हरवलेल्या भावना..मी एक स्त्री.

विनित वर्तक….

फेसबुक मध्ये एक स्त्री म्हणून एक अकौंट काढावं आणि एक छानसा फोटो टाकावा कि आपला इनबॉक्स भरायला वेळ लागत नाही. कोणीही येत गुड मॉर्निंग करत. कोणीही येत मला तू आवडते सांगते. कोणीही येत माझ तुझ्यावर प्रेम आहे सांगते, कोणीही येत तुझ्याशिवाय माझ जग नाही सांगते, कोणीही येत तूच माझी राणी म्हणते. कोणीही येत माझ तुझ्यावर डिव्हाईन प्रेम आहे सांगते. कोणीही येत आणि मला तुझ्याबरोबर सेक्स करायचा आहे सांगते. कोणीही येत तू एकटी आहेस आणि मीच तुला खांदा देऊ शकतो अस सांगत. कोणीही येत माझ्याशिवाय मी तुला कोणाचीही होऊ देणार नाही सांगते. बर हे सगळ कोणी एकटा माणूस नाही तर रोज असे १०-२० मेसजेस तरी इनबॉक्स मध्ये धडकत असतात. आपण कोणाला इग्नोर कराव आणि कोणाला ब्लॉक?

कोणतीही स्त्री दिसली कि ना ओळख, ना पाळख, ना तिच्या आयुष्याविषयी काही माहिती, ना तिच्या मनाची अवस्था. थोड छान बोलण झाल कि लगेच ती अव्हेलेबल आहे. ती कुठेतरी झुरते आहे स्पेशली तिच्या शारीरिक संबंधात आणि मीच तो काय हिरो जन्माला आलो आहे जो तिच्या सगळ्या माहित नाही पण निदान शारीरिक संबंधातील गरजा पूर्ण करू शकतो अश्या आविर्भावात आज प्रत्येक पुरुष बिनधास्तपणे स्त्री च्या समोर पहिल्या काही तासात उभा रहातो. तू एकटी आहेस आणि तू मला आवडतेस अस म्हणत तुझ्यासाठी माझ्या कुटुंबाला बाजूला टाकून मी सगळ काही करू शकतो. नाहीतर माझ्याकडे हे आहे ते आहे. माझ समाजात हे स्टेटस आहे. तूच माझी गरज भागवू शकते हे सांगत गोष्टी कुठूनही सुरु झाल्या तरी शरीर शरीर संबंधान पर्यंत येऊन थांबतात. हे मी नाही तर फेसबुक वापरणारी प्रत्येक स्त्री तुम्हाला सांगू शकेल.

ह्या सर्वात वयाच काहीच अंतर नाही. नुकतीच मिसरूड फुटलेला २० वर्षाचा तरुण ५० वर्षाच्या स्त्री ला तर ६० ला पोचलेला एक पुरुष एका १८ वर्षाच्या स्त्री शी बोलताना फक्त तिकडेच येऊन थांबतो. तिथवर येण्याची पद्धत प्रत्येक पुरुषाची वेगळी असेल पण शेवटच स्थानक मात्र सेक्स. ना ओळख ना पाळख पण प्रेम व्हायला आणि आवड निर्माण व्हायला एक फोटो किंवा एक च्याट किंवा एक भेट पुरेशी असते आजकाल सगळ्यांना. समोरच्याला काय वाटेल, काय वाटते ह्याचा काहीच विचार नाही. आपण आपल्या भावना फक्त व्यक्त करायच्या. समोरच्याने काही विचार करण्याअगोदर आपण गादीवर जाऊन पोचलेले असतो.  इतका उतावीळपणा?? कॉलेज ला जाणारे किंवा नुकतच तारुण्यात प्रवेश केलेल्या तरुणान कडून हे व्हाव हे एकवेळ समजू शकतो. त्या वयात येणाऱ्या भावनांना मोकळीक मिळण्यासाठी वेळ असताना किंवा मिळत नसताना त्या अश्या रीतीने बाहेर येण कदाचित एकवेळ समर्थनीय पण आयुष्य कोळून प्यायलेल्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टींची चव चाखलेल्या पुरुषांनकडून पण त्याच तर्हेचे वर्तन होत असेल तर आपल्या भावना हरवलेल्या आहेत हे नक्की.

