एबीपी माझाची बातमी आणि त्यासंदर्भातील वस्तुस्थिती संपादक राजीव खांडेकर यांनी स्पष्ट केली आहे. विशेष रेल्वे सोडण्याची बातमी सकाळी नऊ वाजता दाखवली. अकरानंतर तर कोणत्याही ट्रेन सुरू होणार नसल्याची बातमी दिली. त्यामुळे या बातमीमुळे गोंधळ झाला हे म्हणणे पटणारे नाही. आजच्या एकूण वृत्तवाहिन्यांमधील बातम्यांच्या आशयाचे सपाटीकरण आणि सुमारीकरण होत असल्याच्या काळात राहुल कुलकर्णी यांच्यासारख्या पत्रकारामुळे महाराष्ट्राचे काही वेगळे वार्तांकन पाहायला मिळत असते. ते संवेदनशील आणि उत्तम राजकीय, सामाजिक आकलन असलेले पत्रकार आहेत. कुठल्याही एका व्यक्तिच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला मान्य असायला पाहिजे असे नाही. अनेकदा काही गोष्टी स्वतःच्याही मनाविरुद्ध कराव्या लागण्याचा हा काळ आहे. अशा काळात राहुल कुलकर्णी आणि एबीपी माझाच्या कव्हरेजसंदर्भात अनेक मतभेद असू शकतात. परंतु एखाद्या पत्रकाराच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठिशी उभे राहणे हे मला माझे कर्तव्य वाटते.
चोरमारे यांचा लेख उत्तम.अतिशय balanced.चहूबाजूंनी विचार केलेला आणि करायला लावणारा.बाहेर प्रांतातील मजुरांना बसेस करून ताबडतोब त्यांच्या त्यांच्या ठिकाणी पोचवायला हवेच.