काँग्रेस, फाळणी आणि हिंदुत्ववादी

-उत्पल व्ही. बी.

मी: काय म्हणायचं याला? अरे, काही वाटतं की नाही?
गांधीजी : शांत, मोबाइलधारी भीम, शांत…हुआ क्या है?
मी : अहो, हे अमित शहा लोकसभेत चक्क म्हणतात की काँग्रेसने धर्माच्या आधारावर फाळणी केली म्हणून.
गांधीजी : हां…ते होय.
मी : अहो, हे गंभीर विधान आहे. फाळणी ‘केली’ म्हणजे काय? काँग्रेसने काय चळवळ केली होती का फाळणी व्हावी म्हणून? मुस्लिम लीग आणि जीना यांच्याबाबत अवाक्षरही न काढणारे हे लोक वर स्वतःला हिंदुत्ववादीदेखील म्हणवतात.
गांधीजी : हं…
मी : अहो इथे खुद्द शेषराव मोऱ्यांनी सातशे पानांचा ग्रंथ लिहिलाय आणि म्हटलंय की फाळणीमुळे खरं तर हिंदूहित साध्य झालं जे अखंड भारताने झालं नसतं.
गांधीजी : त्यावर साडेतीनशे पानांचा प्रतिवादही आहे.
मी : आहे ना, पण त्यातही कुठे ‘काँग्रेसने फाळणी केली’ असं नाही म्हटलेलं. लिहिणारे सगळे खंदे अभ्यासक आहेत. फाळणी ही एक प्रोसेस होती. त्या प्रोसेसमध्ये एकमेकांवर कोण कसं भारी पडलं हा अभ्यासाचा विषय आहे. असं एका ओळीत निकालात काढता तुम्ही या विषयाला? तेही लोकसभेत?
गांधीजी : शेषराव मोरे लोकसभेत हवे होते, नाही का रे?
मी : दट्स अ गुड वन!
गांधीजी : जोक्स अपार्ट…पण आता तुमच्यावर मात्र निर्णायक वेळ आली आहे.
मी : कसली?
गांधीजी : निर्णय घ्यायची.
मी : ते कळलं. कसला निर्णय?
गांधीजी : अभ्यासच करत राहायचं की लोकसभेतही जायचं.

Previous articleवैचारिक एनकाऊंटर
Next articleशरद पवारांचे सच्चे अनुयायी गोपीनाथ मुंडे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.