सावरकरांवरील गांधी हत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही….

सुनील तांबे
२० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींच्या प्रार्थनासभेत बॉम्बस्फोट झाला. ह्या प्रकरणात मदनलाल पहवा ह्यालाsawarkar अटक करण्यात आली. पोलिसांना दिलेल्या जबानीत आपण सावरकरांना भेटून मग दिल्लीला आलो अशी कबुली त्याने दिली. ही माहिती तत्कालीन मुंबई राज्याचे गृहमंत्री मोरारजी देसाई ह्यांना सत्वर मिळाली. त्यांनी ताबडतोब पोलिसांना (जमशेटजी नगरवाला, मुंबई पोलीस उपायुक्त) सूचना दिल्या. त्यानुसार सावरकरांच्या घरावर पाळत ठेवण्यात आली. त्यातून ठोस काही माहिती मिळाली नाही पण नगरवालाने दिल्लीच्या पोलीसांना कळवलं– ‘Don’t ask me why’, he told Sanjevi [Delhi Police Officer], ‘but I just know another attempt is coming. It’s something I can feel in the atmosphere here’”
गांधी हत्या खटल्यामध्ये मोरारजी देसाई ह्यांची उलट तपासणी आरोपी क्रमांक ७ (सावरकर)च्या वकीलांनी घेतली. टाइम्स ऑफ इंडिया (सप्टेंबर १, १९४८) च्या बातमीत खालील तपशील आहे.
“In cross-examination of the Honourable Mr Morarji Desai, counsel for accused number seven [V.D. Savarkar] asked the following question: ‘Did you have any other information about Savarkar, besides Professor Jain’s statement for directing steps to be taken as regards him?’
“Witness answered the question as follows: ‘ Shall I give the full facts? I am prepared to answer. It is for him [Savarkar] to decide.’ Counsel for accused number seven thereafter stated that he dropped the question. The prosecution submitted that the question, answer and the statement of counsel should be recorded but Your Honour declined to do so. It is submitted that the question, the answer and the statement of counsel for accused number seven should have gone on the record.”
मोरारजी देसाईंनी मुंबई राज्याच्या विधानपरिषदेत खालील विधान केलं…. “Savarkar’s past services are more than offset by the present disservice”. (एप्रिल ८, १९४८) मात्र कोर्टात तोंड उघडलं नाही.
गांधी हत्या प्रकरणातील माफीचा साक्षीदार होता दिगंबर बडगे. त्याची साक्षीची काळजीपूर्वक तपासणी न्यायमूर्ती आत्माचरण ह्यांनी केली. बडगेने दिलेली माहिती वा पुरावे ह्यांना अन्य साक्षीदारांचाही दुजोरा मिळत असल्याने तो सत्य कथन करतो आहे असा निर्वाळाही न्यायमूर्ती आत्माचरण यांनी निकालपत्रात नोंदवला आहे.
“The approver in this evidence says that on 14.1.1948 Nathuram V. Godse and Narayan D. Apte took him from the Hindu Mahasabha office at Dadar to the Savarkar Sadan saying that arrangements will have to be made for keeping the ‘stuff’. He had the bag containing the ‘stuff’ with him, Nathuram V. Godse and Narayan D. Apte then went inside leaving him standing outside the Savarkar Sadan. Nathuram V. Godse and Narayan D. Apte came back 5-10 minutes later with bag containing the ‘stuff’.
“The approver then says that on 15.1.1948, in the compound of the temple of Dixitji Maharaj, Narayan D. Apte told him that Tatyarao Savarkar had decided that Gandhiji should be finished and had entrusted that work to them. The approver then says that on 17.1.1948 Nathuram V. Godse suggested that they should all go and take the last ‘darshan’ of Tatyarao Savarkar. They then proceeded to the Savarkar Sadan. Narayan D. Apte asked him to wait in the room on the ground floor. Nathuram V. Godse and Narayan D. Apte went up to the first floor and came down after 5-10 minutes. They were followed immediately by Tatyarao Savarkar. Tatyarao Sarvarkar addressed Nathuram V. Godse and Narayan D. Apte ‘ yashasvi houn ya’ (be successful and come).
