दादा तुम्हाला नम्रपणे सांगायला हवं… ‘दादा, तुम्ही वेगळा गट केलात तेव्हा पवारसाहेबांचा फोटाे लावून मिरवत होतात…’ पवारसाहेबांनीच हरकत घेतली… म्हणून त्या जागेवर आता यशवंतराव चव्हाणसाहेबांचा फोटो आला… कुठे ते यशवंतराव चव्हाणसाहेब… आणि कुठे आताचा कारभार… कशाची काही तुलना होऊ शकते का दादा…? खूप लिहिता येईल… पण एवढे मात्र नक्की… तुमच्या बाजूने सगळी ‘दाने’ पडली तरी सगळ्यात महत्त्वाची या महाराष्ट्रातील माणसाची जी शक्ती आहे ते म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला एका मताचा अधिकार… जगातील सर्वोच्च न्यायालयाच्या पेक्षाही आणि जगातील कोणत्याही सरकारपेक्षाही हे एक मत सगळ्यात भारी असे ‘शासन’ आहे. शासन बनवणारे ते आहे. आणि चुकीचे वागणऱ्या भल्याभल्यांना त्यांची जागा दाखवून देणारेही तेच एक मत त्यावेळी शासनच बनते. म्हणून तर अनेकजण पराभूत झाले. ते सामान्य माणसांनीच केलेत…