वंशसातत्य हेच पूर्वीच्या ग्राम संस्कृतीमधे सर्वात जास्त महत्वाचे मानले जाई. लग्न विधीमागे वंशसातत्य हे महत्वाचे इप्सित. मग त्याला अनुसरून हळद कुटताना पण ‘लेकुरवाळी’ हळकुंडे कुटायला घ्यायची. पण मग त्यामागचं लॉजिक समजून न घेता लेकुरवाळी हळकुंडे नसतील तर महिला वर्गातली एखादी खूप ग्यानी महिला लेकुरवाळ्या हळकुंडांसाठी हटून बसते. दहा मैलांवरच्या दुकानात जाऊन तशीच लेकुरवाळीच हळकुंडे आणायची, तोपर्यंत जमलेल्या सगळ्यांना तिष्ठायला लावायचं आणि रक्त आटवायचं, ह्याला खरंच काही अर्थ आहे का? पण लग्न कार्यात यजमानीन बाईला जास्तीत जास्त अडचणीत टाकणा-या अशा एक दोन ग्यानी बायका असतातच.