(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२५)
-जयदेव डोळे
शंभरी जगलेल्या संस्थेला काही तरी वैचारिक सुसूत्रता, ठामपणा, संगती आणि स्पष्टपणा असावा. भागवत आरक्षणाच्या विरोधातही बोलले आणि बाजूनेही. हिंदू-मुस्लीम प्रश्नी त्यांची मते व सर्वसामान्य स्वयंसेवकांची मते यांत अंतर वाढताना दिसते. ७५ वय झाले की निवृत्त व्हावे, असे भागवतांनी एका ज्येष्ठांचा हवाला देत केलेले विधान आपल्या अंगलट येताच त्यांनी चक्क काखा वर केल्या. हे त्यांच्या सैरभैर बुद्धीचे प्रतीक की, एकमेकांवर कुरघोडी करण्याची राजकीय गरज? देवभक्ती व देशभक्ती एकच असे म्हणून सांगायचा केवढा मोठा अभिमान असतो! परंतु, संघाने हा अभिमान वाटावा अशी तरतूद केलेली नाही! संघ प्रकट असून गुप्त कसा?
………………………………
शंभर या आकड्याची आपल्यावर इतकी भुरळ का पडते, सांगता येत नाही. शून्याचा शोध भारतात लागला अन् या संख्येत चक्क दोन शून्य आहेत म्हणून आपण शंभर ही संख्या फार मानाची मानतो की काय? एखाद्या मनुष्याने त्याच्या वयाची शंभरी गाठली की केवढी मोठी मजल त्याने मारली यावर केवढा गाजावाजा होतो. प्रत्येक व्यक्तीला आपण ‘आता शतक होऊ द्या’, असे तिच्या वाढदिवशी ठणकावून सांगत राहातो. जणू काही ती व्यक्ती जगू मागत असते. कित्येकदा होते असे की, वयाची नव्वदी ओलांडणारी माणसे एकाच वेळी आश्चर्याचे आणि कंटाळ्याचे धनी बनून जातात. म्हणजे मरण येत नाही म्हणून ती जगत असतात, तर त्यांचे नातलग, मित्र आणि सहचर त्यांना अजून मरण का येत नाही म्हणून वैतागून असतात. क्रिकेटमध्ये शंभर ही धावसंख्या गाठणे अपार महत्त्वाचे मानले गेलेआहे. दुसत्या कोणत्याही खेळात एवढा आकडाच नसतो. त्यामुळे तो गाठायची धडपड नाही. क्रिकेट मात्र शंभरशिवाय जणू वाळवंट. हंड्रेड आणि सेंच्युरी यावाचून सारे बॅटर म्हणजे फळकूट हातात घेऊन उभे असणारे निरुपयोगी… बेकार…!
आयुष्यात काहीही ठोस आणि समाजोपयोगी न केलेली हजारो माणसे वयाची शंभरी गाठून संपलीत . म्हणजे आपकर्तृत्त्व काहीही नाही. जे मिळाले ते निसर्ग व जन्मदाते यांमुळे. त्यामुळे अनेक शतकवीर आयुष्मान अगदी प्रामाणिकपणे कळवळून सांगतात की, ‘अहो, माझे यात काही नाही हो. बस्स! जगत राहिलो आणि जगता जगता शंभरी गाठली. या पलीकडे आपले यात काहीही कर्तृत्त्व नाही’, असा त्यांचा स्वतःबद्दलचा निर्वाळा असतो. केवढ नितळ सच्चेपणा हा. संख्येला काय महत्त्व अन् का? किती जगलो यापेक्षा कसे जगला याला महत्त्व असते. जे लवकर संपून जातात, ते चुटपुट लावून जातात. जे खूप जगतात, त्यांना अशी चुटपुटी जमवत जगत राहावे लागले. त्यामुळे किती जगलात याहून कसे, हा सवाल आपण नुकतेच म्हणजे या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपल्या जन्माची शंभरी पूर्ण करणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला करायला हवा. प्रश्नच तो. माणूस की संघटना असा भेद कशासाठी करायचा? एकाने काय केले व कमावले आयुष्यात ? हा प्रश्न जसा योग्य, तसा अनेक माणसांनी एकत्र येऊन काय मिळवले, हाही प्रश्न रास्त. म्हणून संघाला आपला एवढा सवाल असा असला पाहिजे की, बाबा रे, तुझी शंभरी झाली हे खरे, परंतु तू मिळवलेस काय? तुझ्या नावावर यादी कशाची? कशा-कशात तुला यश मिळवता आले? तुझ्या अपयशाची कबुली देता येईल का तुला? झालेच तर तू केलेल्या चुका सांगून टाक एकदाच्या! तुझ्या हातून झालेले अपराध, दोष आणि फसवणूक यांचा ताळेबंद मांडून टाक देशापुढे ! प्रेमाची पावती आम्हाला नको दाखवूस, द्वेषाची झळ किती पोचली याचा हिशोब मांडता येईल का तुला? तुझा जन्म सकारात्मक व विधायक कामासाठी झाल्याचे तुझे जनक सांगतात, मात्र नकारात्मक, विध्वंसक आणि विपर्यस्त कामे किती झाली तुझ्या हातून ?