काळाबरोबर झेपावणारे हिंस्र पशू

मुग्धा कर्णिक

चांगल्या- विशेषतः गुणी, प्रतिभावंत माणसांना समाज धड जगू देत नाही या थीमवर लिहिलेली ही कविता आहे. त्याने गेतलेली काही नावं तुमच्या ओळखीची नसतील कदाचित. पण तिथे आपल्या भंवतालातील माणसांची नाव घालू शकतो. अशक्य असतं माणूस होणं तसं… अवघड तर नक्कीच.
———————————

काळाबरोबर झेपावणारे हिंस्र पशू

व्हॅन गॉहला रंगांच्या पैशासाठी भावाला लिहावं लागलं होतं
हेमिंग्वेला त्याची शॉटगन वापरून पाहावी लागली होती
डॉक्टरकी शिकलेला सेलीन झाला होता कफल्लक
माणूस होणं अशक्यच तसं…
व्हिलॉनला पॅरीसमधून हाकलून दिलं होतं चोर ठरवून
फॉल्कनर पडायच्या त्याच्या शहराच्या गटारात पिऊन
माणूस होणं अशक्यच तसं…
बरौजने आपल्या बायकोला बुंदुकीने गोळी घातली
मेलरने आपल्या बायकोला भोसकून मारलं
माणूस होणं अशक्यच तसं…
मॉपासाँ वल्ह्याच्या नावेतच बेभान झाला वेडा
दोस्तोयव्स्की भिंतीसमोर गोळी घालण्यासाठी केला गेला खडा
क्रेनला बोटीच्या मागे प्रॉपेलरवर ढकललं गेलं.
अशक्यच…
सिल्वियाचं मस्तक भट्टीत भाजलं गेलं बटाट्यासारखं
हॅरी क्रॉस्बीने झेप घेतली त्या अंधाऱ्या सूर्यात*
लोर्साची हत्या केली स्पॅनिश पायदळाने
अशक्यच…
आर्टॉड बसून राहत होता वेड्यांच्या निवाऱ्यात बाकड्यावर एका
चॅटर्टनने घोट घेतला उंदराच्या विषाचा
शेक्सपिअर वाङ्मयचौर्य करायचा म्हणे
बीथोवेन बहिरेपणाशी लढायला एक कर्णा लावून बसे
अशक्यतेचीही अशक्यता
नित्झ्शे पुरापुरा वेडा झाला
माणूस असणं अशक्यच तसं…
सगळं फारच माणूसपणाचं…
हे श्वास
आत आणि बाहेर
बाहेर आणि आत
हे फडतूस
हे नेभळट
हे थोरथोर
थोरवीला पोहोचलेले हे वेडे पिसाळलेले कुत्रे
पोहोचवत राहिले थोडाथोडा उजेड आमच्यापर्यंत…
अशक्यपणे.

कवी-चार्ल्स बुकोवस्की
——
मूळ कविता
Beasts Bounding Through Time

Van Gogh writing his brother for paints
Hemingway testing his shotgun
Celine going broke as a doctor of medicine
the impossibility of being human
Villon expelled from Paris for being a thief
Faulkner drunk in the gutters of his town
the impossibility of being human
Burroughs killing his wife with a gun
Mailer stabbing his
the impossibility of being human
Maupassant going mad in a rowboat
Dostoyevsky lined up against a wall to be shot
Crane off the back of a boat into the propeller
the impossibility
Sylvia with her head in the oven like a baked potato
Harry Crosby leaping into that Black Sun
Lorca murdered in the road by Spanish troops
the impossibility
Artaud sitting on a madhouse bench
Chatterton drinking rat poison
Shakespeare a plagiarist
Beethoven with a horn stuck into his head against deafness
the impossibility the impossibility
Nietzsche gone totally mad
the impossibility of being human
all too human
this breathing
in and out
out and in
these punks
these cowards
these champions
these mad dogs of glory
moving this little bit of light toward us
impossibly.

By Charles Bukowski
———————

* ब्लॅक सन प्रेस ही प्रकाशन कंपनी हॅरी क्रॉस्बीने काढली होती. खूप मोठमोठ्या लेखकांची पुस्तके त्याने केली. आणि शेवटी काय कारण कळेना पण आत्महत्या केली.

Previous articleयोगी आदित्यनाथच्या अन्यायाचा बळी
Next articleअखेर आसाराम बलात्कारीच!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.