Power of Pause

सुलक्षणा वर्हाडकर

काल एल्विस प्रिस्लेच्या आयुष्यावर आधारित सिनेमा पाहिला.

जड मनानं थिएटर बाहेर आले.

एका कलाकाराची शोकांतिका काळाला पुरून उरलीय.

आयुष्यात पाॅज घेणं किती महत्वाचं आहे यावर लिहावंसं वाटतंय.

एक दीड मिनिट थांबणं. उत्तर देण्यापूर्वी Pause घेणं हा बावळटपणा नाही.

धाडकन कुणाचा अपमान करत खिल्ली उडवणं सोप्पंय.

 

नहले पे दहला.

ये लगा सिक्सर.

 

सांस्कृतिक बुद्धिमत्ता शिकताना दीड मिनिटांचा पाॅज याबद्दल नेहमी सांगतात.

Unwanted Outcome टाळण्यासाठी या पाॅजचा उपयोग होतो.

तुम्ही कोणत्या संस्कृतीत वाढलात त्यावर या पाॅज घेणा-याला लेबल्स लागतील.

कुणी बावळट म्हणेल, कुणी कुंपणावर बसणारा कुणी म्हणेल अंदाज घेतोय तर कुणी म्हणेल मोठ्याची बाजू.

 

कुणाला वाटेल मंद आहे, अज्ञानी आहे, आत्मविश्वास कमी आहे.

भावनिक बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक बुद्धिमत्ता यामध्ये हा पाॅज जागरूकता घेऊन येतो.

उत्तम भावनिक बुद्धिमत्ता असेल तर आपल्याला नेमकं समजतं कशाने आपण ट्रिगर होतो. केव्हा आपल्याला पाॅज घ्यायचाय.

उत्तम सांस्कृतिक बुद्धिमत्ता असेल तर आपण या पाॅजला Context मध्ये बदलू शकतो.

जिथे EQ संपतो तिथे CQ सुरू होतो.

 

नव्वद सेकंदाच्या वेळेत आपण इगो बाजूला ठेवू शकतो, आपल्याला जे वाटतंय त्या भावनेला नाव देऊ शकतो. जे घडलंय आणि घडू शकतंय याचा विचार करू शकतो. तडकाफडकी नको ते शब्द बोलून मन दुखावण्यापेक्षा थोडं थांबून चित्त था-यावर आणू शकतो.

थोडं स्लॅन्ग बोलायचं झालं तर छोट्या बापाचं झाल्यानं काही बिघडत नाही. Impulsive react केल्याने होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.

 

फक्त थोडंसं गप्प तर रहायचंय.

थांबून उत्तर द्यायचंय.

‘पाॅवर ऑफ पाॅज ‘ म्हणतात याला.

 

खूपदा ओठावर येतं की याला उपरोधाने काही बोलावं, सुनवावं, झाडून काढावं,शाळा घ्यावी.

हा क्षणिक मोह टाळायला हवा.

 

आपले इमोशनल ट्रिगर्स आपल्याला समजायला हवेत. इतका प्रामाणिकपणा स्वतःला दाखवायला हवा.

दीड मिनिटं म्हणजे नव्वद सेकंद थांबायचं.

विचार करायला वेळ घ्यायचा. रिॲक्ट न करता रिस्पाॅन्ड करायचं.

कुणाला लगेच उत्तर न दिल्याने कमीपणा येत नसतो.

 

काही पोस्टवर मिठात खडा पडतो. तसं कुणीतरी माथेफिरू हा हा करून जातं तेव्हा असाच विचार असतो. आपले शत्रू आपण निवडायचेत आणि ती लायकी तो दर्जा कुणालाही द्यायचा नाही.

कुणी ट्रिगर दाबण्यासाठी जर हा हा करत असेल तर लगेच त्यावर रिॲक्ट केल्याने काय होईल?

आपण भरत असलेला आयकर कमी होईल? आपल्या घराचे चौरस फूट कमी होतील? हात पसरून जगणं हाती येईल की शिक्षण किंवा समाजातील मान कमी होईल? आपल्या कुटुंबाचा आपल्यावरील विश्वास कमी होईल? आपल्या आजारपणात सोशल मीडियावर हात पसरावे लागतील की आणखी दयनीय काही पहावं लागेल?

उत्तर देऊन सोक्षमोक्ष लावणं म्हणजे त्या हा हा करणा-या रिकामटेकड्या व्यक्तिच्या जाळ्यात अडकणं. तिच्या पायरीवर येऊन वागणं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आरोग्य. मनाची शांतता. ती राखायची. फिटनेस सांभाळायचा. स्वार्थी व्हायचं स्वतःसाठी.

एकच आयुष्य असतं. मेल्यावर एका तांब्यात जातो आपण .कुणी थांबत पण नाही जळेपर्यंत.

जर इथलं उदाहरण घेतलं तर अमुकची पोस्ट चांगली, अमुकचे इतके फाॅलोअर्स, इतके लाईक्स हे सर्व मोहमाया.

खूप लाईक्स, खुप फाॅलोअर्स आणि स्वतःला सरस्वतीचा अवतार समजणा-या एक ताई आठवल्यात. हाॅस्पिटलला असताना फोन करून पैशांची मदत मागत होत्या.

एक पाॅज हवाच.

मनाला ब्रेक, लगाम किंवा बांध म्हणूयात.

लोकं बांध कोरतात आपण ठाम रहायचं.

आपण लिहिलेल्या, बोललेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी आपली असते.

शांततेचं महत्व ओळखून वागायचं.

हे फक्त कार्पोरेटसाठी नाही. सर्वसामान्य जणांसाठीही.

[email protected]

Previous articleभारतातल्या बायकांना शाहरुख इतका का आवडतो ?
Next articleमेघांनी हे गगन भरता गाढ आषाढमासी…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.