अवकाश सफरीसाठी बुकिंग सुरू!

-अमित जोशी

अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या १० दिवसांत दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. Virgin Galactic कंपनीचे रिचर्ड ब्रॅनसोन यांनी ११ जुलैला अवकाश सफर केली. या मोहिमेत अवकाशात घेऊन गेलेल्या छोटेखानी Unity 22 या विमानात रिचर्ड ब्रॅनसोनसह तीन प्रवासी होते, याशिवाय विमानाचे सारथ्य करणारे दोन पायलट होते. या विमानाने ८६.१८२ किलोमीटर एवढी उंची गाठली. जागतिक मापदंडानुसार समुद्र पातळीपासून १०० किमीच्या वर अवकाश चालू होते. तर नेहमीच स्वतःची टीमकी वाजवणाऱ्या अमेरिकेच्या दृष्टीने ८० किलोेमीटर या उंचीपासून अवकाश सुरु होते. तेव्हा या वादात जास्त चर्चा न करता पुढे जाऊया. तर Unity 22 चे हे उड्डाण एकूण ३६ मिनिटांचे होते. साधारण दोन मिनिटे या चार प्रवाशांनी  शून्य गुरुत्वाकर्षणाचा पुरेपुर अनुभव घेतला.

दुसरीकडे Blue Origin कंपनीचे जेफ बेझोस यांनी ३ सहप्रवाशांसह New Shepard या रॉकेटच्या सहाय्याने २० जुलैला अवकाश कुपीतून अंतराळ प्रवास केला. या अवकाश कुपीने १०७ किलोमीटर एवढी उंची गाठली. प्रत्यक्ष प्रवास हा १० मिनीटात संपला, तर शून्य गुरुत्वाकर्षणचा अनुभव या चार प्रवाशांना साधारण ३ मिनिटे घेता आला. जेफ बेझोस यांच्याबरोबर तीन सह प्रवासी होते. एक म्हणजे जेफ यांचे बंधू मार्क बेझोस, १८ वर्षाचा Olive Daeman व ८२ वर्षाचे Wally Funk.  जागतिक मापदंडानुसार या अवकाश कुपीने अवकाशात प्रवेश केलाच पण त्याचबरोबर सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर प्रवाशांना ( आता अंतराळवीरांना ) अवकाशात नेण्याचा विक्रमही केला.

तेव्हा एलॉन मस्क यांच्या ‘Space X’ या खाजगी कंपनीनंतर अवकाशात अंतराळवीर नेण्याचे काम रिचर्ड ब्रॅनसोन यांच्या Virgin Galactic आणि जेफ बेझोस यांच्या Blue Origin या खाजगी कंपनीने केलं आहे. हे तर काहीच नाही, Blue Origin कंपनीने आगामी अवकाश सफरीच्या मोहिमांसाठी बुकिंगही सुरु केलं आहे.

थोडक्यात Virgin Galactic आणि Blue Origin या खाजगी कंपन्यांनी अवकाश सफरीचा आनंद लुटण्यासाठी दरवाजे खऱ्या अर्थाने खुले केले आहेत. अर्थात यासाठी बक्कळ पैसा मोजावा लागणार आहे. असं असलं तरी भविष्यात आणखी खाजगी कंपन्या, देशही या अवकाश पर्यंटन व्यवसायात उतरतील आणि अवकाश सफर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल, शक्य होईल.

बघूया तुम्ही, आम्ही कधी अवकाश सफर करतो ते….

(लेखक ‘झी २४ तास’ वृत्त वाहिनीत कार्यरत आहेत)

9833224281

Previous articleपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन !
Next articleमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here