हे प्रश्न तसेच निरुत्तर राहणार आहेत, हे ठाऊक असूनही ते विचारले पाहिजेत. कारण संघाकडे पाहून किंवा संघाने उभ्या केलेल्या आपल्या प्रतिमेकडे बघून बहुतेक लोक त्याला प्रश्न करत नाहीत. त्यात शंभरी झालेली. प्रचार असा केला की करोडो लोक संघाशी जोडले गेलेले आहेत. चाळीसावर संस्थांची उभारणी व विस्तार संघाने केला. त्यात गेली अकरा वर्षे केंद्रातले सरकार त्यांच्या विचारांचे. अनेक राज्येही त्यांच्याच विचारांना सत्ता देऊन बसणारी. त्यामुळे एवढे दडपण पुरेसे आहे संघाच्या कामाबद्दल प्रश्न न विचारण्यापुरते. तेव्हा अगदी साधी अन् मूलभूत शंका अशी उपस्थित होते की, एवढा विस्तृत कारभार अन् वावर असणारी एक संघटना आपले अस्तित्त्व सरकार दफ्तरी नोंदवत का नाही? तिला ना संविधान; ना सदस्यता; ना प्रवेशाची प्रक्रिया, ना पावतीचा पुरावा; ना ती कोणाला उत्तरदायी…! तिच्या या अशा संपूर्ण अदृश्य, बेपत्ता व अलिखित असण्याचे कारण काय? एक तर संघ कमालीचा तुच्छतावादी असावा किंवा प्रचंड डरपोक. एकीकडे तो इतका अहंकारी अन् श्रेष्ठ आहे की तो कायदेशीर जगणेच अमान्य करतो. दुसरीकडे त्याचे असे लपतछपत आणि गुप्ततेत जगणे एखाद्या माफिया टोळीसारखे ‘अपराधी’ वाटत राहते. काही का असेना, संघाने आपले शंभर वर्षांचे आयुष्य असेच नोंदीविहिन नजरेआड व फसवे ओढत आणले आहे. याबाबतीत त्याला सरकार असो की, न्याययंत्रणा; नागरी संघटना असोत की राजकीय; कोणीही अडवलेले दिसत नाही. काही व्यक्तींनी संघाच्या अशा अलौकीक, अमानवी असण्याविरूद्ध काही करू पाहिले. मात्र, त्यांनाही आडकाठी व टोलवाटोलवी अनुभवास येत आहे.
संघ प्रसिद्धीविन्मुखही नाही. तो ना लाजतो, ना बुजतो. अगदी भिडस्त व संकोची असल्याने त्याला आपले काही उघड करावेसे वाटत नाही, असेही कोणी म्हणत नाही. असंख्य दानशूर, परोपकारी व सेवातत्पर व्यक्ती आणि संस्था आपल्याला नामानिराळे ठेवत असतात. तसेही काही संघ वागताना दिसत नाही. तो संचलन करून प्रकटत राहतो. काय गंमत आहे पहा, याच संघाचे सरकार भारतीय नागरिकांचे जगणे नाना प्रकारच्या नोंदी आणि दाखले याद्वारे सरकारशी जोडून टाकत आहे. संघ मात्र यापासून संपूर्ण मोकळा ! सरसंघचालकांना आधारकार्ड अथवा अन्य परिचयात्मक नोंदींपासून सुटका आहे का? सरकार्यवाहकांना अशी नागरिक म्हणून ‘कार्डमुक्ती’ असते काय? संघाचे सारे प्रचारक संघासारखे अदृश्य, विनादाखल्याचे हिंडत-फिरत असतात काय? काही ठाऊक नाही. कितीतरी जबाबदार व जागरूक लोकांनी संघाच्या अशा अनाम अस्तित्त्वाविषयी तक्रारी केल्या. परंतु त्याची दखल आतापर्यंत एकाही सरकारने घेतली नाही.
आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू या प्रकरणी काय म्हणाले होते ते पाहु : ‘आरएसएस ही एक गुप्त संघटना असून, तिचा तोंडवळा एवढा सार्वजनिक आहे. तिला ना सदस्यत्वाचे नियम, ना नोंदवही, ना खातेपुस्तक. तरीही प्रचंड धन ही गोळा करत असते. तिचा शांततामय मार्गावर विश्वास नाही की, सत्याग्रहावर. जाहीरपणे ती जे सांगते, बोलते त्याच्या थेट विरूद्ध ती खाजगीत वागते. या बाबतीत आरएसएस ही एक अशी संघटना आहे ,जशा काही संघटना फॅसिझमाच्या मदतीसाठी युरोपात जन्मास आल्या. संघ ज्या लोकांना आकर्षित करतो, ते आवर्जून कनिष्ठ मध्यम वर्गातले असतात. त्यातले अनेक निराश व खचलेले असतात. त्यांना संघाविषयी पुसटशी कल्पना असते आणि त्यात सामील व्हायला त्यांनी फार विचार केलेला नसतो.’ (एसेज ऑन इंडियन नॅशनॅलिझम, बिपिनचंद्र, हर आनंद प्रकाशन, नवी दिल्ली, २०१८, पृष्ठ १७१.)
