कोरोनाच्या निमित्ताने ‘व्हेंटिलेटर’ नावाची जीवनरक्षक प्रणाली पुन्हा चर्चेत आली आहे. ‘व्हेंटिलेटर’ लावलं म्हणजे पेशंट १०० टक्के गेला, ही ठाम समजूत आपल्याकडे आहे. काही वर्षापूर्वी याविषयात एक मराठी चित्रपट येऊन गेला. त्यात व्हेंटिलेटरवर गेलेल्या रुग्णाच्या घरातील भावनिक आणि व्यावहारिक गुंतागुंत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडण्यात आली होती.
………………………………………………………………
हॉस्पिटल मध्ये कोणी व्हेंटिलेटर वर आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असताना व त्यानंतर ते काढल्यावर व्यक्तीची जगायची शक्यता अगदी नगण्य असते. आणि कुटुंबावर मग संकट आणणारा प्रश्न डॉक्टरांकडून विचारला जातो, व्हेंटिलेटर काढून टाकायचा कि सुरु ठेवायचा. मिनिटा मिनिटाला हॉस्पिटल चे हजारो रुपयांनी बिल वाढत असते आणि भावनेला सुद्धा किंमत लागत जाते.
‘व्हेंटिलेटर’ नावाचा एक सिनेमा आहे.अव्यक्ततेमुळं निर्माण होणारा दुरावा, नात्यातला वाढत जाणारा गुंता आणि अखेर परिस्थितीमुळे नात्यात होणारी उकल हा प्रवास विविध व्यक्तिरेखांच्या साहाय्याने सोप्या पद्धतीने समजावून सांगतो
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गजू काकांना अचानक ब्रेन हॅमरेज होते आणि त्यांचा मुलगा प्रसन्ना (जितेंद्र जोशी) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेतो. प्रसन्ना स्थानिक मंडळाचा अध्यक्ष असल्याने गणेशोत्सवात कोणतंही विघ्न येऊ नये हा त्यामागचा हेतू असतो. छोट्या गावातून आलेला आणि बॉलिवूडमध्ये मोठा दिग्दर्शक बनलेला त्यांचा पुतण्या राजा कामेरकर (आशुतोष गोवारीकर) याला ही बातमी समजते आणि त्याची आपली महत्त्वाची कामं सोडून तोही हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. हळूहळू ही बातमी कोकण आणि कोल्हापूरमध्ये असलेल्या इतर कामेरकर कुटुंबीयांपर्यंत पोहोचते. मग कुणी प्रॉपर्टीमध्ये असणारा इंटरेस्ट म्हणून, तर कुणी गजू काकांवरच्या प्रेमापोटी मुंबईत दाखल होतात. किमान गणेशोत्सव पार पडेपर्यंत तरी गजू काका जिवंत राहावेत यासाठी प्रयत्न सुरु असतात. व्हेंटिलेटर काढल्यावर काका जिवंत राहण्याची शाश्वती नसल्याने ते गौरींनंतर काढावं की अनंत चतुर्दशीनंतर, गजू काकांच्या प्रॉपर्टीचं काय करावं अशा अनेक विषयांवर कुटुंबियांचे वाद रंगतात.
