एकच मिशन शेतकरी आरक्षणाची संकल्पना
सध्या महाराष्ट्राच राजकारण आरक्षणाच्या वणव्यात होरपळून निघालेले आहे. एकीकडे मनोज जरांडे पाटील मराठा आरक्षणाची मागणी रेटून धरत आहे तर दुसरीकडे ओबीसींच्या वाट्यात कुणालाही आरक्षण नको, अशी मागणी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी रेटून धरली आहे. तर तिसरीकडे धनगर समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यांना आरक्षण देऊ नये म्हणून आदिवासी समाजानेही आंदोलन सुरू केले आहे. मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे अशा परिस्थितीत २०१७ मध्ये सेवाग्राम येथून सुरू झालेल्या ‘एकच मिशन शेतकरी आरक्षण’ च्या वतीने शैलेश अग्रवाल यांनी ‘आरक्षण जातीला नव्हे मातीला द्या’, अशी भूमिका मांडून प्रश्नावर संपूर्ण देशात जनजागृती केली मातीला आरक्षण म्हणजे नेमकं काय ही भूमिका मांडताना त्यांनी देशातील शेतकऱ्यांना आरक्षण द्या अशी मागणी केली आहे. शेतकरी स्वयंपूर्ण झाला स्वावलंबी झाला तर आपोआपच त्याला आर्थिक सामाजिक आरक्षण मिळून जाईल, अशी यामागची धारणा आहे. देशाच्या पंतप्रधानासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी या अनुषंगाने १४ सुत्री कार्यक्रम तयार करून पाठविला आहे मागील पाच वर्षापासून ते या प्रश्नावर सातत्याने लढा देत आहे. त्यांच्या या मसुद्यातील अनेक मागण्या काही राज्यांनी स्वीकार करून त्या शेतकऱ्यांसाठी लागूही केल्या. परंतु संपूर्ण आराखडा देशात लागू केल्यास आरक्षणाची मागणीच देशाच्या कोणत्याच राज्यात राहणार नाही असा दावा शैलेश अग्रवाल करतात.
त्याच्या१४ सूत्री कार्यक्रमात शेतीपासून ते शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणापर्यंत व शेतकऱ्याच्या आरोग्यापर्यंत तसेच पिक विमा योजने पासून शाश्वत उत्पन्न पर्यंत साऱ्या गोष्टीचा समावेश आहे. देशाच्या विविध राज्यात ५० टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे ही संपूर्ण लोकसंख्या या १४ सूत्री मसुद्यात बसून त्यांना सुखी व समृद्ध करण्याचा मार्ग या मातीच्या आरक्षणात समाविष्ट आहे त्यामुळे शेती आरक्षण हा नवा मुद्दा सध्या चर्चेला आला आहे.
www.Kisanarakshan.com
http://www.facebook.com/ kisanarakshan
या संकेतस्थळावर संपूर्ण शेतकरी आरक्षणाचा मसुदा उपलब्ध आहे.