“Narayan D. Apte on their way back from Savarkar Sadan said that Tatyarao Savarkar had predicted ‘ Tatyarao yani ase bhavishya kele ahe ki Gandhijichi sambhar varshe bharali ata apale kam nischita honar yat kahi sansaya nahi (Gandhiji’s hundred years were over – there was no doubt that their work would be successfully finished).
“There is nothing on the record of the case to show as to what conversation had taken place just prior to that on the first floor between Nathuram V. Godse and Narayan D. Apte on the one hand and Vinayak D. Savarkar on the other. There is thus no reason to suppose that the remarks said to have been addressed by Vinayak D. Savarkar to Nathuram V. Godse and Narayan D. Apte in the presence of the approver was in reference to the assassination plot against the life of Mahatma Gandhi.
“It would thus be unsafe to base any conclusions on the approver’s story given above as against Vinayak D. Savarkar.”
माफीच्या साक्षीदाराने दिलेल्या माहितीला दुजोरा मिळेल अशी साक्ष वा पुरावा पुढे आलेला नसल्याने सावरकर दोषमुक्त झाले.
सावरकरांच्या मृत्युनंतर हा पुरावा पुढे आला. गांधी हत्या कटकारस्थानाची चौकशी करण्यासाठी १९६५ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जीवनलाल कपूर ह्यांचा आयोग केंद्र सरकारने नेमला.
आयोगाच्या चौकशीत असं निष्पन्न झालं की अप्पाराव कासार, सावरकरांचे अंगरक्षक आणि गजानन विष्णू दामले, सावरकरांचे सचिव वा सेक्रेटरी ह्यांच्या जबान्या पोलीसांनी ४ मार्च १९४८ रोजी नोंदवल्या होत्या. दोघांनी आयोगापुढे दिलेल्या साक्षीत गोडसे आणि आपटे अनेकदा सावरकरांकडे सल्लामसलतीसाठी येत होते हे नोंदवलं. आप्पाराव कासारांनी सांगितलं की जानेवारी २३ वा २४ (१९४८) रोजी गोडसे आणि आपटे सावरकरांकडे आले होते. दामलेंच्या साक्षीने ह्या माहितीला दुजोरा दिला. ते म्हणाले जानेवारीच्या मध्यावर गोडसे सावरकरांना भेटायला आला होता. आप्पाराव कासार आणि गजानन दामले ह्यांच्या साक्षी गांधी खून खटल्यामध्ये का नोंदवण्यात आल्या नाहीत, त्यांची उलटतपासणी का करण्यात आली नाही हे गूढ आहे.
बडगेच्या साक्षीला दुजोरा देणारा हा पुरावा नोंदवण्यात आला असता तर सावरकरांनाही गांधी हत्या प्रकरणात सजा झाली असती. पण ते घडलं नाही म्हणून सावरकर निर्दोष सुटले.
न्यायमूर्ती कपूर ह्यांनी नोंदवलेला अभिप्राय असा– All these facts taken together were destructive of any theory other than the conspiracy to murder by Savarkar and his group.
मुद्दा काय तर गांधी हत्या प्रकरणातून सावरकरांची निर्दोष सुटका झाली ही वस्तुस्थिती आहे. मात्र कपूर आयोगाच्या अहवालाने गांधी हत्या कारस्थानात सावरकर सहभागी होते ह्यावर शिक्कामोर्तब केल्याने संसदेमध्ये सावरकरांचं चित्र काय तर पुतळा जरी उभारला तरिही त्यांच्यावरचा हा कलंक धुतला जाऊ शकत नाही. शेषराव मोरे ह्या सावरकर भक्ताने या चर्चेला नव्याने सुरुवात केल्याबद्दल त्यांचे आभार मानाययला हवेत.