राजकारण आणि वडील या द्विधा मनस्थितीत असलेल्या प्रसन्नाचा स्ट्रगल सिनेमाच्या शेवटापर्यंत अधिकाधिक वाढत जातो. त्याच्या पाठिशी असणारी राजा आणि अश्विन ही भावंडं, प्रसन्नाची बहीण सारिका (सुकन्या मोने) आणि आई (सुलभा आर्य) यांच्या पाठिंब्याने प्रसन्नाने घेतलेला निर्णय हा ‘व्हेंटिलेटर’चा प्रवास आहे. एकीकडे राजकारणामुळे वडिलांपासून लांब गेलेला प्रसन्ना अखेर राजकारणामुळेच त्यांच्या जवळ येतो. तर राजा आणि त्याचे बाबा (सतीश आळेकर) यांचं नातंही याच दरम्यान उलगडत जातं. व्हेंटिलेटरवर किती दिवस ठेवून वाट पाहायची की ते काढायचं हा प्रसंग अंगावर काटा आणतो .वडील-मुलाच्या नात्याची ही हळुवार उकल म्हणजे ‘व्हेंटिलेटर’ हा सिनेमा. त्यानंतर सिनेमात एक प्रसंग आहे एक लहान मुलगा जितेंद्र जोशी ला विचारतो काका तुमचा बेबी असतानाच फोटो नाही का? जितू उत्तर देतो नाही,बहुतेक माझ्या बाबांना मी आवडत नव्हतो किंवा त्या वेळेस त्याच्याकडे कॅमेरा नव्हता.तितक्यता ताडकन व्हेंटिलेटरवर असणार्या गजू काकांच त्याचंच वयाचा भाऊ उठतो आणि म्हणतो पैसे होतो पण … आणि जितू ला व्हेंटिलेटर असलेल्या icu च्या काचेबाहेर नेतो आणि सांगतो ३० वर्षापूर्वी तुझा जन्म सातव्या महिन्यात झाला डॉक्टरांनी सांगितलं बाळाच्या जीवाला धोका आहे. रक्ताने माखलेले तळहातापेक्षा ही छोटं बाळ डॉक्टरांनी बाहेर काढलं,सलाइन च्या ट्यूब पेक्षाही छोट्या नाकपुड्या.नाकातील रक्त काढता काढता डॉक्टर च्या नाकात बाळांनी दम आणला.डॉक्टर मोठा जिद्दीचा बाळं गुदमरण्याच्या आत रक्त साफ करून बाळाचं श्वास सुरू केला.बाळांला वाचवण्यासाठी त्याला कांचेच्या पेटीत ठेवायला लागेल पण मोठी परीक्षा पुढे होती हॉस्पिटल सरकारी असल्यामुळे तिथे काचेची पेटी नव्हती.क्षणांच ही विलंब न करता साध्या कपड्यात गुंडाळून तसाच तुझा बाप समोरच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये ड्रॉक्टर चकित झाले की बाळाला असं कसं आणलं आणि तात्काळ ऍडमिट करून काचेच्या पेटीत ठेवलं,बाळांचे हृदयाचे ठोके लागत नव्हतें ,हात लावला तर कागदासारखी फाटले इतकी नाजूक त्वचा होती.खिडकीतून तुझा बाप जाळयात अडकलेल्या तुला पाहत होता.
डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, १ टक्के चान्स आहे. मात्र काचेच्या पेटीत किती दिवस ठेवायचं हा निर्णय मात्र तुमचा,क्षणभर न घालवता तुझा बाप म्हणाला अहो डॉक्टर मुलगा आहे माझा काही करा आणि वाचवा त्याला. हा १ टक्के चान्स त्यानी तुझ्यासाठी ३० वर्षापूर्वी घेतला.बाप आहे तूझा चुकला असेल म्हणून काय आयुष्यभर राग ठेवता आणि गेला की बसता रडत….
माझ्या मित्राला आठ दिवसापूर्वी मुलगा झाला पण श्वास घेत नव्हता म्हणून काचेच्या पेटीत ठेवलं आहे प्रकुती काहीच सुधारणा नाही त्यात काल पासून अजून अडचणी वाढल्या 8 दिवसाच्या बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे डॉक्टर बोलले काहीच सांगता येत नाही त्यानी आपल्या बापालाही व्हेंटिलेटरवर मरताना पाहिलं आता स्वतःचं लहानसं पोर. त्या बाळाचं एकही आनंदाचा क्षण त्याला अनुभवता आलं नाही येईल की नाही याचीही काही शाश्वती नाही.तो पोटात असताना त्या नवरा बायको नि किती स्वप्नं पाहिले असतील . बाळाच्या नावं काय ठेवायचं, बाळाचे आवडीने घेतलेले कपडे,आजींनी शिवलेल्या जुन्या लुगडाच्या गोधळ्या,मुलगा झाला तर हे नाव,मुलगी झाली ते नाव… आणि बरंच काही…
सालं,कोणाच्याही स्वप्नांचा चुराडा बघताना खूप त्रास होतो.जगातील सर्व धडे, सगळं तत्वज्ञान बाजूला राहतं.