सुरुवात केलीय. सरकारी मेंळावे भरवल्या जात आहेत , लग्नास इच्छुक असणाऱ्या तरुण आणि उपवर मुलामुलींचे. आपल्या सारख्या विवाह संस्थेनी सुरु केलेले प्रत्येक जातीधर्माचे मेळाअसतात तसे.तरीही शिक्षण , करियर आणि सुव्यवस्थित नोकरीं यात मुले मुली थोराड होवून लग्नाची मुले, “वय काय? तर चाळीस!” यात सापडली आहेतच. त्याचे ही आपापले अनुवांशिक आणि वयानुसारचे पुढे मुल होतानाचेचे प्रश्न आहेतच. मात्र उशिरा का होईना, कुटुंब व्यवस्थेची सुरुवात आणि त्यातून जगण्याच्या आनंदाची सुरुवात करून देवू पाहणारा हा उपक्रम वेगळ्या धाटणीचा असला तरी कौतुकास्पद आहे.

(लेखिका अमरावतीचा नामवंत स्त्री रोग तज्ञ व इतिहास , मानववंशशास्त्र अभ्यासक आहेत)

 

 

Previous articleमायबोलीचा वारकरी !
Next articleएकटेपण !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here