-अविनाश दुधे
कारगिल नितांतसुंदर आहे. निसर्गाने या प्रदेशावर सौंदर्याची भरभरून उधळण केली आहे.आकाशाला गवसणी घालणान्या उंचच उंच पर्वतरांगा, त्या पर्वतरांगातून खाली झेपावणारे धबधबे, पर्वतांच्या पायथ्याला खेटून वाहणा-या स्फटिकासारख्या पाण्याच्या खळाळत्या नद्या, चिनार वृक्षांचे मोहवून टाकणारे जंगल, हिरवा गालीचा अंथरलेला असावा असा भास होणारी हिरवीगार शेती… नजर टाकाल तिकडे निसर्गाचे हे अद्भुत रूपं पाहायला मिळतं. मानवी स्पर्श न झालेल्या शेकडो अनवट जागा येथे आहेत, त्या कोणालाही मंत्रमुग्ध करून टाकतात.
Kargil- Ladakh’s best Kept Secret– जम्मू काश्मीरच्या पर्यटन विभागाने कारगिलची माहिती देणारं जे ब्रोशर तयार केलंय त्याच्या मुखपृष्ठावर ही Tagline आहे. एका अन्य माहिती पुस्तिकेत Kargil- Slice of Bliss and Beauty या शब्दांत कारगिलचं वर्णन करण्यात आलंय. ही दोन्ही वाक्य अगदी सार्थ वाटावीत, एवढं कारगिल नितांतसुंदर आहे. निसर्गाने या प्रदेशावर सौंदर्याची भरभरून उधळण केली आहे. हे सौंदर्य टिपायला कुठल्याही कौशल्याची गरज भासत नाही. अगदी डोळे मिटून कोणत्याही दिशेला क्लिक केलं तरी लुभावून टाकणारं सौंदर्य तुमच्या कॅमेरात प्रगटतं.
काश्मीर म्हटलं की श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग आणि इकडे तेह-तडाख एवढंच आपल्या डोळ्यासमोर येतं. मात्र अगदी कालपरवापर्यंत काश्मिरचा आणि आता लडाखचा भाग असलेता कारगिलचा अत्यंत देखणा परिसर पार दुर्लक्षित राहिला आहे. अगदी Virgin Beauty म्हणावा असा हा प्रदेश आहे वर्षातील जवळपास सात महिने बर्फाच्छादित राहणाऱ्या या भागातील अनेक ठिकाणी अजूनही माणमाचं पाऊल पडलेलं नाही. १९९९ च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धापर्यंत कारगिल आणि द्रास ही नावंही बहुतांश भारतीयांनी ऐकली नव्हती. कारगिलच्या लढाईची आणि त्या युद्धात अफाट शौर्य गाजविलेल्या जवानांची कहाणी मन अभिमानाने भरून यावी अशीच आहे. मात्र कारगिल आणि परिसराचीही स्वत:ची एक कहाणी आहे.
कारगिल युद्धानंतरच या भागाकडे भारत सरकार आणि अन्य भारतीयांचं लक्ष गेलं. तोपर्यंत कारगिल आपत्या मुग्ध अशा कोशात दडून बसलं होतं. काही साहसी गिर्यारोहक व पर्यटक सोडलेत तर बाहेरच्या जगाला कारगिलची काहीच खबरबात नव्हती. श्रीनगर-मनाली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक वरील हे दुमदार शहर श्रीनगरपासून २०४ तर लेहवरून २२५ किमी अंतरावर आहे. दोन्ही मोठ्या शहराच्या मधोमध वसलेलं आणि प्राचीन काळात ‘सिल्क रूट’ म्हणून प्रसिध्द असलेल्या व्यापारी मार्गातील हे महत्त्वाचं शहर आहे. भारताच्या फाळणीपूर्वी कारगिलला महत्वाचं स्थान होतं. लेह, श्रीनगर, झंस्कार व आता पाकव्याप्त काश्मिरमध्ये असलेलं स्कर्दू या शहरांना जोडणारं जंक्शन म्हणून कारगिलची ओळख होती. आपण जोझिला पास है नाव ऐकलं असतं. हा जोझिला पास श्रीनगर-कारगिल या रस्त्यावर आहे. एकदा बर्फवृष्टी सुरु झाली की हा पास बंद होतो. त्या कालावधीत कारगिलला जायचं असत्यास लेहमार्गे जावं लागतं. हा मार्ग वर्षभर सुरु असतो. श्रीनगरहून वर्षभर वाहतूक सुरु राहावी यासाठी सरकारने आता भुयारी मार्गाचे काम हाती घेतले आहे. ते आता शेवटच्या टप्प्यात आहे . तो भुयारी मार्ग एकदा सुरु झाला की श्रीनगर-लेह रस्ता वर्षभर सुरु राहील. कारगिलला विमानतळाचेही काम सुरु आहे आहे. ते झालं की श्रीनगर व लेह प्रमाणे कारगिलमध्येही थेट उतरता येईल.
