रगट जाणिवेत नेणारा असतो. त्यातून त्याला आत्मबळ गवसते आणि आजवर ध्यानात न आलेल्या आत्मशक्तीचे अमर्यायदपण लक्षात येते, असे अॅरिस्टॉटलचे म्हणणे आहे. गांधीजींच्या आयुष्यात अशा साक्षात्काराचा क्षण ७ जून १८९३ या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील पीटरमारिट्झबर्ग या छोटय़ाशा रेल्वे स्टेशनवर आला. तेव्हा ते हिवाळ्याच्या थंडीत कुडकुडत होते. द. आफ्रिका हा देश विषुववृत्ताच्या खाली असल्याने इथले हवामान आपल्याहून वेगळे आणि विरोधी असते.
मोकळी हवा मिळावी, म्हणून गांधी गाडीवानासोबतच्या जागेवर जाऊन बसले. पण ती जागा त्या कोचच्या मालकाची होती. त्याने येऊन गांधींना तिथून ढकलण्याचा प्रयत्न केला. पण मग सिगार ओढायचे लक्षात येऊन त्यानेच कोचातली जागा घेतली. काही अंतर चालून गेल्यानंतर तो पुन्हा बाहेर आला आणि त्याने गांधींना गाडीवानासमोरच्या खालच्या जागेवर बसायला सांगितले. त्याला गांधींनी नकार देताच त्यांच्या बखोटीला धरून त्याने गांधींना कोचाबाहेर फेकले. या वेळी अंगातले सारे बळ एकवटून गांधींनी कोचाचे रेलिंग आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरले आणि काही काळ त्याला लोंबकळत त्यांनी तसाच फरफटत प्रवास केला. पुढे कोचातील इतर प्रवाशांनी त्यांची ती अवस्था लक्षात घेऊन कोच थांबवला व गांधीजींना आत घेतले. जोहान्सबर्गपासूनचा ७३ मैलांचा प्रवासही गांधींना वर्णद्वेषाचा असा दुसरा धडा शिकविणारा ठरला. गांधीजींनी कोचात जागा घेतली आणि गाडीवानाने तो चालू केला. पण साऱ्या प्रवासात त्या गोऱ्यांची गांधींना शिवीगाळ व धमकावणी सुरू होती. रात्र पडेर्पयत त्यांचा कोच स्टँडर्टनला पोहोचला. तिथे दादा अब्दुल्लांच्या सहकाऱ्यांनी त्यांची व्यवस्था एका खासगी जागेत केली. मात्र त्याच वेळी त्यांना प्रिटोरियार्पयतचा प्रवास तिसऱ्या वर्गाने करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. 
याच दरम्यान त्यांनी टॉलस्टॉय आश्रमाची स्थापना केली. या आश्रमात श्वेत, अश्वेत, सर्व धर्माचेचे व जाती-पंथांचे लोक एकत्र राहत, एकत्र जेवत व एकाच तऱ्हेचे जीवन जगत. गांधींची सहजीवनाची व मानवी समतेची चळवळ या त्यांच्या आश्रमीय आयुष्यातूनच सुरू झाली.
great