मी नथुराम गोडसे बोलतोय!

– यतिन
परवा रात्री ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पाहिले. डोक्याचा खोका करून बघायला सुरूवात केली. जसजसा कृणाल लिमयेचा ‘नथुराम’ रंग भरू लागला, तसतसे डोके पार भडकून जायला लागले. राग राग झाला. पंडीत नथुराम गोडसे काळजात खोल रूतून बसले. गांधीबद्दल तिरस्कार वाटू लागला. कालपर्यंत माझ्यासाठी पूज्य असणारा महात्मा आता ‘पापात्मा’ झाला.
हिंदुस्थानच्या फाळणीचा खरा गुन्हेगार केवळ आणि केवळ मोहनदास गांधीच होता, याबद्दल काही शंकाच राहिली नाही. या विषयाबद्दल माझे काहिही वाचन नाही, पण जेव्हा मी हे नाटक बघितले, तेव्हाच सारा मामला माझ्या लक्षात आला. अजून काहिही वाचायचे राहिले नाही. आता मी आयुष्यभर पापात्मा गांधीला शिव्या द्यायला मोकळा झालोय, असे मनापासून वाटू लागले. जे गांधीचे नाव लावतील, त्यांनाही शिव्या देणे हे माझ्यासाठी पुण्याचीच गोष्ट झाली आहे.
कालचेच पहा, मी माझ्या नवविवाहित बायकोला याबद्दल सांगितले, तर तिने मला अंचबितच करून सोडले…
ती म्हणाली, ”मला पहिलीपासूनच ठावुक होते हे. त्यात काय विशेष? पं. नथुराम गोडसे हे कट्टर हिंदू होते. त्यातही ते आपल्या जातीतले होते. आपल्या जातीचा त्यांना फार अभिमान होता. हिंदूहित हे त्या महात्म्याचे प्राधान्य होते, पण ब्राह्मणहिताचा त्याग करून नव्हे, हे मला माझ्या बाबांनी सांगितले. सावरकरांचे ते कट्टर अनुयायी होते. मोहनदास गांधी समाजातील आपल्या वर्चस्वाला आड येत होता. ब्राह्मणांनी फार कष्ट करून समाजात हे वर्चस्व स्थापित केलं होतं. हा गांधी ते मोडायला निघाला होता. एवढंच नव्हे तर हा वैश्यवाणी आंतरजातीय लग्नही लावत होता. त्याची अट काय, एक पार्टी दलित असली पाहिजे. आणि लग्नात पुरोहितबुवा हे दलितच असावयाचे. म्हणजे सार्‍या दृष्टीने या महाराजांनी धर्म भ्रष्ट केला.
ब्राह्मणोस्यमुखमासीद… पद्भ्यांशूद्रोअजायत… पायांपासून निघालेल्या भंगी, सुतार, चांभार, दलित, महार, आदीवासी वगैरे शूद्रातिशूद्र- अस्पृश्यांना त्यांच्यात राहून त्यांना वर काढत होता. त्यांना ‘हरिजन’ नाव दिले होेते त्याने. देवाचे लोक.
आपल्या लोकांनी विचारले, मग आम्ही कोण? तो उत्तरला, जर तुम्ही या लोकांची सेवा करून तुमच्या बरोबरीने वागवाल, तेव्हा तुम्हीही हरिजन व्हाल. वा हो वा! धर्मबुडवा आपल्या पापात आम्हाला सहभागी व्हायला सांगत होता. आपली काही लोकं भुललीही याला. अशावेळी आमची आग मस्तकात जाणार नाही का?
कोणतीही कामं लहान नाहीत, असे तो सांगत होता व भरीस भर त्या म्हारड्यांची कामे हा वाणी स्वतःच करत होता… शिव शिव शिव, या धर्मबुडव्याला ‘मोक्ष’ हा दाखवायलाच हवा होता.
बायको अशा भाषेत सांगत होती की मला साक्षात हिंदुशिरोमणीच तिच्या तोंडातून वदत आहेत असा भास झाला.
