अशा परिस्थितीत वसंतरावांना राज्याची उभारणी करायची होती. तेव्हाचा महाराष्ट्र हा कृषिप्रधान आहे हे लक्षात घेऊन वसंतरावांनी सर्वप्रथम कृषी क्षेत्राला प्राथमिकता द्यायचे ठरवले . तेव्हा महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही कोरडवाहू होती. त्यामुळे त्यांनी पाटबंधारे प्रकल्पावर भर दिला.११ वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात उजनी,पवना,जायकवाडी,पेंच,अपर पैनगंगा,दूधगंगा,वारणा,गिरणा,मुळा,कुकडी,मां
शेतकऱ्यांना आधुनिक वाण उपलब्ध होऊ लागले.परंतु भविष्यात शेतकऱ्यांची फसगत होऊ नये,म्हणून अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना त्यांनी केली.तत्पूर्वी शेतकऱ्यांना शेतीचे तंत्र अवगत व्हावे,या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठाची निर्मिती केली.या विद्यापीठातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जावे आणि विद्यापीठाच्या शिवार पाहणीसाठी शेतकरी सहजपणाने यावे,हा यामागचा उद्देश होता.
वसंतरावांच्या कारकिर्दीला कधीही गालबोट लागले नाही. मनमोकळा स्वभाव,आर्जवी व मृदू वागणूक ,हसतमुखाने कोणालाही आपलेसे करून घेण्याच्या हातोटीमुळे त्यांच्या सहवासात येणारी माणसं त्यांच्या प्रेमात पडत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,आचार्य विनोबा भावे,लोकनायक बापूजी अणे,पं.जवाहरलाल नेहरू,लालबहादूर शास्री,यशवंतराव चव्हाण आदी महनीय व्यक्तींनी देखील त्यांच्या शालीन व सुसंस्कृतपणाचा वेळोवेळी गौरव केला आहे.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!