नेहरुंचे हे निरीक्षण ०१ डिसेंबर १९४८ मधले आहे. पंतप्रधान या नात्याने ते मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहून काही गोष्टी सांगत. त्या पत्रातला हा संदर्भ आहे.एवढे लक्षात येऊनही नेहरुंनी वा त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीबद्ध व्हावा यासाठी काही केलं का? कोणी सुरुवात केल्याचे तरी ऐकिवात आहे काय? साक्षात देशाच्या सरकारचा प्रमुख एवढे रोखठोक ऐकवतो. पण, पुढच्या ११ वर्षांच्या नेहरुंच्या कारकीर्दितही संघाकडून कसलाही सरकारी कागद अथवा अर्ज भरून घेतला गेला नाही. नाही म्हणायला गांधीच्या खुनाचा आळ आल्यामुळे गृहमंत्री पटेल यांनी संघाची घटना व विचारसरणी काय आहे, हे जाणण्यासाठी काही लिहून घेतले होते. मात्र, त्याची पुनरावृत्ती नंतर कधी प्रकाशात आणली गेली नाही. म्हणजे असे स्वच्छ दिसते की, संघ काही नोंदी, भूमिका, प्रतिबद्धता यांचा तिरस्कार करतो. आपले काही उघड करायला संघ तयार नसतो. किंबहुना कायदा, नियम, शर्ती आणि सरतेशेवटी आपली राज्यघटना यांना संघ प्रमाण मानत नाही, असाच अर्थ या नकारामधून प्रकटतो. त्याचबरोबर हेही सिद्ध होते की, जेवढे राजकीय पक्ष सत्तेत बसून गेले त्यातल्या एकालासुद्धा संघाची अशी बेनाम, छुपी, बेजबाबदार उपस्थिती धोकादायक वाटली नाही. मागील वर्षापर्यंत सरकारी कर्मचा-यांना संघाच्या शाखेत भाग घ्यायला मनाई होती. तेवढे एक श्रेय काँग्रेसवाल्यांना द्यायला हवे. आता मोदी सरकारने ही मनाई रद्द ठरवली असून, त्याची अंमलबजावणी कशी चालली आहे याचा पत्ताही लागत नाही. कारण अनेक पत्रकार सकाळ-संध्याकाळ सरकारी कार्यालयात जात असतील, कर्मचा-यांना भेटत असतील; मात्र एक साधासा प्रश्न विचारण्यासाठी त्यांची तोंडे उघडलेली दिसत नाहीत. का हो! शाखेला जाऊ लागलात का? असा प्रश्न कोणाच्या डोक्यात तरी आला का?
सप्टेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात डॉ. मोहन भागवत यांनी दिल्लीतल्या त्यांच्या व्याख्यानात संघाला भारताचे संविधान मंजूर असल्याचे सांगितले खरे परंतु, ते विधान राहुल गांधी यांच्यासाठी जास्त असावे. राहुल प्रत्येक भाषणात संविधानाची प्रत हातात घेऊन भाजप आणि संघावर आरोप करत असतात. संवैधानिक संस्था, संकेत, निर्णयप्रक्रिया, नेमणुका आदीत भाजप व संघ प्रचंड मोडतोड करतात, असा त्यांचा आरोप असतो. याचा अर्थ कसा लावायचा? गेली ८० वर्षे संघाचा असा बनाव सुरू असूनही त्यांना म्हणजे संघाच्या कारभाऱ्यांना काही अपराधी, दोषी अथवा चुकल्याचे कसे काय वाटत नाही ?
संघाचे असे वागणे का असावे? त्याला इतका अहंकार कशाचा असावा ?