”आपल्या पूर्वजांनी पाडून ठेवलेल्या रूढींच्या विरूद्ध हा मोहनदास चळवळ करीत होता. त्याची ही पापं सकलहिंदुशिरोमणी देशभक्त..” मी म्हणालो, ”हो. त्या नाटकातही त्यांनी अनेक लढ्यांत सहभाग नोंदवलाय असं सांगितलंय” बायको म्हणाली, ”हं.. मधेमधे अडवू नका मला.. तर आपल्या पूर्वजांनी पाडून ठेवलेल्या रूढींच्या विरूद्ध हा मोहनदास चळवळ करीत होता. त्याची ही पापं सकलहिंदुशिरोमणी देशभक्त महात्मा पं. नथुराम गोडसेंच्या हस्ताने पावन झालेल्या बंदुकीनेच त्याचा वध होऊन फिटली जाणार होती. हे विधिलिखितच होते. ईश्वराचीच प्रेरणा होती ही, यात काहीच शंका नाही. पं. नथुराम गोडसे हे काहिही झाले तरी माणूसच होते. त्यातही ते ब्राम्हण व त्यातही कोकणस्थ !” बायकोने हे गुपित सांगितल्यावर माझी अर्थातच कॉलर ‘टाईट’ झाली. ”आता माणूस म्हटल्यावर चुकतोच, नाही का? अनेक प्रयत्न केल्यावरच यश मिळते. फळाचं ‘पुण्य’ पदरात मिळतं. हिंदुशिरोमणी देशभक्त महात्मा पं. नथुराम गोडसेनी १९३० पासून हिंदुधर्माला कलंक असणार्या त्या मोहनदासचा वध करण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. त्यांच्याबरोबर त्या कामांत हिंदुधर्मरक्षकही होते. ”
मी म्हणालो, ”अगं मला एक सांग..त्या बाकीच्या हिंदुधर्मरक्षकांत व पंडितजींत फरक कशाला करतेस? आणि गांधीवधाच्या सगळ्या प्रयत्नांवेळी ५५ कोटींचा विषय होता का? कारण पंडितजी विभाजनाशिवाय वारंवार ५५ कोटींचा उल्लेख करतात त्या मोहनदासाच्या वधासाठी, कारण म्हणून.”
बायको- ”हो. फरक एवढ्यासाठीच, की पंडितजींएवढा हिंदुधर्माचा महान रक्षक, महात्मा जगात, इतिहासाच्या पाठीवर झालाच नाही. म्हणून फरक हा करावाच लागतो. थांबा.. आपल्या शेवटच्या दिवसांत वेड्या झालेल्या माझ्या बाबांनी जायच्या आधी आपली #गांधीवध हे शिर्षक असलेली एक जुनी वही दिली होती. ‘ही वही उघडशील तर खबरदार, शाप लागेल!’ असे महर्षी दुर्वासांच्या थाटात त्यांनी जाता जाता सांगितले होते. हे शब्द उच्चारूनच त्यांनी हसत हसत प्राण सोडला. मी भ्यालेच. शाप बाधेल म्हणून मी कधी उघडलीच नाही. थांबा हा.. अालेच… उघडूया आता.. वधाच्या प्रयत्नांच्या घटनांचा उल्लेख आहेसे वाटते… यानंतर पंडितजींना आम्ही महात्मा का म्हणावे, त्यांची महानता कशात आहे तेही स्पष्ट होईल.”
