-संपत मोरे
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात स्थापन केलेल्या पत्रीसरकारमधील सहकारी गणपती बाळा यादव (गणपतीदादा) काल बुधवारी गेले. गणपतीदादा अलीकडच्या काही दिवसांपर्यत सायकल चालवत होते.वयाची १०० वर्षे पार केलेला या अफलातून माणसावर बीबीसी,तसेच आंतरराष्ट्रीय किर्तीचे पत्रकार पी साईनाथ यांनी खास स्टोरी केली होती.त्यांची कथा ऐकून पी साईनाथ त्यांना भेटायला आले होते. पी साईनाथ सरांनी लिहिलेली दादांच्या जीवनप्रवासाची कहाणी मराठीसह इंग्रजी,उर्दू, हिंदी भाषेत प्रसिद्ध झाली होती.
नंतर बीबीसीने माझ्या गावपांढरीतला हा मोठा माणूस जगभर पोहोचवला होता. मी ‘मुलूखमाती’ या माझ्या पुस्तकात या माणसाची कथा लिहिली आहे. दिनांक 31 जानेवारीला घरी येऊन ते ‘मुलूखमाती’ घेऊन गेले. जाताना नको नको म्हणत असताना पुस्तकाचे पैसेही दिले.आपल्यावर लिहिलेलं बराच वेळ न्याहाळत होते.काय लिहिलंय ते वाचून दाखव म्हणाले.’संपा, माझं सगळं आयुष्य पुस्तकात आलं.मला असं कवा वाटलं नव्हतं.त्वा लय लांब पोहोचवलं मला…”अस म्हणत कौतुक करत गेले..मुलुखमाती मधला एक नायक काळाच्या पडद्याआड गेला . मी काही वर्षांपूर्वी दैनिक ‘दिव्य मराठी’त त्यांच्यावर लिहिलेला हा लेख…
………………………………….