साप्ताहिक साधना च्या सौजन्याने
प्रशांत नेमा
असं नव्हतं की मी मोठा होत असताना अस्पृश्यता मला माहित नव्हती, मला असं वाटत होतं की ती पूर्वी असायची. आम्हाला हे माहीत होतं की तन्मयच्या पूर्वजांसाठी काही सार्वजनिक ठिकाणं प्रतिबंधित होती. काही ठिकाणी ते अस्पृश्यच फक्त नव्हते, लोक त्यांना बघणं देखील पसंत करत नव्हते. जर त्यांनी धार्मिक ग्रंथ वाचून स्वतःची सामाजिक स्थिती सुधरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या कानात विताळलेलं शिसं घातलं जाऊ शकत होतं. त्यांच्या आर्थिक सुधारणांचे सर्व मार्ग बंद होते. दलितांवर कठोर अन्याय तेवढ्याच कठोर पूर्वानुमानांनुसार होत होते. जीवन मातीमोल करणाऱ्या प्रथांना सवर्णांद्वारा संस्कृती म्हणून स्वीकारलं गेलं होतं.
जातीव्यवस्थेविरुद्ध आवाज उठत होते, जरी गुलाम भारतानं २० व्या शतकात प्रवेश केला तरी अस्पृश्यतेची प्रथा जिवंत आणि व्यापक रुपात अस्तित्वात होती. हा तर स्वतंत्रता आंदोलनाचा परिणाम होता आणि तन्मयचे आदर्श डॉ बाबासाहेब आंबेडकर होते जे स्वतंत्र भारताच्या संविधानाचे मुख्य निर्माते झाले. त्यांच्या मुळं दलितांना नागरिकत्वाचे अधिकार मिळाले आणि जगातल्या सर्वात मोठ्या वंचित वर्गाला प्रोत्साहन देणारी आरक्षण व्यवस्था मिळाली. पण जे नेहमीच होत असतं, की कायदेशीररीत्या मिळालेल्या या अधिकाराचा वास्तवात फार काही उपयोग नसतो, तसंच याही बाबतीत झालं. माझ्या सारखा सवर्ण जो आपल्या शैक्षणिक आणि पारिवारिक जबाबदाऱ्या पार पाडायला लागलो होतो, दलितांच्या बाबतीतली कल्पना आणि वास्तविकता यातलं अंतर समजू शकलो नव्हतो. माझ्यासाठी दलित अमूर्त-अदृश्य होते पण भारताच्या प्रगतीची ओळख होते. माझा अस्पृश्यतेशी संबंध परीक्षेतील पाच गुणांच्या प्रश्नापुरता होता किंवा त्या कष्टकऱ्यांपुरता होता ज्यांच्या भरवशावर माझं आयुष्य चाललं होतं आणि ज्यांचं काम झालं की माझ्यासारखे सवर्ण त्यांना अदृश्य करून टाकत होते
विध्यापिठ
उच्च शिक्षणाच्या विशेष परिस्थिती सवर्ण आणि दलितांमध्ये नवीन भेद निर्माण करतात. मी देखील काही दूषप्रचारांचा बळी होतो, मात्र त्याचं कारण दलितांच्या बाबतीत उपेक्षा किंवा धार्मिक कट्टरपणाची भावना नव्हतं. भारतीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जीवघेणी स्पर्धा आणि दबंग वर्ग आणि जातींनी एकसारखा दूषप्रचार करून आरक्षण व्यवस्थेविरुद्ध द्वेष आणि गैरसमज वाढवण्यास हातभार लावला होता. असंच चित्र अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये सुद्धा बघायला मिळतं पण भारतात जो द्वेष आहे अमेरिकेच्या तुलनेत काहीच नाही.
भारतातल्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया अति स्पर्धात्मक आहे. आरक्षणामुळं दलित विध्यार्थ्यांचा प्रवेश कमी गुणांमध्ये होऊन जातो. आरक्षणामागे हीच भूमिका होती की दलित विद्यार्थ्यांना ज्या अडथळ्यांना पार करत इथपर्यंत पोहचावं लागलं ते बघता त्यांना निवड प्रक्रियेत थोडी ढील दिली जावी. इतकं असूनही शिक्षणाच्या स्तरावर त्यांचं प्रतिनिधित्व अल्प आहे ज्यावरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो की कमकुवत आर्थिक स्थिती, निरंतर तिरस्कार झेलावं लागल्यामुळं आणि सामाजिक अडचणी त्यांचा मार्गात किती अडचणी निर्माण करतात. काही मोजके दलीतच यातून मार्ग काढू शकतात.
माझ्यासारख्या काही मेहनती विद्यार्थ्यांना, ज्यांना फक्त पुस्तकी समज होती त्यांना वाटत होतं की आरक्षणाची व्यवस्था समानतेच्या सिद्धांताच्या विरोधात आहे. जर आपल्याला समानता हवी आहे तर सर्वांसाठी सारखे परिमाण/ठोकताळे असावेत की नाही? हाच रुढीवादी विचार मला तार्किक आणि न्यायोचित वाटत होता. हे तर फक्त सुविधासंपन्न लोकच करू शकतात की त्यांचं हीत साधलं गेल्यावर ते न्याय आणि बरोबरीची गोष्ट करतात आणि सामाजिक न्याय आणि समानतेच्या त्या तमाम संघर्षांकडे डोळेझाक करतात जेव्हा ते संघर्ष दुसऱ्या कुणाच्या हितासाठी असतील.
