अमरावती जिल्ह्याचा इतिहास, राजकारण, समाजकारण आणि इतरही खूप काही…

 

नक्की पहा…ऐका!

अमरावती जिल्ह्याचा इतिहास, राजकारण, समाजकारण आणि इतरही खूप काही…

00:00 – ट्रेलर
02:41 – कार्यक्रमाची सुरुवात
04:02 – अमरावती जिल्ह्याचा इतिहास
12:04 – डॉ. पंजाबराव देशमुख यांचे
19:13 – पंजाबराव देशमुखांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं
23:22 – दादासाहेब खापर्डे यांच्याविषयी माहिती
31:01 – अमरावतीचे सांस्कृतिक श्रेष्ठत्व
35:53 – अमरावती हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला कसा ढासळला
39:28 – प्रतिभाताई पाटील यांच्याविषयी माहिती
40:42 – शिवसेनेची अमरावतीत एंट्री कशी झाली?
45:44 – नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राविषयी…..
52:06 – रवी राणा यांच्याविषयी
59:40 – जातप्रमाणपत्राचा प्रश्न
01:01:44 – अमरावतीमधले ध्रुवीकरण
01:06:51 – बच्चू कडू यांच्या राजकारणाविषयी
01:12:35 – अमरावतीमधील शेतकरी आत्महत्याविषयी
01:12:38 – शेवट
जिल्ह्याचं राजकारण या ‘बोल भिडू’ च्या विशेष सिरीजच्या या भागात जाणून घेऊयात, अमरावती जिल्ह्याचं संपूर्ण राजकारण. असलेला अमरावती लोकसभेचा इतिहास पाहिला तर सुरुवातीला हा मतदारसंघ काँग्रेसचा हक्काचा बालेकिल्ला होता. १९९६ ला मात्र पहिल्यांदा या मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेचे अनंतराव गुढे येथून खासदार झाले. त्यानंतर हळूहळू इथे शिवसेनेचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली. २००८ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत अमरावती मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आला. त्यानंतर २००९ आणि २०१४ ला शिवसेनेचे आनंदराव अडसूळ इथून खासदार झाले २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर इथून नवनीत राणा अपक्ष खासदार झाल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सध्याची इथली राजकीय समीकरणं आणि अमरावती लोकसभेचा इतिहास जाणून घेऊयात पत्रकार अविनाश दुधे यांच्याकडून.

 

Previous articleचाकोल्या…
Next articleभारतीयत्वाचा जयजयकार व्हावा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.