आजूबाजूची शेजारची मंडळी आपापल्या पोराबाळांसकट आमच्याकडे जमली होती. मघापासून भोवती गोळा होऊन आ वासून सारे पाहत होती. मी तुम्हाला मघाशी हे सांगायला विसरलो. क्षमा करा. ही मंडळी आमच्याकडे रोज येतात चकाट्या पिटायला संध्याकाळची. आज मीच जरा त्यांना याचसाठी लवकर बोलावले होते. चहापाण्याची व्यवस्था हिने आधीच केली होती. त्यांना हे नवेच होते. शिक्षणाच्या पुस्तकांत तर सगळ्यांनाच खोटा इतिहास शिकवला जात होता. गांधीला शिक्षणाने ‘महात्मा’ बनवले होते. आज या सर्वांना सुशिक्षित करून टाकायचेच या उद्देशाने मी लवकरच बोलावले होते. त्यांनाही खरा इतिहास कळायला हवा होता. असत्याचे प्रयोग करणारा, आत्यंतिक अहिंसेची राष्ट्राला शिकवण देणारा मोहनदास गांधी हा पापात्माच होता हे आम्ही त्यांना सांगितले. एव्हाना आमच्या या वारंवार बतावणीला ते छान फसले होते. त्यांच्या मुलांनी तर ‘गांधीगंदी गंदीगांधी’ अशी मोहनदासच्या नावाची विटंबना चालवली होती. आम्ही दांपत्य खो-खो हसत होतो. त्या पोराच्या आईवडिलांनी तर ठाम निश्चय केला, कि काहीही होवो, असा चुकीचा इतिहास आम्ही मुलांना शिकू देणार नाही.
बायकोने सुरू केले –
‘‘हिंदीत आहे… आमचे बाबा उत्कृष्ट हिंदी बोलीत… गांधीच्या तिटकारा करणाऱ्याना, आमच्या गांधीविरोधक साहित्यिक मंडळीत गाजलेल्या फार सुंदर कथा आहेत बरं त्यांच्या!… त्यांना ना…’’
हिला मी मध्येच अडवले ‘त्यांनी काय लिहिलंय ते वाच आधी. मंडळींना उशीर होतोय जायला.’’
बायको- ‘‘ गांधी हत्या के प्रयासोंपर रचित प्रश्नोत्तरी- भाग एक
प्रश्न – गोडसे ने कहा है कि उसने
१. गांधीजी द्वारा देश का विभाजन करने तथा इसे स्वीकार करने और
२. पाकिस्तान जिसने भारत के विरूद्ध युद्ध छेड रखा था, उसे उसके हिस्से के ५५ करोड रूपये भारत सरकार से दिलवाने के कारण गांधी की हत्या की। ये दोनों मुद्दे ऐसे थे कि किसी का भी खून खौल जाय। इस सम्बन्ध में आपको क्या लगता है ?
उत्तर – गांधीजी की हत्या के आठ प्रयास हुए । इसमें से तीन प्रयासों में नाथुराम गोडसे शामिल था और उन सभी प्रयासों के लिए पुणे के कुछ कट्टर रूढीवादी जिम्मेवार थे। हत्या के छह में से चार प्रयासों के समय देश के विभाजन एवं ५५ करोड रूपयों की बात स्वप्न में भी नहीं थी, फिर उस समय हत्या के प्रयत्नों के कारण क्या थे ? संक्षेप में कहें तो एक अंग्रेजी कहावत याद आती है – Any Excuse serves an evil-doer – पापी को पाप करने के लिए बहाना चाहिए। यह तो कहीं भी और कभी भी मिल सकता है। उसे हत्या करनी थी, जो भी बहाना हो। हत्या के बाकी प्रयत्न हुए तब क्या था ?
