बदलांचा स्वीकार करा; बदलाला घाबरू नका !

-सुधीर राठोड

‘व्हू मूव्हड् माय चिज?’

स्पेन्सर जॉन्सन एम डी या जागतिक किर्तीच्या लेखकाने लिहलेली ही महान सत्य उलगडणारी साधी व छोटी बोधकथा आहे.

तुम्हाला जीवनात जे हवं असतं त्याचं ‘चीज’ हे एक रूपक आहे- मग ती चांगली नोकरी असेल, प्रेमाचं नातं असेल, पैसा, मालमत्ता, आरोग्य किंवा मानसिक शांती असेल.

भुलभुलैय्या म्हणजे तुम्हाला हवं असलेलं तुम्ही जिथे शोधता ती जागा- तुम्ही काम करता, ती संस्था किंवा कुटुंब किंवा तुम्ही राहता तो समाज.

एका भुलभुलैयात राहणाऱ्या आणि पोषक आणि आनंददायी चीजच्या शोधात असणाऱ्या चार पात्रांची ही मजेदार आणि उद्बोधक गोष्ट आहे.

या कथेतील पात्रांसमोर अनपेक्षित बदल येतो. यथावकाश, त्याच्यातला एक जण त्याला तोंड देण्यात यशस्वी होतो आणि त्या अनुभवातून तो जे शिकला ते भुलभुलैय्याच्या भिंतींवर लिहितो.

ह्या भिंतीवरील हस्तलिखित सुविचारातून आपणाला बदलाला तोंड कसं द्यायचं हे उमजतं, त्यामुळे तुम्हाला योग्यरितीने ताणतणाव व्यवस्थापन करण्याच्या व यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत होवू शकते.

हस्तलिखित सुविचार

१. तुमच्या जवळ चीज़ असेल तर तुम्ही आनंदी होता.

२. तुमचं चीज़ तुमच्यासाठी जेवढं महत्वाचं तेवढे तुम्ही त्याच्यावर जास्त अवलंबून रहाल.

३. जर तुम्ही बदलू शकला नाहीत तर तुम्ही नष्ट होऊ शकता.

४. जर भीती वाटत नसती तर तू काय केलं असतंस?

५. चीज़ जुनं केव्हा होतं आहे हे कळण्यासाठी त्याचा वारंवार वास घेऊन पहावा लागतो.

६. नव्या दिशेने वाटचाल केली की चीज़ शोधण्यास मदत होते.

७.जेव्हा तुम्ही तुमच्या भीतीवर विजय मिळवता तेव्हा तुम्ही खरं स्वातंत्र्य अनुभवता.

८. नव्या चीज़चा आस्वाद घेण्याची कल्पना ते मिळण्यापूर्वीच केली तर नवं चीज़ मिळवणं सोपं होतं.

९. जितक्या लवकर जुनं चीज़ सोडाल तितक्या लवकर नवीन चीज़ शोधू शकाल.

१० चीज़शिवाय राहण्यापेक्षा भूलभुलैय्यात ते शोधण्यातच सूज्ञपणा आहे.

११. जुनाट विचारपध्दती आपल्याला नवं चीज़ मिळवून देवू शकत नाही

१२. आपण नवीन चीज़ शोधू शकतो आणि त्याचा स्वाद घेवू शकतो हे आपल्याला समजलं की मग आपण आपला मार्ग बदलतो.

१३. लहान लहान बदलांचा आधीपासूनच अंदाज घेत गेलो तर भविष्यात घडणाऱ्या मोठ्या बदलांना तोंड देणं सोप असतं.

१४.चीज़ बरोबर पुढे वाटचाल करीत राहिलं पाहिजे आणि त्याचा आनंद घेत राहिलं पाहिजे.

बदल घडत असतात.

चीज़ हलत राहणारच.

बदलांची चाहूल घ्या.

कोणीतरी चीज़ हलवेल यासाठी मनाची तयारी ठेवा.

बदलांवर लक्ष ठेवा.

चीज़चा वेळोवेळी अंदाज घ्या म्हणजे चीज़ शिळं कधी होत आहे हे कळेल.

परिस्थिती बदलल्याबरोबर लगेचच स्वतःमध्येही बदल घडवून आणा.

जेवढ्या लवकर तुम्ही जुनं चीज़ सोडाल तेवढ्या लवकर तुम्ही नव्या चीज़चा आस्वाद घेऊ शकाल.

स्वतःला बदला

चीज़ सोबत पुढे चला.

बदलाचा आनंद घ्या.

बदलाच्या प्रक्रियेतील साहस अनुभवा आणि नव्या चीज़च्या चवीचा आस्वाद घ्या.

त्वरित बदलण्याची तयारी ठेवा आणि पुन्हा त्याचा आनंद अनुभवा

कोणीना कोणी आपलं चीज़ हलवत असतं.

लोकांची इच्छा असते की परिस्थिती तशीच रहावी आणि त्यांना वाटतं की बदल वाईट आहे. जेव्हा एखादा शहाणा माणूस म्हणतो की बदल वाईट आहे तेव्हा ईतर माणसही तसंच म्हणायला लागतात. हाच तो दबाव. कुटुंबातही हेच आईवडील व मुलांमध्ये घडतं.

जुनं चीज़ म्हणजे जुनी वर्तणूक. आपले संबंध बिघडवणारी जुनी वागण्याची पध्दत आपल्याला सोडायला हवी. विचार व वागणुकीचे अधिक चांगले पर्याय निवडायला हवे. जुने संबंध तोडण्याऐवजी जुनी वर्तणूक बदलावी.

दैनंदिन समस्या निवारणाबरोबरच भविष्यावर नजर ठेवणे आपण कोठे जात आहोत याकडे लक्ष ठेवणे गरजेचे

परिवर्तनाविषयी तक्रार करण्याऐवजी, आपलं जूनं चीज़ हलवलं आहे चला आपण नवीन चीज़ शोधू असा दृष्टिकोन ठेवल्यास वेळ वाचतो व तणावसुध्दा कमी होतो.

मूळ पुस्तक वाचण्यासाठी नक्की वेळ काढा.पुस्तकाची मराठी आवृत्ती घरपोच बोलवा . क्लिक करा https://amzn.to/3wOhtiv

(लेखक महाराष्ट्र सरकारच्या सेवेत प्रशासकीय अधिकारी आहेत) 

94236 01109