अन्यायाची ही धारणा घेऊन आणि सामाजिक पूर्वग्रहासाहित आम्ही मोठे होऊन जेव्हा विद्यापीठात पोहचलो तेव्हा सवर्ण आणि अवर्णांच्या मध्ये स्पष्टपणे एक भिंत उभी होती. मला स्पष्ट आठवतं की आम्ही दलित मुलांना शिव्या द्यायचो कारण आम्हाला वाटत होतं की यांच्यामुळं आमच्या त्या मित्रांना प्रवेश मिळाला नाही ज्यांना या दलितांपेक्षा अधिक गुण मिळाले होते. काही संपन्न दलित सुद्धा आरक्षणाचा फायदा घेतात, पण कोणत्याही मोठ्या व्यवस्थेचा काही थोडाफार दुरुपयोग तर होतंच असतो. सवर्ण, संपन्न आणि प्रभावशाली लोक सामाजिक आणि सरकारी व्यवस्थेच्या साट्यालोट्याचा दुरुपयोग करतच असतात, पण जेव्हा आपण बघतो की दुसरं कुणी ते करतंय आपण उत्तेजित होऊन नैतिकतेच्या गोष्टी करायला सुरुवात करतो. व्यवस्थेला खालचं वर करून आपण स्वतःलाच पीडित म्हणायला सुरुवात करतो.
दलितांबद्दलचा पूर्वाग्रह आणि तिरस्कार फक्त विद्यार्थ्यांमध्येच होता असं नाही तर प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकारी सुद्धा याच मानसिकतेचे होते आणि तेही भेदभाव करत होते. यांनी दलितांच्या बद्दल असा भ्रम पसरवला होता की त्यांना अनुचित लाभ मिळालेला असतो आणि म्हणून तेही दलित विद्यार्थ्यांशी भेदभाव, अपमान, छळ, अवहेलना आणि अन्यायपूर्ण मूल्यांकन करत. दलित विद्यार्थी ज्यांना चांगलं जीवन जगण्याची संधी मिळावी म्हणून शिक्षण मिळवायचं असतं आणि त्यासाठी हा संघर्ष करावा लागतो अखेर कोलमडून जातात आणि काही तर आत्महत्या करतात. माध्यमांतून असं सांगितलं जातं की अभ्यासाचा दबाव न झेलता आल्यामुळं आणि त्यांची बौद्धिक क्षमता कमी पडल्यामुळं असं झालं. मात्र या गोष्टीचा भरपूर पुरावा उपलब्ध आहे की त्यांच्या आत्महत्येला कारण त्यांना मिळालेली भेदभावपूर्ण आणि त्रासदायक वागणूक होती. या प्रक्रियेला ‘हुशारीची हत्या’ किंवा death of merit म्हटलं जातं. जी उत्कृष्ट प्रतिभा असलेली मुलं असतात आणि ज्यांनी काहीतरी मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं असतं विशेषकरून त्यांच्यासाठी भेदभाव आणि निरंतर दबाव झेलणं कठीण होऊन जातं आणि ते आत्महत्या करतात.
अस्पृश्य आणि इतरांच्या बाबतीत अंतर कायम राखण्यासाठी काही तार्किक कारणं दिली जातात. उदाहरण म्हणून सांगितलं जायचं की दलितांची मुलं घाण असतात म्हणून त्यांच्यासोबत खेळायचं नाही. कारण ते लोक घाण कामं करतात जसे की मानवी विष्ठा साफ करणं, मेलेल्या जनावरांचा निपटारा करणं प्रेताच्या अंत्यविधीशी संबंधित काम करणं. धार्मिक दृष्ट्या जे काम अपवित्र मानलं गेलं तेच आधुनिक दृष्ट्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं प्रतिकूल सांगितलं गेलं. संपन्न समाजानं स्वच्छता आणि सफाई करणाऱ्यांसाठी काही ठाकठीक व्यवस्था केलेली नाही कारण त्यांची प्राथमिकता काही वेगळी होती हे वेगळं सांगायला नको.
दुःखदायक वास्तविकतेनं माझ्या पुस्तकी ज्ञानाला आणि कल्पनांना खोटं ठरवलं. ही माझ्या डोळ्यावरची संपन्नतेची झापड होती की जी मला दलितांच्या वास्तविकतेबाबत आंधळं बनवत होती. अगदी तशीच जशी अमेरिकेतील वांशिक भेदभावाच्या शिकार लोकांचा वास्तविक अनुभव हा वंशवादाच्या सैद्धांतिक आकलनाहून अगदी वेगळा असतो.
व्यक्तिगत भेदभावासोबतच दलितांच्या बाबतीत संस्थागत भेदभाव सुद्धा होतच असतो. दलितांच्या बौद्धिक क्षमता, सत्यनिष्ठा आणि मानवीय संवेदनांवर तर प्रश्नचिन उभं केलं जातंच त्यांच्या साठी सामाजिक आणि आर्थिक रचनात्मक बाधा सुद्धा उभ्या केल्या जातात ज्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासाठी अडचणी बनून उभ्या राहतात.
मला हे काहीच माहीत नव्हतं. तन्मयला खाली दाखवण्यापासून तर अत्याचार झेलण्यापासून सर्वच करावं लागलं. त्यानं संघर्ष करून त्यातून मार्ग काढला हा त्याच्या सशक्त व्यक्तिमत्वाचा पुरावा आहे.