वेदनेचं आभाळ

संतोष अरसोड

माय…तुझ्या डोळ्यातील
वेदनेचं आभाळ
एकदा माझ्या डोळ्यात
मला साठवायचं
मन बेधुंद होऊन बरसायचं
या कत्तलखोरांच्या वस्तीवर….

माय…तुझ्या खांद्यावरील युगानयुगाचं ओझं पाहिलं की
माझ्या मेंदूत विद्रोहाच्या विजा कडाडतात
व्याजासहित हिशोब चुकवण्यासाठी….

माय ..या काळोखी व्यवस्थेने कधीच रुजू दिले नाहीत
प्रकाशाचे गर्भ
युगानयुगाचा काळोख
कुठवर पित बसायचा माय….

                                          तुझ्या खोल डोळ्यातील अंधार
                                          आता मी दफन करणार आहे
                                          काल परवाच मी तसा सूर्याशी करार केला आहे.

■■■ 9623191923

(कवी मीडिया वॉच अनियतकालिक व वेब पोर्टलचे असोसिएट एडिटर आहेत.)

Previous articleभुतांची पूजा
Next articleराईज अबाव्ह !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.