कारगिलचा संपूर्ण परिसरच कमालीचा देखणा आहे. प्रेक्षणीय आहे. कारगिलच्या दक्षिणेकडे असलेले सुरु नदीचं खोरं वेडावून टाकते. वर्षातील जवळपास ९ महिने हा परिसर बफनि आच्छादलेला असतो . रस्ते, नद्या, घरं, शाळा, सरकारी इमारती सगळं काही बर्फाच्या पांढऱ्या शुभ्र पांघरुणाआड दडून गेलेले असतं. त्या काळाततं श्वेत सौंदर्य अद्भुत असतं. फक्त तुमच्यात थंडीचा सामना करण्याची ताकत हवी. युरोपातील हौशी पर्यटक याच काळात येथे देतात. मे ते सप्टेंबर या चार पाच महिन्यात येथील बर्फ वितळतो. त्या महिन्यांमध्ये पाहावयास मिळणाऱ्या हिमनद्या, जागोजागी कोसळणारे धबधबे, हात टाकला तर गोठून जाईल अशा अतिथंड पाण्याच्या खळाळत्या नद्या, हिरवा गालीचा वाटावा अशी हिरवीगार शेती नजरबंदी करते. सुरु नदीच्या खोऱ्यातील ‘नुन’ (७.१३७ मीटर) आणि ‘कुन’ (७.०३५ मीटर) या एकमेकांना लागून असलेल्या पर्वताची जगभरातीत चोखंदळ पर्यटकांमध्ये ख्याती आहे. हे दोन्ही पर्वत अगदी वर्षभर बर्फाच्छादित असतात. पर्वत किती देखणे असू शकतात है नुन आणि कुन पाहिले की लक्षात येतं. या खोन्यातील ट्रेसपोन, खार, पानीखार, सांकूड़ी ही ठिकाणंही पाहण्याजोगी आहेत.
कारगिलमध्ये सिधू नदीच्या किनाऱ्यावरील आर्यन खोरेही खूप प्रसिद्ध आहे खरेखुरे आर्य येथे निवास करतात,.असे सांगितले जाते. अलेक्झांडरने भारतावर स्वारी केल्यानंतर विजय मिळवून तो परत जात असताना त्याच्या काही सैनिकांना युद्धाचा कंटाळा व थकवा आल्याने ते परत गेले नाहीत . पुढे ते याच भागात वस्ती करून राहिले. आज या परिसरात राहणारे स्त्री -पुरुष ग्रीस सैनिकांचे वंशज आहेत, असे सांगितले जाते. अलेक्झांडरच्या सैनिकांचे असेच वंशज हिमाचल प्रदेशातील मलाना व अन्य काही गावांमध्ये आढळतात.आज एवढ्या वर्षानंतर इतर वंशाच्या लोकांसोबत संकर झाल्याने त्यांच्या चेहरेपट्टीत भरपूर बदल झाला असला तरी त्यांच्यातील अनेकांचे चेहरे ग्रीकांसारखे दिसतात, हे खरंय. येथील व हिमाचल प्रदेशातील ‘त्या’ गावातील नागरिकांबाबत युरोपच्या काही भागात अशी धारणा आहे की जगातील शुद्ध रक्ताचे आर्य फक्त येथेच आढळतात. त्या उत्सुकतेपोटी युरोपीय देशातील अनेक नागरिक त्यांना भेटायला येतात. विश्वास बसणार नाही, पण युरोपातील काही तरुणी शुद्धआर्य रक्ताच्या वेडगळ समजुतीने येथील तरूणांकडून गर्भधारणा करून घ्यायला येतात. त्यासाठी त्या शेकडो डॉलर मोजतात. You tube वर या विषयात काही Video आहेत.उत्सुकता असणाऱ्यांनी ते अवश्य पाहावेत.
आर्यन खोऱ्यातील स्त्री -पुरुष जगापासून तुटलेल्या अवस्थेत आहे. ते आपल्या विश्वात रममाण असतात. त्यांची भाषा, संगीत सुरेल आहे. पण आपल्याला ते कळत नाही. अलीकडच्या काही वर्षात तेथील तरुण श्रीनगर, जम्मू आदी भागात शिकायला जात आहेत. त्यांच्या माध्यमातूनआता या जमातीबद्दल माहिती मिळणे सुरु झाले आहे. या आर्यन खोऱ्यातही निसगनि सौंदर्याची लयलूट केली आहे. या परिसरात गावागावात, प्रत्येक ठिकाणी अक्रोडने बहरलेली झाड दिसतात आपल्याकडे ७०० ते १००० रुपये किलोने मिळणारे अक्रोड येथे अगदी नाममात्र दरात मिळतात.