याबाबत मला असे वाटते की, संघाला आपले स्थान हिंदुधर्मासारखे ठेवायचे आहे. या धर्माला ना कोणी एक संस्थापक, ना त्याचे एखादे धर्मपुस्तक, ना तो पाळायची एखादी ठराविक पद्धत, ना त्याचा एकच एक परमेश्वर. संघाला संस्थापक म्हणून डॉ. केशव बळीराम हेडगेवार आहेत. शाखा कशी चालवायची याची लिखित आज्ञावली आहे. एकच एक प्रार्थना आहे. गणवेश आणि उत्सव आखून दिलेले आहेत. संघातल्या संघात बढती करण्यासाठी काही निकष आहेत. संघाने सुमारे ४० पेक्षा अधिक संस्था व संघटना उभ्या केल्या असून, त्यावर संघाचा संपूर्ण अंमल आहे. व्यक्तीला महत्त्व देण्याऐवजी संघाच्या भगव्या ध्वजाला गुरूस्थानी ठेवण्यात आले आहे. वि. दा. सावरकर यांचे ‘हिंदुत्व’ पुस्तक १९२३ साली प्रसिद्ध झाले. संघ १९२५ साली स्थापन झाला. संघाने कधीही आपले धोरण ठोसपणे मांडले नाही. पुढे ‘विचारधन’ अर्थात ‘बंच ऑफ थॉटस’ नावाने दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलेकर यांचे लेखन, भाषणे प्रसिद्ध झाली, तेव्हापासून ती संघाची भूमिका असे मानले गेले. पण, संघ तसे कधीही ठामपणे म्हणत नाही.सावरकर आणि संघ नेहमीच जन्माचा आधार घेऊन मनुष्याचे स्थान, महत्त्व आणि सुरक्षितता ठरवत असतात. भौगोलिक प्रदेश, धर्म व जात या गोष्टी प्रत्येक मनुष्याचे भवितव्य ठरवत असतात. आणि ते यांनी म्हणजेच या दोघांनी ठरवायचे, असे त्यांनीच निश्चित केले आहे. हिंदुस्थानात जन्मलेले सारे हिंदू असा त्यांचा जसा निर्वाळा असतो तसा हा त्यांनी कोणत्या धर्मात घेतला आणि त्या धर्माची पूज्यस्थाने अन्यत्र असतील तर त्यांना या देशात म्हणजे हिंदुस्थानात दुय्यम स्थान प्राप्त होईल, हा निकालही त्यांचाच. भले नागरिकत्व कोणतेही असो नसो. मातृभूसह पितृभू व पुण्यभू या दोन ठिकाणीचा संदर्भ प्रत्येकाला चिकटवण्याचा उपद्व्याप त्यांनी केला. इस्लाम, ख्रिस्ती, ज्यू आदी धर्मीयांची पूज्यस्थाने देशाबाहेर आणि पूर्व जरी तिकडेच म्हणून अशा धर्मीयांची भारतातली उपस्थिती बहुसंख्याक धर्मीयांनी ठरवायची असे यांचे तत्त्वज्ञान. या अर्थाने हिंदुस्थान हिंदूंचे असे ते म्हणतात, नव्हे ठरवून टाकतात. संविधान तसे मुळीच म्हणत नसताना त्यांचा आग्रह मात्र अशा पद्धतीचा.
संघाने मग असे ठरवले का की या देशात जन्मलेल्या माणसाने पुरावा कशाचा, दाखला कोणता द्यायचा अन् नोंदणी कोठे करायची आणि का? जो येथे जन्मला तो हिंदूच. मग, त्याचा धर्म भिन्न असला तरी चालेल. कारण सर्वांचा ‘डीएनए’ एकच आहे! याच तर्काच्या आधारावर, जो जो संघाच्या शाखेत जात राहील, तो तो आपोआपच ‘राष्ट्रीय’, ‘स्वयंसेवक’ आणि ‘संघ-सदस्य’ होऊन जाईल! त्यासाठी पावती फाडणे, सदस्यता अर्ज भरावा लागणे, त्याचे नुतनीकरण करावे लागणे ही यातायात कशासाठी सक्तीची? भारतात जन्मलेल्या प्रत्येक माणसाला जन्मतः जात लाभते. त्यांचे वडील ज्या जातीचे ती जात त्या अपत्यांना मिळते. म्हणजे जात जशी श्रेणीबद्ध असते, तशी ती पितृसत्ताक/पुरुषसत्ताक ठेवणीची असते. जन्म हीच पावती. जन्म हीच सदस्यता. जन्मासह मिळणारी त्या त्या धर्माची व जातीची सदस्यता हीच पुढे टिकवून ठेवायची, तीच प्रमाण आणि सर्वोच्च. ती संघात पावती फाडून दुय्यम दर्जाची ठरवायचा अधिकार संघच मानत नाही. त्यामुळे संघ शाखा ‘इक्वल टू’ हिंदूधर्म असे निश्चित करतो आणि सारे सामाजिक वास्तव तसेच ठेवतो.
