ग्रेटनेस म्हणजे काय?

Gandhi-150

-उत्पल व्ही .बी.

गांधीजी : काय? चिंतन चाललंय वाटतं?
मी : विचार करतोय जरा.
गांधीजी : कसला?
मी : ग्रेटनेस म्हणजे काय? ग्रेटनेस कशाला म्हणायचं?
गांधीजी : इंटरेस्टिंग.
मी : तुम्हाला काय वाटतं हो? तुम्ही तर ग्रेट वगैरे आहात.
गांधीजी : म्हणजे हा प्रश्न आहे की खेचाखेची आहे?
मी : प्रश्न. विथ अ डॅश ऑफ खेचाखेची.
गांधीजी : बरं… मला वाटतं की योग्य जगणं कसं असावं याचा विचार करता येणं आणि त्याकरता प्रयत्न करणं.
मी : हं.
गांधीजी : पटलेलं दिसत नाही.
मी : उत्तर थोडं क्लिशेड वाटलं.
गांधीजी : वाटलं की आहे?
मी : आहे, आहे.
गांधीजी : बरं, मग तुझं उत्तर काय?
मी : माझं असं म्हणणं आहे की ग्रेटनेस असं काहीच नाही.
गांधीजी : बरं, का?
मी : कारण सर्व काही भौतिक आहे. देअर इज नथिंग मेटाफिजिकल. एव्हरीथिंग इज फिजिकल.
गांधीजी : हं. म्हणजे विचारसुद्धा?
मी : हो. विचार म्हणजे काय? मेंदूत घडणारी विशिष्ट रासायनिक प्रक्रिया.
गांधीजी : ओके. म्हणजे सर्व काही भौतिक-रासायानिक नियमांनुसार, भौतिक-रासायनिक प्रक्रियेने घडतं तर त्यात ‘माझं’ असं काय आहे…बरोबर?
मी : करेक्ट!
गांधीजी : प्रश्न चांगला आहे. पण मग या प्रक्रिया घडवतं कोण?
मी : तो प्रतिसाद आहे. विशिष्ट परिस्थितीला दिलेला.
गांधीजी : हं…म्हणजे आइन्स्टाइन ग्रेट नव्हता तर त्याच्या मेंदूत चालणाऱ्या प्रक्रियेचा तो वाहक होता असं म्हणायचं का?
मी : अं…हो.
गांधीजी : पण मग आइन्स्टाइनसारख्या किंवा त्याच्या जवळच्या परिस्थितीत इतरही लोक असतील. मग प्रतिसाद म्हणून त्यांच्या मेंदूत अशी प्रक्रिया का नाही घडली?
मी : हा चांगला प्रश्न आहे.
गांधीजी : उत्तर?
मी : अवघड आहे. पण त्यांच्या मेंदूत अशी प्रक्रिया घडली नाही म्हणून ते नॉन-ग्रेट कसे?
गांधीजी : अरे, त्यांना नॉन-ग्रेट कोण म्हणतंय? आइन्स्टाइन ग्रेट होता एवढंच म्हटलं जातंय.
मी : हं. पण तरी एक अंडरकरंट असतोच… इतर लोक नॉन-ग्रेट आहेत असा.
गांधीजी : तुला असं नाही वाटतं की तू जरा जास्त कीस पाडतोयस?
मी : हे असं आहे! मी इथे खोलात शिरायला बघतोय तर तुम्हाला कीस दिसतोय.
गांधीजी : माय अपॉलॉजीज…मला असं म्हणायचंय की काही ‘बॉर्न आऊट ऑफ इमोशन’ अशा संकल्पना असतात. कदाचित काही लेबल्स असतात. त्यावर इतका विचार करण्याची गरज नाही.
मी : हं. पण गडबड अशी आहे की कधीकधी कुणालाही ग्रेट म्हटलं जातं.
गांधीजी : पण मग तो म्हणणाऱ्याच्या मेंदूतील रासायनिक प्रक्रियेचा परिणाम नाही का?
मी : बरोबर ना. तुम्हीही आता मी म्हणतोय त्याच बाजूला येताय.ग्रेटनेस हा ‘ठरवला’ जातो. तो ‘असतो’च असं नाही.
गांधीजी : बरं…काय रे, लोक समजतात तितका काही मी ग्रेट वगैरे नाही असं तुला म्हणायचं आहे का?
मी : ते तपासता येईल की.
गांधीजी : बरं, मग तू का नाही तपासत?
मी : मोठंच काम होईल ते. बरेच पॅरामीटर्स लावावे लागतील. कंपॅरिटिव्ह स्टडी करावा लागेल….
गांधीजी : म्हणजे कष्ट आले. त्यापेक्षा नेटफ्लिक्स बघणं सोपं आहे. काय?
मी : तुम्ही चान्स सोडू नका.
गांधीजी : तू काहीही म्हण, पण मी ग्रेट आहेच काही बाबतीत.

Previous articleसावधान…सोशल मीडिया तुमच्यावर ‘वॉच’ ठेवून आहे
Next articleIPC 124 A आणि गर्दभ तिर्थरूपांचे खेचर शिशु !!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.