श्रीनगरहून कारगिलला जाताना वाटेत द्रास हे चिमुकलं गाव लागतं. जगात दुसऱ्या क्रमांकाचे थंड ठिकाणं अशी द्रासची ख्याती आहे. हिवाळयात येथील तापमान उणे ४० डिग्रीच्या खाली जातं. कारगिल युद्धादरम्यान द्रासचे नाव वारंवार कानी पडले. या युद्धात भारतीय सैन्याने अफाट शौर्य गाजविलेले टायगर हिल,टोलोलिंग हिल द्रासपासून अवघ्या १५ किमीवर आहे या पर्वतांच्या पाठीमागे पाकिस्तान आहे. कारगिल युद्धाअगोदर पाकिस्तानने दोन्ही हिल ताब्यात घेवून भारताची कोंडी केली होती. त्या अनुभवातून धडा घेवून भारतीय सैन्याने येथे एक मोटी छावणी उघडली आहे. द्रासजवळच्या भिम्बाट येथे भारताने कारगिल वॉर मेमोरियल उभारले आहे. त्या युद्धात शहीद झालेल्या प्रत्येक सैनिकाच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे स्तंभ उभारण्यात आला आहे. या युद्ध स्मारकाच्या परिसरातून टायगर हिल,टोलोलिंग हिल हे नजरेच्या टप्प्यात दिसतात. या दोन्ही हिल्सकडे पाहिलं तरी छाती अभिमानाने फुलून येते. श्रीनगरहून कारगिल, लेहकडे जाणारा आणि लेहकडून श्रीनगरकडे येणारा प्रत्येक भारतीय या युद्ध स्मारकाता भेट दिल्याशिवाय पुढे जात नाही कारगिल द्रासचा हा परिसर पाहण्यासाठी १५ दिवस कमी पडतीत असं भरपूर काही येथे आहे. ट्रेकिंग, सायकलिंग, पर्वतारोह, बायकिंग, रिव्हर राफ्टिंग अशा साहसी प्रकारासाठी तर यासारखा परफेक्ट परिसर नाही. गोठलेल्या नदीपात्रावरून पायी चालण्याचा अनुभव घ्यायचा असल्यास येथे यायलाच हवं. येथील पर्वतरांगांमध्ये पहाडी शैलीत उभारलेले हजारो वर्ष पुरातन राजवाडेही बघण्याजोगे आहेत.
कारगिल युद्धामुळे कारगिल हे नाव सर्वतोमुखी झालं असलं तरी कारगिलला त्याचा फटकाही बसला. हा परिसर धोक्याचा आहे अशी समजूत झाल्याने फार कमी पर्यटक येथे येतात. खरंतर पाकिस्तानला खेटून असला तरी हा परिसर अतिशय शांत आहे युद्धानंतर ठिकठिकाणी भारतीय सैन्याने आपल्या चौक्या उघडत्या आहेत. या परिसरात सैन्याने विकासकामातही हातभार लावता आहे. सैन्यदल काही शाळा व रुग्णालयेही चालविते. आणिबाणीच्या परिस्थितीत येथील नागरिकांना मोठ्या शहरात न्यावयाचे असल्यात सैन्यदत हेलिकॉप्टर उपलब्ध करून देते. येधीत नागरिकही कमातीचे शांतीप्रिय आहेत. उर्वरित भारतातील नागरिकानी मोठ्या संख्येने येथे यावं. आम्हाला आदरातिथ्याची संधी द्यावी, अशी त्यांची इच्छा आहे.
कारगिलचं प्रशासन, तेथील नेतेमंडळी आणि कारगिल टूर आणि ट्रॅव्हल्स असोसिएशनचे पदाधिकारी यासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत असोसिएशनचे अध्यक्ष अशरफभाई सांगतात- ‘तुम्ही एकदा कारगिलता येऊन पहा… तुम्ही संपूर्ण जग फिरता असाल पण कारगिल तुम्हाला जो निखळ आनंद देईल तो कुठेच मिळणार नाही.’ कारगिलमध्ये फिरताना प्रत्येक ठिकाणी अशरफभाई जे सांगतात त्याची प्रचीती येते. मानवी स्पर्श न झालेल्या शेकडो अनवट जागा येथे आहेत. त्या कोणालाही मंत्रमुग्ध करून टाकतात. आयुष्यात वेगळं काही हटके पाहायचं असेल तर एकदा कारगिलला नक्की भेट द्या!
(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक, दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)
8888744796