गहराईयॉं: आंखों के इस तुफॉं को पी जा, आहों के बादल थाम ले!

नीलांबरी जोशी

तो : “काश मैं भी यह समझ पाता, भागनेकी जरुरत नहीं है, जो कुछ हुआ हैं उसे accept करो.. And always chose to move on..!”

ती : “Do my choices even matter Papa?”

तो : यह जाननेका एकही तरीका है.. Give youself a chance..

“गहराईयॉं”मधला नसीरुद्दीन आणि दीपिका यांच्यातला हा संवाद.. निराशेच्या आवर्तात सापडल्यावर प्रथम काय घडतं तर alternatives.. दिसणं बंद होतं. त्यावेळी “सगळं संपलेलं नाही” असं सांगणारं एक माणूस हवं असतं.

*********

सभोवतालच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचा आपल्यावर सतत किती खोलवर परिणाम होत असतो हे “गहराईयॉं” या चित्रपटाच्या निमित्तानं परत एकदा जाणवलं. म्हणलं तर “सहज”, “यूंही” वाटणारे प्रसंग, वाक्यं.. पण ते किती दीर्घकाळ किंवा कायमच आपल्या मनावर कोरले जातात याचा नव्यानं अचंबा वाटला.

“गहराईयॉं”मधल्या अशा काही प्रसंगांमुळे आईवडिलांचं एकमेकांशी असलेलं नातं आणि त्यांचं मुलांशी असलेलं नातं हे सगळ्यांच्याच आयुष्यावर कायम किती परिणाम करत असतं तेही प्रकर्षानं जाणवत गेलं.

“माझी आई ही भाजी अशी करते / करायची..” इथपासून “माझे वडील त्यांच्या ड्रायव्हरशी असे वागतात / वागायचे..” अशी अनेक वाक्यं आपण प्रत्यक्षात किंवा मनोमन कायम उच्चारत असतो. आपल्या आईवडिलांचा आपल्यावर किती परिणाम असतो ते आपल्याला कळायला अनेकवेळा उशीर होतो.

*********

महत्वाचं म्हणजे आपलं आपल्या आईशी आपलं जसं नातं असतं ते आपल्या जोडीदाराबरोबरच्या नात्याशी थेट रिलेट करतं..! “गहराईयॉं”मधल्या दीपिकाला कायम तिच्या आईचं “I am stuck up..” हे वाक्य आठवत असतं. आईवडिलांचं एकमेकांशी पटलं नाही म्हणून आपलंही आपल्या जोडीदाराशी पटणार नाही अशी भीती तिच्या मनात असते.

“डिअर जिंदगी” चित्रपटातल्या नायिकेसारखंच इथे दीपिकालाही I don’t want to get hurt again असं वाटत असतं. आपण नात्यात दुखावले जाऊ अशी भीती तिच्या मनात बसते, त्याला कारण “तिच्या आईवडिलांमधला दुरावा”.

“शादी के साईड इफेक्टस” या चित्रपटात फरहान अख्तर शेवटच्या एका प्रसंगात मान्य करतो.. “माझ्या आईवडिलांचा डिव्होर्स झाला होता.. तसं होऊ नये याची मला खूप भीती वाटायची.. !”

“गहराईयॉं” चित्रपटामध्येही आपल्या आईसारखंच तिला कायम आपण एखाद्या नात्यात, प्रसंगात, व्यवसायात stuck up होऊ आणि त्यातून बाहेर पडता येणार नाही अशी दीपिकाला भीती वाटत असते.. I don’t like being at home.. I feel so stuck अशा तिच्या वाक्यांमधून तिचं मनोगत आपल्यासमोर येतं.

मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर अनेकदा पॅनिक अटॅक्स येणं हा प्रकार असं आपण कुठेतरी अडकलो आहोत आणि बाहेर पडता येणार नाही असं वाटायला लागल्यानंतर घडतो.

असं अडकल्यासारखं वाटायला लागल्यानंतर “बेनाम सा यह दर्द ठहर क्यूं नहीं जाता, जो बीत गया है गुजर क्यूं नहीं जाता..!” असं रात्रंदिवस एखाद्या घटनेबद्दल वाटतं. मग तो प्रसंग मनात साचत, साठत रहातो. त्याच दिशेनं सगळे विचार एकवटतात. भीती वाटायला लागते.

**********

यावर उपाय? “गहराईयॉं”मधल्याच एका वाक्यात तो उपायही सांगितला आहे.. आपण भूतकाळ सोडू शकलो तर तो (भूतकाळ) आपल्यालाही सोडून जाईल.. But maybe if we let go of the past, it will let go of us too..

Give yourself a chance असं यातला नसिर म्हणतो तेव्हा “फॅशन” या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रा जिद्दीनं मुंबईला जाते.. तिथे अपयशाच्या, वैफल्याच्या टोकाला जाऊन परत येते. तेव्हा तिचे वडील तिला परत एकदा आयुष्यात उभं रहायला मदत करतात. हा प्रसंग आठवला.

एकूण काय?

लंबी सही दर्द की राहें, दिल की लगन से काम ले,

आंखों के इस तुफॉं को पी जा, आहों के बादल थाम ले,

दूर तो है पर, दूर नहीं है,

नजारों की मंझिल राही..

……………………………..

हे सुद्धा नक्की वाचा-गहराईयॉं’: प्रेमाबाबतच्या सर्व कल्पना मोडीत काढणारा चित्रपट- https://bit.ly/3uKjmz5

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

………………………………………………………………………………………….

नीलांबरी जोशी यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –नीलांबरी जोशी– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleगहराईयॉं’: प्रेमाबाबतच्या सर्व कल्पना मोडीत काढणारा चित्रपट
Next articleचेहरा हरवलेल्या पिढीचा संगीतकार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.