हत्या के प्रयत्नों की लिखित घटना निम्न प्रकार है
१. १९३४ में पुणे नगरपालिका द्वारा गांधीजी को सम्मानित करने के लिए आयोजित समारोह में जाते समय बम फेंका गया। भूल से बम अगली गाडी पर लगा पर गांधीजी पिछली गाडी में थे। इस घटना में नगरपालिका के मुख्य अधिकारी तथा दो पुलिसकर्मी सहित कुल सात लोग गंभीर रूप से घायल हुए। इस हमले के समय विभाजन या ५५ करोड की बात कहां थी ? बावजूद उसके यह प्राणघातक हमला किया गया।
२. जुलाई १९४४ में गांधीजी जब पंचगनी में थे तब एक दिन छुरा लेकर एक व्यक्ति गांधीजी के सामने आ गया। यह आदमी नाथुराम गोडसे था, ऐसी गवाही पुणे के सुरती लॉज के मालिक मणिशंकर पुरोहित ने दी थी। महाबलेश्वर के कांग्रेस के भूतपूर्व सांसद एवं सातारा जिला मध्यवर्ती बैंक के तत्कालीन अध्यक्ष श्री. भि. दा. भिसारे गुरूजी ने नाथूराम के हाथ से छुरा छीन लिया था । गांधीजी ने इसके बाद तुरन्त ही नाथूराम गोडसे को मिलने के लिए बुलाया। परन्तु वह नहीं आया।
जो लोग आज कहते हैं कि विचार का जवाब विचार से देना चाहिए, उन लोगों को इस घटना को याद करना चाहिए। गांधीजी तो मिलने आनेवालों से हमेशा मिलते ही थे, बावजूद इसके नाथूराम नहीं मिला, यह एक हकीकत है। इस बार भी विभाजन या ५५ करोड रूपयों की बात नहीं थी। फिर हत्या का प्रयास क्यों?
३. तीसरा प्रयास सितम्बर १९४४ में हुआ। गांधीजी मुहम्मद अली जिन्ना से वार्ता के लिए बंबई जाने वाले थे। उस अवसर का गलत फायदा उठाने के लिए पुणे का एक ग्रुप वर्धा गया था। इनमें एक व्यक्ति ग. ल. थत्ते के पास से पुलिस को छुरा मिला। थत्ते का कहना था, यह छुरा उसने उस गाडी के टायर को फोडने के लिए रखा था जिसमें गांधीजी जाने वाले थे। परन्तु गांधीजी के निजी सचिव श्री. प्यारेलाल लिखते है कि उस दिन सबेरे उनके पास पुलिस अधिकारी डी.सी.पी. का फोन आया कि प्रदर्शनकारी अमंगलकारी घटना की तैयारी करके आये थे। गांधीजी का आग्रह था कि वे अकेले प्रदर्शनकारियों के साथ चलते-चलते जायेंगे एवं जबतक प्रदर्शनकारी उन्हें गाडी के अंदर बैठने की अनुमति नहीं देंगे तब तक उनके साथ ही चलते रहेंगे। परन्तु गांधीजी के निकलने का समय होने से पहले ही पुलिस ने प्रदर्शनकारियों को पकड लिया। इस समय विभाजन को स्वीकार करने या ५५ करोड रूपयों की बात कहां थी?
४. २९ जून १९४६ को चौथा प्रयत्न किया गया। गांधीजी एक विशेष रेलगाडी द्वारा बम्बई से पुणे जा रहे थे। तब नेरल एवं कर्जत स्टेशन के बीच रेलवे लाईन पर बडे-बडे पत्थर रखकर गाडी को गिराने का षडयंत्र किया गया। रात का समय होने के बावजूद ड्रायवर की सावधानी के कारण दुर्घटना नहीं हुई पर इंजिन को क्षति पहुंचने की बात स्वीकार की गयी है।