पूर्वी स्त्री आवडली तरी स्वतःच्या भावना तिच्या पर्यंत पोचवायला अनामिक भीती असायची. किंबहुना स्त्री काय प्रतिक्रिया देईल ह्यातच आयुष्याची अनेक वर्ष वाया जात. आज उलट झाल आहे. तिला काय वाटेल हा विचार करण्याची गरजच पुरुषाला वाटत नाही. मला काय वाटते ते तिने ऐकावं आणि तसच कराव. नाही ऐकल तर तिला सोडणार नाही अश्या आविर्भावात अनेक पुरुष असतात. ती काय जागा, जमीन आणि वस्तू आहे का? हक्क गाजवायला. एखादी स्त्री आवडण ह्यात चुकीच काय? अगदी पहिल्या भेटीत तिने मनाचा ठाव घेण ह्यात हि चुकीच काहीच नाही. पण त्या भावना त्याच तरलतेने, त्याच हळुवार पद्धतीने आपण मांडतो आहोत का? ह्याचा विचार प्रत्येक पुरुषाने करावा. आपली आवड हि फक्त सेक्स पुरती मर्यादित आहे कि खरच एक स्त्री म्हणून ती आपल्याला आवडते ह्याचा हि त्यात विचार असावा.

पोर्न बघून बघून आपले विचार ज्या वेगाने मशीन होत आहेत ते खूपच धक्कादायक आहे. एकेकाळी हळुवार उमलणाऱ्या आपल्या भावना आता कुस्करून आपण बाहेर आणत आहोत. एक एक पाकळी हळुवार उमलण्याची मज्जा न घेता आपल्याला फक्त फुलाला चाखायच असते. कारण आपल्या भावनाच संपल्या आहेत. एक फुल झाल का दुसर ह्याच्या शोधात अनेक जण भटकत असतात. हेच अनेकजण एकाचवेळी एकाच फुलाच्या आंगावर धडकत असतात. कधीतरी फुल होऊन विचार केला तर हे सगळ बघून त्या सगळ्यांचा किती तिटकारा वाटत असेल ह्याचा अंदाज पण आपण लावू शकत नाही. आपला स्लेफ रिस्पेक्ट अश्या बाजारू बाई प्रमाणे पायदळी तुडवला जात असेल. तर शांत तरी किती वेळ राहायचं आणि कोणासाठी?

आपण आपल्या आत झाकून बघायला हव. आपण जर उठून रोज १० स्त्रियांना ज्यांच्याशी आपला किंवा त्यांचा आपल्याशी जास्ती काही संबंध नसताना. त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसताना नुसतच जर आयुष्यात डोकावण होत असेल तर आपण कुठेतरी आपल्या भावना शोधायला हव्या. ज्या कधीच आपल्यातून हरवल्या आहेत. रिस्पेक्ट, डिग्निटी जपण आणि त्याचा सन्मान करण हे कोणत्या शाळेत शिकवलं जात नाही. तर ते शिकावं लागते. फेसबुक असो वा खर आयुष्य. समोर येणारी कोणतीही स्त्री हि अव्हेलेबल नसते. तिला सहानभुतीची गरज नसते, तिला शरीरसंबंधात कोणाची तरी अजून गरज नसते. हे बाजूला ठेवून आपण जेव्हा संवाद साधू तेव्हा हरवलेल्या भावनांचा शोध आपण पुन्हा घ्यायला सुरवात करू अस मी म्हणेन.

Previous articleधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही…
Next articleअसिफा, मी अन माझी लेक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.