असा विचित्र खेळ आपल्या देशात नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असणा-या लोकांसोबत सुरु आहे. त्यांची संसाधने गावातून शहराकडे हिरावून घेण्याचे प्रकार वेगात सुरू आहेत. त्यामुळे संसाधनांचेही नुकसान होत आहे. पूर्वी आसपासच्या संसाधनांबद्दल एक प्रेमाची भावना स्थानिक लोकांमध्ये होती. आपलं जंगल, आपली नदी, आपलं तळं म्हणून त्याची जोपासना केली जायची. संसाधनांना वापरण्यासाठी समाजाने निर्माण केलेले काही पारंपरिक नियम होते पण, हे सारं आता बदलायला लागलं आहे.