महात्मा गांधींच्या हत्येच्या षडयंत्रातून सावरकरांना वगळणे अशक्य

gandhi savarlarमहात्मा गांधी यांच्या हत्येचे षडयंत्र रचणारे नथुराम गोडसे, नारायण आपटे, बडगे, परचुरे यांना पैसा तसेच शस्त्र उपलब्ध करून देणारे अल्वार आणि ग्वाल्हेर या संस्थानमधील कॉमन लिंक वि.दा. सावरकर हेच होते, असा खुलासा महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला. गांधी हत्येचे सातही प्रयत्न, त्या दरम्यानच्या घडामोडी, खटल्यातील साक्षीपुरावे, कपूर आयोगाच्या नोंदी यांना एकत्रितरीत्या बघितल्यास हत्येच्या षडयंत्रातून सावरकर यांचे नाव वगळणे अशक्य असल्याचे तुषार गांधी म्हणाले.

सेवाग्राम येथील आश्रमात आम्ही सारे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘गांधीच्या कर्मभूमीत.. गांधी समजून घेताना’ या दोन दिवसीय शिबिरात तुषार गांधी बोलत होते. गांधी हत्येची उकल याविषयी त्यांनी आपले मत मांडले. १९३४ पासून गांधीजींच्या हत्येचे झालेले प्रयत्न, तसेच हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तत्सम हिंदुत्ववादी संघटना यांनी गांधी हत्येबद्दल नियोजितपणे प्रसारित केलेले असत्य याचा त्यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. महात्मा गांधी यांची हत्या म्हणजे एक सुनियोजित कट होता. अल्वार आणि ग्वाल्हेरसारखी संस्थाने आणि अनेक मोठय़ा व्यक्तींचा या कटात सहभाग होता. परंतु यात समन्वयकाचे काम वि.दा. सावरकर यांनीच केल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला. वारंवार असत्य सांगितल्याने कालांतराने तेच सत्य वाटण्याचा धोका असतो. गांधी हत्येच्या कारणांबद्दलही तेच होण्याचा धोका असल्याचे तुषार गांधी म्हणाले. परंतु महात्मा गांधींचा पणतू या नात्याने सत्य सांगणे ही माझी जबाबदारी नसून ती सर्व भारतीयांची आहे. महात्मा गांधी ही मला वारसाने मिळालेली संपत्ती नाही. सर्व भारतीयांमध्ये महात्मा गांधींचे रक्त आहे. त्यामुळे बापूंना आत्मसात करणे हाच त्यांना जाणून घेण्याचा एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन तुषार गांधी यांनी केले.

पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यावरून महात्मा गांधींची हत्या करण्यात आल्याचे असत्य पसरविण्यात आले. १९३४ मध्ये गांधी हत्येचा पहिला प्रय▪झाला तेव्हा तर ५५ कोटींचा आणि देशाच्या फाळणीचा मुद्दाच नव्हता. त्यामुळे त्यांच्या हत्येची कारणे वेगळीच आहेत. परंतु गांधी हत्येचे षडयंत्र रचले जात असल्याची माहिती पोलिसांसह गुप्तहेर संस्था व गृहमंत्रालयाला माहीत असूनही त्यांनी याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. नारायण आपटे, नथुराम गोडसेची साधी चौकशी किंवा त्यांना अटकही का केली नाही? २0 जानेवारी १९४८ रोजी हत्येचा प्रय▪फसला पण त्यानंतर प्रत्यक्ष हत्या होईपर्यंत या षडयंत्राकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असे अनेक प्रश्न तुषार गांधी यांनी उपस्थित केले. गांधीजींची हत्या करण्यात आली, याचे दु:ख आहे. परंतु हत्येपूर्वी आणि हत्येनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांचे उत्तर अद्यापही न मिळाल्याचे जास्त दु:ख आहे. जोपर्यंत सत्य बाहेर येणार नाही, तोपर्यंत न्याय होणार नाही असे शल्य तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

