महाभारतातले युद्ध जिंकून पांडव राजधानीत परत येत असताना त्यांच्या स्वागतासाठी ब्राह्मणांचा एक मोठा जमाव पुढे होतो. त्यातले चार्वाक मताचेही काही जण पुढे होऊन युधिष्ठिरावर आपला संताप व्यक्त करू लागतात. आपले भाऊ, काका, मामा व आप्त मारून हे रक्तरंजित राज्य मिळवले… या पापाचे प्रायश्चित्त तुला घ्यावेच लागेल असे म्हणून ते त्याला आप्तांची हिंसा केल्याचा शाप देतात. या वेळी तेथील इतर ब्राह्मणांचा वर्ग पुढे होऊन तो चार्वाकांना जिवंतपणी जाळून टाकतो.