जीवनशैली

गांधी -150

गांधी कथा

बिहारमध्ये धार्मिक दंगे शांत करण्यासाठी गांधीजी फिरत ह्होते. भेटायला येणार्यांची संख्या नेहमीसारखी कायम होती. त्यावेळी बिहारचे मंत्रीमंडळ गांधीजींना भेटायला आले. स्वतंत्र भारतात मंत्री आणि गव्हर्नर कसे असावेत यावर चर्चा झाली. गांधीजी म्हणाले

१. मंत्री आणि गव्हर्नर यांनी शक्य होईल तोपर्यंत आपल्या देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू वापऱ्याव्यात . त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खादी वापरावी आणि अहिंसेचे चक्र कायम फिरते ठेवावे.

२. त्यांनी दोन लिप्या शिकाव्यात. आपापसातील बोलण्यात इंग्रजीचा वापर करू नये. सार्वजनिक ठिकाणी हिंदुस्तानी बोलावी आणि आपल्या प्रांताच्या भाषेचा वापर मोकळेपणाने करावा. ऑफिसात शक्य होईल तितका हिंदुस्तानी पत्रव्यवहार करावा. आदेश, परिपत्रके हिंदुस्तानीत काढावीत त्यामुळे लोकांचा हिंदुस्तानी शिकण्याचा उत्साह वाढेल. हळू हळू हिंदुस्तानी आपणहून देशाची सर्वमान्य भाषा बनेल.

३. मंत्र्याच्या हृदयात अस्पृश्यता, जातीपाती किंवा हे माझे तुमचे असे भेदभाव नकोत.  सत्ताधार्याच्या दृष्टीने आपला सख्खा मुलगा किंवा भाउ आणि एक सामान्य शहरी मजदूर समानच हवेत.

४. त्यांचे  व्यक्तीगत इतके साधे हवे की ज्याचा लोकांवर प्रभाव पडेल. त्यांनी देशासाठी दररोज एका तास शाररीक श्रम करायला हवेत. मग त्यांनी चरख्यावर सूट कातावे किंवा आपल्या आसपास भाजीपाला लावावा.

५. मोटार किंवा बंगला असू नये. आवश्यक असेल तेवढेच मोठे साधारण घर वापरण्यासाठी घ्यावे. दूर जायचे असल्यास किंवा काही खास कामासाठी जायचे असल्यास मोटार वापरावी. मात्र मोटारचा उपयोग मर्यादित असावा.

६. माझी इच्छा आहे की मंत्र्यांची घरे एकमेकाच्या जवळ असावीत . ज्यामुळे एकमेकांच्या विचारात, कुटुंबात आणि कामात मिळून मिसळून वागता येईल.

७. घरात सर्वांनी हाताने कामे करावीत. नोकरांचा कमीत कमी उपयोग व्हावा.

८. परदेशी आणि महागडे फर्निचर ठेवू नये.

९. मंत्र्यांना कुठल्याही प्रकारचे व्यसनं असू नये. अशा साध्या आध्यात्मिक विचार ठेवणाऱ्या सेवकांचे रक्षण जनताच करेल. सध्या मंत्र्यांच्या घराबाहेर शिपायांचा पहारा असतो. त्यातून खूप खर्च वाढतो तसेच अहिंसक मंत्रीमंडळाला हा धब्बा आहे. पण माझे विचार कोण मानतो. मला मूक साक्षीदार व्हायची इच्छा नाही. मी हे न सांगता राहू शकत नाही.

सौजन्य – विजय तांबे


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Previous articleपटेल व बोस दरम्यानचे विस्मृतीत गेलेले वैर
Next articleगांधी आणि ब्रह्मचर्याचे प्रयोग-आशुतोष शेवाळकर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.