महात्मा गांधी यांच्या हत्येच्या षडयंत्राबद्दल बोलताना ते म्हणाले की, आपटे आणि नथुराम गोडसेनी शस्त्रांची ऑर्डर दिली. १८ जानेवारी १९४८ रोजी बडगे या व्यक्तीला गांधी हत्येकरिता निवडण्यात आले. तेव्हा त्याला आपटेंनी सांगितले की, ‘तात्यारावांची इच्छा आहे की, हे काम तुम्हीच करा. ग्वाल्हेरच्या राजाच्या सेनापतींनी बक्षिसात मिळालेली बंदूक काळय़ाबाजाराच्या माध्यमातून गोडसेपर्यंत पोहोचविण्यात आली. आणि त्याच बंदुकीतून गोळी झाडून गांधीजींची हत्या करण्यात आली. खटल्यातील सर्व साक्षीपुरावे उपलब्ध असूनही त्यानंतर सावरकरांना वाचविण्यात आले.

गांधी हत्येची कारणे शोधणार्‍या १९६८ मध्ये कपूर आयोगावरसुद्धा र्मयादा लादण्यात आल्या होत्या. आयोगाच्या निदर्शनास असे आले की, ‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारकडे माहिती आली की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेचे नेते अल्वार संस्थानच्या राजाला भेटले आणि हिंदू राष्ट्र स्थापनेची योजना आखण्यात आली. याच योजनेत महात्मा गांधी अडसर ठरणार असल्याने त्यांच्या हत्येचा निर्णय लगेच पक्का करण्यात आला.’ परंतु या माहितीकडे सरकारने दुर्लक्ष केले होते. कपूर आयोगाच्या इतरही नोंदी आपल्या सरकारने नाकारल्याचे तुषार गांधी म्हणाले.

शिबिराला महाराष्ट्र आणि गोव्यातून आलेल्या शिबिरार्थ्यांसह ‘आम्ही सारे फाऊंडेशन’चे अविनाश दुधे, आशुतोष शेवाळकर, चंद्रकांत वानखडे, लेखक शेषराव मोरे, नाटककार दत्ता भगत उपस्थित होते.

तुषार गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न

३0 जानेवारी १९४८ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता हत्या झाली असताना त्यापूर्वीच दुपारी साडेबारा वाजताच अल्वारमध्ये ‘गांधीजीकी हत्या हुई है, जश्न मनाओ’ अशी पत्रके का वाटण्यात आली ?

अल्वारच्या राजाने नथुरामला ६0 हजार रुपये का दिले ?

ग्वाल्हेरच्या राजाच्या सेनापतीला बक्षीस मिळालेली बंदूक काळय़ाबाजारामार्फत गोडसेपर्यंत कशी पोहोचविली ?

नथुराम आणि नारायण आपटे गोळीबाराचा सराव करताना टार्गेट म्हणून महात्मा गांधींचा फोटो वापरत होते, या माहितीकडे सरकारने दुर्लक्ष का केले?

ल्ल २0 जानेवारी ते ३0 जानेवारी १९४८ या दहा दिवसांत सरकारने कोणतीच कारवाई का केली नाही ?

ल्ल हत्येचे षडयंत्र रचले जात असल्याची माहिती असूनही सरकारने गांधीजींना सुरक्षा व्यवस्था का पुरविली नाही ?

ल्ल २0 जानेवारीच्या घटनेविषयी गृहमंत्रालयाकडे माहिती का नव्हती?

ल्ल ‘हिंदू राष्ट्र’ आणि ‘अग्रणी’मधील अग्रलेखांकडे दुर्लक्ष का केले ?

१९६८ मधील कपूर आयोगाला सत्य सांगण्याची परवानगी का नाकारली?गांधींच्या कर्मभूमीत… गांधी समजून घेताना?वर्धा

 

Previous articleपुरून उरले ते नेमाडेच !
Next articleमस्ती आणि माजोरीला चपराक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here