जात आण धर्म हाच संघाचा पाया असल्याने तो पुरोगामी, उदार आणि व्यापक राष्ट्रीय राजकारणात अडचणींचा ठरणार याची जाणीव होताच संघाने राष्ट्र, राष्ट्रीयता, राष्ट्रवाद याचा आडोसा घेण्याचे ठरविले. युरोपातील फॅसिझमप्रमाणे वंश (रेस) म्हणजे जन्म ज्या मानवजातीत होतो. ती ओळख संघाने आधार म्हणून स्वीकारली. वंश म्हणजेच जात आणि धर्म हा आपल्या देशातला अर्थ. संघ कधीही वंशाच्या, वर्णाच्या भाषेत बोलत नाही. परंतु, अलीकडे डॉ. भागवत जेव्हा सारखा डीएनएचा उल्लेख त्यांच्या भाषणात करतात, तेव्हा त्याच्या मागे फॅसिझमचा वंशवादच असतो, हे लक्षात घ्यावे लागते. भागवत ही भाषा ऐक्य, एकजूट, एकोपा या निमित्ताने जरी करत असले तरी भारताचा वंशवाद हिंदुत्त्वाच्या रूपात ठळक करायचा त्यांचा इरादा असतो, हेही ध्यानी ठेवावे. अगदी अलीकडे म्हणजे सप्टेंबर महिन्यात त्यांनी भारतीयांनी तीन मुले जन्माला घालावीत, असे आग्रही प्रतिपादन केले. याचे कारण देशाची लोकसंख्या घटत आहे असे निदर्शनास आल्याचे ते देतात. प्रत्यक्षात भागवत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू भारतात बहुसंख्याकच असले पाहिजेत, या विचाराचे प्रचारक आहेत. म्हणून राष्ट्रीय हिंदू बहुल्य तसेच ठेवावे असा मुद्दा आडून मांडला. हा देश हिंदूंचा तसाच सारे काही हिंदूच असा संघाचा एकतर्फी निर्वाळा आहे. तसा प्रचार सतत करण्याचा प्रयत्न संघाचा असतो. संघाचा राष्ट्रवाद असा वंशवादी, वंशश्रेष्ठत्वाचा ठरतो. त्यामुळे ते संविधानद्रोही तर आहेच शिवाय तो अन्य धर्मियांना दुय्यम, नगण्य ठरवत राहतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेत ज्यांचा मोठा वाटा होता, ते बाळकृष्ण शिवराम मुंजे हे नेत्रतज्ज्ञ डॉक्टर फॅसिझम्च्या प्रेमात पडले होते. डॉ. मुंजे यांनी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे राजकीय वैचारिक पालकत्व पत्करलेले होते. हिंदू महासभा स्थापण्यासाठी डॉ. मुंजे अग्रेसर होते आणि डॉ. हेडगेवार काही वर्षे महासभेचे सचिव म्हणून कार्यरत होते. साहजिकच फॅसिझमची ओळख संघ संस्थापकास असायचीच. डॉ. मुंजे इटलीत जाऊन बेनिटो मुसोलिनी यांस भेटून व त्यांच्या फॅसिस्ट लष्करी, हिंसेवर विश्वास असलेल्या संघटनांची पाहणी करून परतले होते. संघवाले हा संबंध फॅसिस्टांनी केलेल्या नरसंहाराच्या भयाने कबूल करत नसतात. मात्र माझिया कासेलोरी यांच्यासारख्या अभ्यासकांनी विविध कागदपत्रांद्वारे संघावर फॅसिझमचा प्रभाव आहे, असे मांडले आहे. संघाने थेट फॅसिझमचा आदर्श घेतला का? नाझी सैतान हिटलरची प्रेरणा त्यास होती का? या प्रश्नांची ते आजही धड उत्तरे देऊ शकत नाहीत. हेडगेवार यांनी काहीही लिहून ठेवले नाही. त्यांची चरित्रे त्यांच्याच अनुयायांनी भक्तिभावपूर्वक आणि अस्सल चरित्रसाधने न वापरता लिहिलेली आहेत. परिणामतः तर्क, संदर्भ, दाखले व कारणपरंपरा देत बहुतेक जण संघाची फॅसिझमशी तुलना करतात. संघवाले मात्र या साऱ्या गोष्टी फेटाळून आपलेच म्हणणे खरे कसे करावे याची शिकवणी जणू थेट मुसोलिनीकडे लावल्यासारखे बोलत राहतात.
ज्यांची धर्म, वंश, जात यांवरच गुजराण असते, त्यांची तर्क, बुद्धी, युक्तिवाद, विवेक यांच्याशी लढाई असते. सत्य, वास्तव, वस्तुस्थिती यांचे आणि वंशवाद्याचे कधीही पटत नसते. आता शुद्ध व अप्रदूषित रक्त अथवा नातीगोती असे काही उरलेले नाही. कारण मानवाने हजारो वर्षांपासून इतकी स्थलांतरे केली आहेत की, अस्सलतेची शक्यताच उरत नाही. हिंदू म्हणजे भारतीय माणसांत सहा माववीवंशांचे मिश्रण झाल्याचे एस. सी. मुळे यांसारखे समाजशास्त्री सांगतात. त्यामुळे भागवत आपण जणू शास्त्रज्ञ आहोत असे भासवत डीएनए वगैरेबाबत जी भाष्ये करीत असतात, ती सर्वथा अज्ञानमूलक तरी मानली पाहिजेत किंवा मुद्दाम सांगायचे असत्य. तरी संघाचे चार