राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिका : सामाजिक संचित निर्माण करणारी चळवळ

-डॉ. प्रशांत रोकडे

राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिका ही एक चळवळ आहे. सामाजिक संचित निर्माण करणारे हे एक मोठं आंदोलन आहे. (A movement for creating social asset) यापूर्वीही अशा प्रकारचे प्रयत्न काही सामाजिक, धार्मिक चळवळींकडून झालेत, परंतु ते अतिशय मर्यादित स्वरूपाचे होते. It was confined, temporal as well as individual. या पार्श्वभूमीवर अतिशय क्रियाशीलपणे आणि दृश्य स्वरूपाचे परिणाम घडवून आणणारे भारतातील आंबेडकरी चळवळीतील एकमेव सामाजिक संचित निर्माण करणारे आंदोलन म्हणजे राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिका ही एक चळवळ. 

………………………………………….

आपण पाहतो की, आपला समाज अतिशय भावनाशील आहे. आपल्या हक्क आणि अधिकाराप्रति तेवढाच जागृतही आहे. क्रांती करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत. कुठल्याही आंदोलनात, मोर्चे काढण्यात आणि समाजावरील आलेल्या कोणत्याही आपत्तीची सोडवणूक करण्यात, समाजाची कोणतीही मागणी आग्रही पद्धतीने मांडण्यात आपला समाज सदैव तत्पर असतो. मुळात ६०-७० वर्षांच्या सामाजिक बदलाच्या प्रक्रियेमध्ये त्या प्रत्येक टप्प्यावरती समाजाची जी गरज असते, ती पूर्ण करण्यासाठी चळवळी आपापल्या भूमिका मांडत असतात. परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी आंदोलन पुढे चालविणाऱ्या ज्या काही चळवळी होत्या, त्या सर्व चळवळींचा एक कॉमन मिनिमम काढला, तर असे लक्षात येईल की, १९७४  ते ७८  या काळात भरीव असं सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने विशाल दृष्टिकोन ठेवून एका चळवळीने दलित-शोषित व उपेक्षित समाजात भ्रातृभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुर्दैवाने कोणतीही आंबेडकरी चळवळ लाँग लास्टिंग इम्पॅक्ट समाजामध्ये निर्माण करू शकली नाही. अशा प्रकारे आंबेडकरी चळवळ नेत्यांपर्यंत मर्यादित झालेली आपण पाहतो.

आज प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या शासकीय धोरणामुळे समाजाच्या गरजा बदललेल्या आहेत, समस्या बदललेल्या आहेत आणि भविष्यसुद्धा बदललेले आहे. अशा या बदलत्या परिस्थितीशी समाजाला जुळवून घेता यावे, म्हणून जे काही सामाजिक संचित किंवा रिसोर्सेस निर्माण व्हावे लागतात, ते रिसोर्सेस म्हणजे human रिसोर्सेस आणि Abstract रिसोर्सेस निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिकेने यशस्वीपणे केलेले आहे. एकीकडे सामाजिक संचित निर्माण करणे आणि दुसरीकडे व्यक्ती-व्यक्तीमध्ये भ्रातृभाव (भाईचारा) निर्माण करणे, हे भगवान बुद्धाने सांगितलं. समाजामध्ये बऱ्याचदा या गोष्टी बोलण्यात दिसतातही; परंतु वर्तनातून किंवा वागण्यातून या गोष्टीचा परिघोष गेल्या बारा वर्षापासून राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिकेच्या माध्यमातून आम्हीच केलेला आहे.

स्वातंत्र्यानंतर समाजाच्या आर्थिक, सामाजिक स्थितीमध्ये सकारात्मक बदल होत असताना, आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी आणि शिक्षणात प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे आर्थिक सामाजिक स्तर उंचावलेला जो लाभार्थीवर्ग आहे तो ‘बंगला बीवी बच्चे’च्या एकलकोंड्या संस्कृतीत रममाण होताना दिसत होता. अशाप्रकारे समाजापासून दूर जात असलेल्या, सामाजिक दायित्वाची भावना हरवून बसलेल्या या वर्गाला पुन्हा समाजाभिमुख करणं आणि पुढील पिढीला दिशादर्शन व मार्गदर्शन करण्यासाठी काही करता येईल का? या दृष्टीने अमरावतीला एका टीमने एकत्रितपणे एक प्रयत्न केला. मग त्याच्यासाठी सर्वांनी अभ्यासिकाच का निवडली? होस्टेल निवडू शकले असते, कोचिंग क्लास किंवा बचतगट निवडू शकले असते किंवा अजून काही केलं असतं. परंतु, सर्वानुमते असे ठरले की, जे काही आपण निर्माण करू ते बुद्धिस्ट आणि आंबेडकरी विचार या दोन्ही गोष्टीचं प्रक्षेपण असलं पाहिजे. त्या अनुषंगाने जेव्हा विहारांचा अभ्यास करण्यात आला, तेव्हा असं लक्षात आलं की, प्रत्येक विहार हे केवळ रीलिजियस प्लेस नसून, ते एक सोशल अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर आहे, शिक्षणाचे प्राथमिक केंद्र आहे. तक्षशिला, नालंदा, वल्लभी इत्यादी विद्यापीठांच्या मागे जी विहार व्यवस्था होती, त्यातून समाजाचा वैचारिक, शैक्षणिक पाया सक्षम करून मूल्याधारित समाज निर्मितीचा हेतू होता.

