– उत्पल व्ही . बी .
मी : तसं नाही, तसं नाही. तुम्हाला एक तरी कारण द्यावंच लागेल.
गांधीजी : असं आहे होय. म्हणजे अकाऊंट डी-अॅक्टिव्हेट करताना कारण देणं बंधनकारक आहे.
मी : हो.
गांधीजी : बरं. मग लिहितो. ‘आय विश टू डी-अॅक्टिव्हेट बिकॉज आय विश टू डी-अॅक्टिव्हेट’…काय?
मी : चालेल.
गांधीजी : चला, झालं.
मी ; मग आता काय?
गांधीजी : म्हणजे?
मी : म्हणजे फेसबुक बंद केलंत ना, मग आता काय?
गांधीजी : तुझा हा प्रश्न डिस्टर्बिंगली भेदक आहे.
मी : म्हणजे?
गांधीजी : म्हणजे फेसबुक जीवन व्यापून उरलंय असं काहीतरी सूचित होतंय तुझ्या प्रश्नातून
मी : तसं नाही हो. मला असं म्हणायचंय की आता काही प्लॅन्स आहेत का…
गांधीजी : अजूनही भेदकच आहे प्रश्न. म्हणजे एक पोकळी वगैरे निर्माण झालीय, जगण्याचा एक आधार निखळलाय, आता काय करणार असं काहीतरी तुला विचारायचंय असं वाटतंय.
मी : अहो नाही.
गांधीजी : मग तुला काय विचारायचंय?
मी : मला असं विचारायचं होतं की आता, म्हणजे पुढे…
गांधीजी : काय?
मी : तुमचं बरोबर आहे. प्रश्न भेदक आहे. आय सरेंडर.
गांधीजी : असू दे अरे… त्याची गरज नाही. फक्त यानिमित्ताने एक लक्षात घेशील.
मी : काय?
गांधीजी : आपण हत्यारं वापरायची असतात….
मी : हत्यारांनी आपल्याला वापरायचं नसतं.
गांधीजी : बरोबर! खारीक खाणार का?
मी : नको.
गांधीजी : बरं.