सरसंघचालक विज्ञानाचे पदवीधर होते, तरीही साधार प्रयोगावर आधारित आणि सतर्क त्यांनी काही मांडलेले नाही. याचे कारण धर्माला चिकित्सा, पडताळणी, उलट तपासणी चालत नाही. म्हणून सरसंघचालक कोणताही घ्या, एकाचेही भाषण त्या त्या विषयावर अभ्यासपूर्ण आणि वास्तविक नसते. शंभर वर्षे पूर्ण करणारी ही संघटना म्हणूनच काहीही भरीव, भव्य आणि भरजरी करू शकलेली नाही. स्वातंत्र्य चळवळ असो, अस्पृश्यता निर्मूलन असो, बालविवाह थोपवणे असो की, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार असो, संघ चकार शब्द या प्रश्नांवर काढणार नाही. त्याने स्वतःची ओळख एक ‘सांस्कृतिक राष्ट्रवादी’ अशी करवून ठेवली असून, तीच त्याची मर्यादा आहे. तेच तिचे कुंपण आहे. संघ मानवी, भौतिक व पोटापाण्याच्या समस्यांची दखलच घेत नाही, इतकी ही तत्त्वनिष्ठ’ संघटना आहे. संस्कृतीत धर्म, जातीसंस्था, वर्णव्यवस्था, लिंगभेद, परंपरा, रीतिभाती, उत्सव, देवदेवता अशा कित्येक गोष्टी समाविष्ट करता येतात. या सा-यांना संघ प्राचीन, पौराणिक, वेदकालीन आणि दैवी रूप देतो. साहिजिकच हे नियम मग ‘नाजूक’ आणि ‘संवेदनशील’ बनवून टाकायची आपोआप संधी मिळते. या साऱ्यांना राष्ट्र नामक स्वरूपाशी जोडल्यावर तर शंका कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे संघाची शंभर वर्षे कशी संपून गेली, हे कोणालाच सांगता येत नाही. संघाचा शंभर वर्षांचा इतिहास त्याच्या कामगिरी सकट प्रसिद्ध व्हायला हवा होता. पण नाही. तो कधी होणार नाही.
संघाने स्वातंत्र्य चळचळीत भाग न घेण्याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर अजून कोणी दिलेले नाही. उलट डॉ. हेडगेवार हेच कसे पहिले सत्याग्रही होते अशी अफवा पसरवून संघ स्वतःचे हसू करून घेतो. नंतरही अनकांची नावे छापून त्यांनी कसे आंदोलन केले व ते कोणत्या तुरुंगात गेले याची माहिती मागच्या वर्षापासून प्रसारित केली जात आहे. कधी व्यक्तिगत पातळीवर तर कधी काँग्रेस पक्षात जाऊन संघवाल्यांनी सत्याग्रह केल्याचे इतक्या उशिरा जाहीर करणे संशयास्पद आहे. कारण संघ स्वतः कधी पत्रके इ. काढून तशी माहिती देत नाही, तोवर कोणाचाही विश्वास बसणे कठीण. नाही भाग घेतला तर नाही घेतला म्हणण्यात कमीपणा कसला? करोडो भारतीयांनी कुठे घेतला होता हिस्सा ? एकीकडे सत्याग्रही म्हणून धडधडीत खोटे बोलायचे संघाला उत्तम जमते. आपले नाव कुठेही प्रसिद्ध होऊ नये, कोणा व्यक्तीने आपले संघाचा सेवक म्हणून नाव जाहीर केले तरी आपणाकडे कोणाची वक्रदृष्टी वळू नये, यासाठीच तर संघ स्वतःची नोंदणी, सदस्यता पुरावे, पावती पुस्तक न छापणे अशी व्यवस्था करत नाही ना? कोणाही व्यक्तीला आपण अमुक पक्षाचे, तमुक संघटनेचे, ढमुक संस्थेचे सदस्य आहोत हे सांगायचा केवढा मोठा अभिमान असतो! परंतु, संघाने हा अभिमान वाटावा अशी तरतूद केलेली नाही! संघ प्रकट असून गुप्त कसा?
शंभर वर्षांची तथाकथित लोकमान्यता प्राप्त केल्याचा दावा एकीकडे तर दुसरीकडे कायद्याच्या कचाट्यात अन् वादांच्या वादळात सापडू नये यासाठी केलेला कातडी बचावपणा की आपला अपराधीपणा लपवायचा कसलाही पुरावा मागे न ठेवायचा. सराईत गुन्हेगारासारखी ही चतुराई? संघ कशाची अपराधी भावना बाळगून आहे, समजत नाही. त्यांच्या शाखा जिथे भरतात ती मैदान फुकट असतात. त्यांची संचलने सरकारी म्हणजे सार्वजनिक मालकीच्या रस्त्यांवरून होतात. संघाचा गणवेश काळी टोपी, लाठी, चामडी पट्टा, काळे बूट, भगवा ध्वज, तो लावण्याचे लोखंडी स्टॅन्ड आदी. सारा सरंजाम काळ्या बाजारात मिळतो का? नाही. या वस्तूंचे विक्रेते व ग्राहक पावत्यांवरच सारा व्यवहार करत असावेत. मग, संघाला आपल्या कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकवायची जशी कधी काळी अडचण वाटे तशी आपली नोंदणी करण्याबाबत वाटते का?