मराठी वैचारिक विश्वात पुरोगाम्यांची दहशतवाद आहे असं विधान विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, शेषराव मोरे ह्यांनी अलीकडेच केलं. परंतु गांधी खून खटला आणि कटकारस्थान ह्या विषयाला मराठी प्रसारमाध्यमांनी अपवादानेच प्रसिद्धी दिली आहे. पुरोगाम्यांनीही ह्या विषयावर निकालपत्र, आयोगाचे अहवाल ह्यासंबंधात सविस्तर माहिती दिलेली नाही की भूमिका घेतलेली नाही. तरिही मोरे ह्यांना पुरोगाम्यांना दहशतवादी म्हणावसं वाटतं. गांधी खून खटल्यातील सावरकरांच्या भूमिकेचा भांडाफोड महाराष्ट्रातील पुरोगाम्यांनी केला असता तर मोरे ह्यांनी त्यांच्यासाठी कोणतं विशेषण वापरलं असतं देव जाणे.
कपूर आयोगाचा अहवाल आणि न्यायमूर्ती आत्मा चरण ह्यांचं निकालपत्र माहितीच्या मायाजालात उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी त्याचा अवश्य शोध घ्यावा.

सावरकरांचे माफीनामे
१. ४ जुलै १९११ रोजी तात्याराव सावरकरांना पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये डांबण्यात आलं. सहा महिन्यात त्यांनी माफीनामा लिहून दिला.
२. दुसरं माफीचं पत्र सावरकरांनी १४ नोव्हेंबर १९१३ रोजी लिहीलं. त्यात त्यांनी म्हटलं आहे… “I am ready to serve the Government in any capacity they like… .
३. मार्च २२, १९२० रोजी सावरकरांच्या समर्थकांनी कायदेमंडळात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, सरकारतर्फे अशी माहिती देण्यात आली की सावरकरांकडून दोन माफीनामे सरकारला प्राप्त झाले आहेत. १९१४ आणि १९१७ साली. त्याचा तपशीलही पटलावर ठेवण्यात आला.
४. १९३० साली लिहीलेत्या माफीनाम्यात सावरकर म्हणतात— “I and my brother are perfectly willing to give a pledge of not participating in politics for a definite and reasonable period that the Government would indicate…
५. गांधी हत्या प्रकरणी अटक झाल्यावर सावरकरांनी फेब्रुवारी २२, १९४८ रोजी मुंबई पोलीस आयुक्तांना माफीनामा लिहून दिला. त्यात ते म्हणतात– “I shall refrain from taking part in any communal or political public activity for any period the Government may require.”
६. १३ जुलै १९५० रोजी, मुंबई हायकोर्टाला दिलेल्या पत्रात सावरकर लिहीतात– “… would not take any part whatever in political activity and would remain in my house in Bombay” for a year. हिंदू महासभेच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा त्यांनी दिला.
पंडीत परमानंद
या पार्श्वभूमीवर पंडीत परमानंद या स्वातंत्र्यसैनिकाचं स्मरण करण उचित ठरेल. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वाधिक काळ कारावास बहुधा त्यांच्याच वाट्याला आला. एकूण ३० वर्षं ते कारावासात होते. त्यापैकी १९१४ ते १९२२ ते पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्य होते. माफीनामा लिहून देण्यासंबंधात त्यांचा सावरकरांशी वादही झाला. १९२२ नंतर येरवडा, रत्नागिरी, साबरमती अशा विविध तुरुंगात त्यांची पाठवणी करण्यात आली. १९३७ साली त्यांची सुटका झाली. आपल्या सत्काराचे कार्यक्रम करणार्‍यांना त्यांनी सुनावलं की मी पराभूत योद्धा आहे, माझं उद्दिष्ट वा ध्येय्य साध्य झालेलं नाही, अशा माणसाचा सत्कार कशासाठी करता. डेहारडूनला त्यांनी ब्रिटीश सरकारवर जहाल टीका केली म्हणून त्यांना अटक करण्यात आली. पण सुटका झाली. त्यानंतर १९४२ च्या चलेजाव आंदोलनात पंडीत परमानंद सहभागी झाले म्हणून त्यांना अटक झाली. १९४६ साली त्यांची सुटका झाली. १९८२ साली पंडीत परमानंदांचं निधन झालं.

सुनील तांबे

Previous articleगांधीहत्या, सावरकर आणि शेषराव मोरे
Next articleआरक्षणाबद्दल काही …
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here