त्यानंतर सिनेमात एक प्रसंग आहे एक लहान मुलगा जितेंद्र जोशी ला विचारतो काका तुमचा बेबी असतानाच फोटो नाही का? जितू उत्तर देतो नाही,बहुतेक माझ्या बाबांना मी आवडत नव्हतो किंवा त्या वेळेस त्याच्याकडे कॅमेरा नव्हता.तितक्यता ताडकन व्हेंटिलेटरवर असणार्या गजू काकांच त्याचंच वयाचा भाऊ उठतो आणि म्हणतो पैसे होतो पण … आणि जितू ला व्हेंटिलेटर असलेल्या icu च्या काचेबाहेर नेतो आणि सांगतो ३० वर्षापूर्वी तुझा जन्म सातव्या महिन्यात झाला डॉक्टरांनी सांगितलं बाळाच्या जीवाला धोका आहे. रक्ताने माखलेले तळहातापेक्षा ही छोटं बाळ डॉक्टरांनी बाहेर काढलं,सलाइन च्या ट्यूब पेक्षाही छोट्या नाकपुड्या.नाकातील रक्त काढता काढता डॉक्टर च्या नाकात बाळांनी दम आणला.डॉक्टर मोठा जिद्दीचा बाळं गुदमरण्याच्या आत रक्त साफ करून बाळाचं श्वास सुरू केला.बाळांला वाचवण्यासाठी त्याला कांचेच्या पेटीत ठेवायला लागेल पण मोठी परीक्षा पुढे होती हॉस्पिटल सरकारी असल्यामुळे तिथे काचेची पेटी नव्हती.क्षणांच ही विलंब न करता साध्या कपड्यात गुंडाळून तसाच तुझा बाप समोरच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये ड्रॉक्टर चकित झाले की बाळाला असं कसं आणलं आणि तात्काळ ऍडमिट करून काचेच्या पेटीत ठेवलं,बाळांचे हृदयाचे ठोके लागत नव्हतें ,हात लावला तर कागदासारखी फाटले इतकी नाजूक त्वचा होती.खिडकीतून तुझा बाप जाळयात अडकलेल्या तुला पाहत होता.