‘भारत हिंदूराष्ट्र आहेच, तसे घोषित करायची गरज नाही’, असे डॉ. भागवत बेलाशक म्हणतात. याला काय म्हणावे? संविधानाचा सन्मान संघ करतो असे सांगत असतानाच भागवत संविधानाच्या विरोधात सर्वांसमक्ष असे जाहीर करतात. सरसंघचालक बोलले म्हणजे ती संघाची ठाम भूमिका आहे का? खलिस्तानवादी जेंव्हा भारताविषयी असे काही बोलतात तेंव्हा जी प्रतिक्रिया उमटते ती भागवतांवेळी का नाही उमटत ?
शंभरी जगलेल्या संस्थेला काही तरी वैचारिक सुसूत्रता, ठामपणा, संगती आणि स्पष्टपणा असावा. भागवत आरक्षणाच्या विरोधातही बोलले आणि बाजूनेही. हिंदू-मुस्लीम प्रश्नी त्यांची मते व सर्वसामान्य स्वयंसेवकांची मते यांत अंतर वाढताना दिसते. ७५ वय झाले की निवृत्त व्हावे, असे भागवतांनी एका ज्येष्ठांचा हवाला देत केलेले विधान आपल्या अंगलट येताच त्यांनी चक्क काखा वर केल्या. हे त्यांच्या सैरभैर बुद्धीचे प्रतीक की, एकमेकांवर कुरघोडी करण्याची राजकीय गरज? देवभक्ती व देशभक्ती एकच असे म्हणून सांगायचा केवढा मोठा अभिमान असतो! परंतु, संघाने हा अभिमान वाटावा अशी तरतूद केलेली नाही! संघ प्रकट असून गुप्त कसा?
शंभर वर्षांची तथाकथित लोकमान्यता प्राप्त केल्याचा दावा एकीकडे तर दुसरीकडे कायद्याच्या कचाट्यात अन् वादांच्या वादळात सापडू नये यासाठी केलेला कातडी बचावपणा की आपला अपराधीपणा लपवायचा कसलाही पुरावा मागे न ठेवायचा. सराईत गुन्हेगारासारखी ही चतुराई? संघ कशाची अपराधी भावना बाळगून आहे, समजत नाही. त्यांच्या शाखा भरतात ती मैदोन फुकट असतात. त्यांची संचलने सरकारी म्हणजे सार्वजनिक मालकीच्या रस्त्यांवरून होतात. संघाचा गणवेश काळी टोपी, लाठी, चामडी पट्टा, काळे बूट, भगवा ध्वज, तो लावण्याचे लोखंडी स्टॅन्ड आदी. सारा सरंजाम काळ्या बाजारात मिळतो का? नाही. या वस्तुंचे विक्रेते व ग्राहक पावत्यांवरच सारा व्यवहार करत असावेत. मग, संघाला आपल्या कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकवायची जशी अडचण वाटे कधी काळी तशी आपली नोंदणी करण्याबाबत वाटते का?
‘भारत हिंदूराष्ट्र आहेच, तसे घोषित करायची गरज नाही’, असे डॉ. भागवत बेलाशक म्हणतात. याला काय म्हणावे? संविधानाचा सन्मान संघ करतो असे सांगत असतानाच भागवत संविधानाच्या विरोधात सर्वांसमक्ष असे जाहीर करतात. सरसंघचालक बोलले म्हणजे ती संघाची ठाम भूमिका आहे का? खलिस्तानवादी जेंव्हा भारताविषयी असे काही बोलतात तेंव्हा जी प्रतिक्रिया उमटते ती भागवतांवेळी का नाही उमटत ?
शंभरी जगलेल्या संस्थेला काही तरी वैचारिक सुसूत्रता, ठामपणा, संगती आणि स्पष्टपणा असावा. भागवत आरक्षणाच्या विरोधातही बोलले आणि बाजूनेही. हिंदू-मुस्लीम प्रश्नी त्यांची मते व सर्वसामान्य स्वयंसेवकांची मते यांत अंतर वाढताना दिसते. ७५ वय झाले की निवृत्त व्हावे, असे भागवतांनी एका ज्येष्ठांचा हवाला देत केलेले विधान आपल्या अंगलट येताच त्यांनी चक्क काखा वर केल्या. हे त्यांच्या सैरभैर बुद्धीचे प्रतीक की, एकमेकांना कुरघोडी करण्याची राजकीय गरज? देवभक्ती व देशभक्ती एकच असे म्हणून त्यांनी राष्ट्रवादाबद्दल महाकवी टागोरांनी दिलेला इशारा सार्थक ठरवला. प्रत्येक सरसंघचालक आपल्याला मुळीच ठाऊक नसलेल्या विषयाबद्दल एखाद्या तज्ज्ञांसारखे का बोलत राहतो? हिंदुत्व एक राजकीय भूमिका असेल, तर ती धर्माच्या आधारे मांडायचा प्रयत्न जे करतात, ते धर्मशास्त्री, पुराणिक, मीमांसक, संशोधक, अभ्यासक, आचार्य, महामहोपाध्याय, वेदाध्यायी अथवा विद्वान असतात काय? हिंदुत्त्वाचे राजकारण बॅरिस्टर, डॉक्टर, प्राध्यापक, वकील, पशुवैद्यक हेच मांडताना दिसतात. इतिहास, संस्कृती, परंपरा यांचाही त्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास नसतो, असे दिसते. मग, एवढा ‘ज्ञानी’ अधिकार त्यांना दिला कोणी? कोणीही नाही.