अशाप्रकारे विचार मंथन सुरू झाले. इतक्या मोठ्या विद्यापीठांचा, इतक्या मोठ्या विहारांचा जो गाभा होता, तो म्हणजे अभ्यास- अभ्यासासोबत अभ्यासिका. तक्षशिला येथे ३००  अभ्यासिका होत्या, तर नालंदामध्ये १८० अभ्यासिका होत्या. अभ्यासिका म्हणजे काय, तर एका ठिकाणी येऊन नियमितपणे, निश्चितपणे, अविरत प्रयत्नांती ठरविलेल्या टार्गेटपर्यंत पोहोचणे. तुम्ही सामूहिकरित्या अभ्यास करा आणि तो अभ्यास केवळ त्याच्या दृश्य परिणामासाठी नाही करायचं की मला नोकरी लागली पाहिजे, तर अभ्यासिका सांगते अदृश्य परिणाम. अदृश्य परिणाम म्हणजे एकमेकांमध्ये निर्माण होणारा भ्रातृभाव. माझ्या समाजासाठी मला काहीतरी करायचे आहे, ही सामाजिक उत्तरदायित्वाची संवेदना निर्माण करणे, हा अभ्यासिकेचा महत्त्वपूर्ण हेतू असतो. आज राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिकांना आम्ही त्या परंपरेशी जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत.

डॉ. प्रशांत रोकडे

१९२४  ला ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ स्थापन झाली. त्यामध्ये डॉ. बाबासाहेबांनी तीन मुद्दे सांगितले. त्यातला पहिला मुद्दा बाबासाहेबांनी सांगितला, तो म्हणजे मुलाचे शिक्षण. कारण, शिक्षण हे तुम्हाला विवेक आणि प्रज्ञा प्राप्त करून देते. आजच्या काळाचा आपण विचार केला, तर शिक्षणापेक्षा माहितीचे अधिक स्रोत निर्माण झालेले आहेत. त्या माहितीतून ज्ञानापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन काही नवनवीन प्रयोग करावे लागतील. एक individual व्यक्ती जेवढा विचार करतो, त्यापेक्षा सामूहिकरित्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून बरेच काही मिळवता येऊ शकते; या उद्देशानेच होस्टेल किंवा बचतगट किंवा इतर काही करण्यापेक्षा आपल्याजवळ असलेली संसाधने काय आहेत, त्या संसाधनाचा ऑप्टिमम युज करता यावा व आपण निर्माण केलेल्या ह्युमन रिसोर्सेस किंवा आर्थिक संसाधनांचा प्रबुद्ध भारताच्या निर्मितीमध्ये उपयोग व्हावा, म्हणून सर्वांनुमते राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिकांची निर्मिती झाली.

राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिकेच्या कुठल्याही पातळीवर असो, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, पुणे, मुंबई किंवा इतर कुठल्याही मुख्य टीम असू द्या, या सगळ्या टीम आहेत. जेव्हा या सर्व टीम म्हणून येतात तेव्हा ते फक्त co-odinaters असतात. कोणीही जॉईन्ट कमिशनर नसतो, कोणी आयुक्त नसतो, कोणीही शिक्षक नाही, पत्रकार नाही की विद्यार्थी नाही. समन्वयकांची एक टीम म्हणून सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असतात. In short, whatever you do , you should decide as a team. काम करण्याची हीच पद्धत राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिकेच्या यशाचे गमक आहे, असे मला वाटते.

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३) 

(लेखक दिल्ली सरकारच्या GST विभागाचे सहआयुक्त आहेत.)

9422888800

Previous articleसर्वार्थाने प्रगत .. आधुनिक जर्मनी
Next article‘रामा’बाबत काँग्रेसचा गाफीलपणा !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.