इस बार पाकिस्तान के सुझाव को लेकर वार्ता चल रही थी। यह ठीक है, पर गांधीजी विभाजन के कट्टर विरोधक थे, यह भी उतना ही सत्य है। उन्होंने सार्वजनिक तौर पर कहा था कि, विभाजन उनकी लाश पर होगा। विभाजन को टालने के लिए उन्होंने माऊंटबॅटन को यहां तक सुझाया कि प्रधानमंत्री का पद जिन्ना को सौंपकर अंग्रेज भारत से चलें जाएं। यानी समझौता की ही बात थी। विभाजन को कतई स्वीकार नहीं ही किया गया था। और ५५ करोड कि बात तो उस समय सपने में भी नहीं थी। फिर हत्या का प्रयास क्यों किया गया था? इस घटना के बाद प्रार्थना-सभा में इसका उल्लेख करते हुउ गांधीजी ने कहा, ‘‘मैं सात बार इस प्रकार के प्रयासों से बच गया हू। मैं इस प्रकार मरने वाला भी नहीं हूं, मैं तो १२५ वर्ष जीने वाला हूं। ’इस बात का उल्लेख नाथूराम गोडसे ने अपने मराठी सामयिक ‘अग्रणी’ में करते हुए लिखा- ‘परन्तु जीने कौन देगा?’ यानी गांधीजी की हत्या का निर्णय उसने कब का कर लिया था।
५ एवं ६. मदनलाल पहवा ने जनवरी २०, १९४८ को बम फेंक कर हत्या का असफल प्रयास किया। ३० जनवरी को नाथूराम गोडसे ने गांधीजी की हत्या की। १२ जनवरी १९४८ के बाद हुई इन घटनों के प्रसंग में विभाजन एवं ५५ करोड का मुद्दा उपस्थित हुआ था, इससे पहले यह कभी नहीं था। इससे यह स्पष्ट रूप से समझा जा सकता है कि हिन्दूवादी हत्या का षड्यंत्र वर्षों से करते आये थे। उन्हें तो अपने पाप को ढकने के लिए बहाने की आवश्यकता थी। जिस वक्त जो मिला वही सही।
गांधीजींच्या हत्येचं असू शकत असलेलं प्रमुख कारण –
‘‘नया युग अपने साथ नये प्रश्न लेकर आया था, जिन्हें सुलझाने के लिए नये चिन्तन और नये दृष्टिकोण की आवश्यकता थी। पुराने तरीकों से काम चलने वाला नहीं था।.. इस माहौल में गांधीजी आये। उनकी ईश्वर-परायणता एवं धर्म-परायणता किसी भी हिंदू से कम नहीं थी। वे अपने को आग्रहपूर्वक सनातनी हिंदू कहते थे। लेकिन उनका सभी धर्मों के प्रति समान आदर और पूज्यभाव था।.. एक व्यापक मानव-धर्म उनकी वाणी तथा आचार से परिलक्षित होता था। उनकी वाणी और व्यवहार से विज्ञान-युग के अनुरूप जीवन-दृष्टि अभिव्यक्त होती थी। गांधीजी की इस व्यापक भूमिका के सामने संकीर्ण हिन्दूवाद टिक नहीं पाता था और हिन्दू धर्म के ठेकेदार इसे बर्दाश्त नहीं कर पा रहे थे।’’
गांधीजी क्षमा करा !
जीवनाच्या अंतिम काळी स्वीकारलेल्या गांधी तत्वज्ञानाचा निष्ठावंत पाईक
हे सगळे ऐकल्यावर आम्हा साऱ्यांचीच तोंडात केवळ बोटे घालायचीच बाकी उरली होती! खूपच शरमिंदे झालो होतो दोघेही…
सगळ्यांनी मग बापूंचे आवडते ‘वैष्णव जन तो’ हे संत नरसिंह मेहता यांचे भजन एका सूरात गाईले.
संदर्भ – गांधी की हत्या क्या सच, क्या झूठ (लेखक-चुनीभाई वैद्य)
एक विनम्र सूचना – ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे युट्वयूबवर अगदी सहज उपलब्ध असणारे भडकावणारे हिंसक, खोटेपणावर बेतलेले ‘नाटक’ कृपया कोणीही बघू नका. बाल-तरूणांनी तर नाहीच नाही. त्यांना कुणीही दाखऊ नका. फार विपरीत परिणाम होतो त्यांच्यावर. मला अनुभव आहे मित्राचा, म्हणून सांगण्याचे मी धाडस करू धजतोय. नेटवरूनही सर्वथा ‘बॅन’ झाले पाहिजे हे नाटक. सर्वांना विनंती की ते नाटक ‘रिपोर्ट’ करा. धन्यवाद.
#यतिन
सौजन्य -राजन साने
Previous articleतरुण तेजपाल ते मुबश्शर अकबर !
Next articleबेगाने शादी, अब्दुल्ला दिवाना?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.