संघात व्यक्तीवर उत्सव करू दिला जात नाही, असे प्रत्येक ‘परमपूज्य’ सरसंघचालक सांगत असतो. मात्र ११ सप्टेंबर रोजी याच संघाचे माजी प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लेख लिहून सरसंघचालकांच्या पंचाहत्तरीचा राष्ट्रीय उत्सव जणू साजरा करू बघत होते. सर्व भाषांच्या वृत्तपत्रांना सक्तीच झाल्यासारखा तो लेख छापला गेला. संघाचा वाढदिवस साजरा न करण्याचा प्रघात मोदींना ठाऊक नाही की काय? नक्कीच आहे. पण, जणू दोघांत काही राजकीय वाटाघाटी झाल्या (किंवा राहून गेल्या) आणि त्यांची पावती म्हणून मोदींकरवी लिहिलेला लेख सगळ्यांना वाचावा लागला. संघातला असा ‘लेनदेन’ चा प्रकार बटबटीतपणे प्रकाशात आला.
१९२५ हे साल इटलीमध्ये बेनिटो मुसोलिनी याने आपला एकछत्री अमल सुरू करण्याचे. त्या आधी तो लोकशाही, राज्यघटना यांच्यावर विश्वास असल्याचे दाखवी. त्याच देशात १०० वर्षांनी उजव्या व फॅसिस्टांचा आदर करणा-या पक्षाची सत्ता प्रस्थापित झालेली. तिथल्या पंतप्रधान मेलोनी व मोदी यांचे सूर उगाच जुळलेले दिसत नाहीत. निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये काही तरी साम्य व परस्परांविषयी आदर असल्याशिवाय असे होत नाही. मुसोलिनीचा फॅसिझम् तर त्या देशात उत्पात घडवून गेलाच. परंतु जिथे जिथे हा विचार रूजला तिथे तिथे हिंसाचार, कटकारस्थाने, सामाजिक विभाजन आणि लोकविरोधी धोरणे दिसू लागली. अत्यंतिक वैयक्तिक महत्त्वाकांक्षा भागवायला असत्य, अनीती, अतिशयोक्ती आणि अत्याचार यांत कसलीही कमतरता ठेवायची नाही, हे फॅसिझमचे तत्त्व आणि व्यवहार. गेली ११ वर्षे भारतातल्या सत्तेच्या राजकारणात या सगळ्या गोष्टी ‘अनिवार्य’ झाल्या असल्याचे दिसते. आजचे भारताचे बहुतांश राजकारण संघ स्वयंसेवकांमार्फतच चालते. त्यांचा मंच मग, भाजप असो की बजरंग दल, वृत्तवाहिन्या असोत की चित्रपट.
संघाच्या शाखा, त्यांचे स्वयंसेवक आणि संघाशी सबंधित अनेक नामवंत यांचा सरकारकडून सतत उल्लेख केला जातो. परंतु, संघाचे खरे स्वरूप लक्षात आल्यामुळे संघाला ‘रामराम’ ठोकणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. त्यातले अनेक जण त्यांच्या आयुष्यातली संघाची उपस्थिती विसरले आहेत. काही मोजक्यांनी मात्र आपले अनुभव प्रसिद्ध केले आहेत. त्यांचे लेखन, भाषण, अनुभव कथन भरपूर आहे. मात्र त्यांचा म्हणावा तसा गाजावाजा होत नाही. शोधून, वेचून असे लेखन, व्हिडीओ , पुस्तके गायब करून टाकायचे कामही केले जाते. त्याचे कारण संघाने स्वतःचा (नेहरुंनी सांगितल्याप्रमाणे) उभा केलेला सोज्वळ, राष्ट्रवादी आणि सांस्कृतिक देखावा किंवा बनाव. कोणाही संस्थेचा अथवा व्यक्तीचा वाढदिवस साजरा करताना फक्त चांगले गुण व गोष्टी सांगायचा प्रघात आहे. परंतु, संघ अशी संघटना आहे जिची दुसरी तिसरी बाजूही अनेकांना ठाऊक आहे. तिचे केवळ कौतुक न होता तिचे लपलेले स्वरूपही बघायला हवे. जातीव्यवस्था हजारो वर्षे टिकली आहे, म्हणजे तीत नक्कीच काही तरी सद्गुण असले पाहिजेत, असा तर्क संघाच्या शतकपूर्तीत कोणी मांडला असेल तर ते अत्यंत मूर्खपणाचे आणि फार धोक्याचे असेल, हे लक्षात ठेवले पाहिजे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार, टीकाकुशल राजकीय व सामाजिक भाष्यकार आहेत.)
7757908209










