मोरे ते नाकारत नाहीत. सावरकरांचे विचार बाजूला ठेवून देशाला एकही पाऊल पुढे टाकता येणार नाही, हे मोरेंचे ठाम मत आहे. सावरकरांसारखा सर्वंकष विचार करणारा नेता दुसरा नाही, हे ते अनेक वर्षांपासून आग्रहाने सांगत आहेत. अंदमानातील साहित्य संमेलनानिमित्त वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी सावरकरांची वेगवेगळ्या विषयातील मते सविस्तरपणे मांडलीत. सावरकरांचे मोठेपण, महानता याबाबत एकवाक्यता नसली तरी शेषराव मोरेंचं सावरकर प्रेम समजून घेता येतं. विश्व साहित्य संमेलनाच्या उद््घाटनपर भाषणात मात्र त्यांनी आपल्या सावरकर प्रेमाचा अतिरेक करताना एका वादग्रस्त मुद्याला हात घातला. ‘महात्मा गांधी यांच्या हत्येत सावरकरांचा हात होता असे जर कुणी म्हणत असेल तर त्याबाबत पोलिसात तक्रार केली पाहिजे आणि संबंधितांविरुद्ध खटला दाखल केला पाहिजे,’ असे ते म्हणाले. ‘न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून सावरकरांची निर्दोष मुक्तता केली असल्याने सावरकरांवरील हा कलंक दूर झाला पाहिजे,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. एक सावरकरप्रेमी म्हणून मोरे यांच्या भावना समजून घेता येतात. मात्र त्यांच्याबद्दल पुरेसा आदर ठेवून सांगावेसे वाटते की, इतर सर्व विषयांत तर्ककठोर भूमिका घेणारे शेषराव मोरे सावरकरांच्या विषयात अशी भूमिका घ्यायला तयार नाहीत. सावरकरांना त्यांनी श्रद्धेच्या कोंदणात नेऊन बसवले आहे. गांधीहत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली असतानाही सावरकरांचे विरोधक त्यांची बदनामी करण्यासाठी हा मुद्दा वारंवार उकरून काढतात, असे मोरे म्हणतात. मात्र गांधीहत्या विषयातील सावरकरांच्या भूमिकेबाबत इतर विषयांप्रमाणे खोलात जायला मोरे तयार नाहीत. गांधीहत्या प्रकरणात सावरकरांच्या भूमिकेची चिकित्सा करण्याची त्यांची अजिबात तयारी नाही.
लेट्स किल गांधी हे पुस्तक कुठे विकत मिळेल ?
Where shall I find/buy the book…let’s kill gandhi