प्रश्न: तुम्ही आता असा उल्लेख केला की, काँग्रेस हा सगळ्यांना सामावून घेणारा पक्ष होता, पण त्याचं वर्तमान मात्र एका कुटुंबाभोवती फिरताना दिसतं. निदान तसं चित्र सार्वत्रिक उभं केलं गेलेलं आहे. तर सर्वोच्च नेतृत्वासाठी काँग्रेसला खरंच गांधी घराण्याशिवाय अन्य पर्याय नाही का?
प्रश्न: यालाच अनुसरून एक असा प्रश्न विचारावासा वाटतो की, आता भारतातली बहुतांश लोकसंख्या तरुण आहे. आणि विशेषतः 90’s मध्ये जन्मलेली ज्यांना मिलेनियम असं म्हटलं जातं , त्या पिढीला काँग्रेसचा इतिहास, काँग्रेसचं बलिदान, काँग्रेसचं इतिहासातलं कर्तृत्व याच्याबद्दल तितकी आत्मिक ओढ नाही जितकी ती मागच्या पिढ्यांना असते. अशावेळी काँग्रेसमधली एकाच घराण्याकडे असणारी पक्षाची सत्ता व घराणेशाही आणि याच्या उलट भाजपमध्ये दिसणारे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या पद्धतीने तळागाळातून वर येणारी उदाहरणं; या सगळ्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात जो परसेप्शनचा खेळ असतो, त्यात भाजप गेल्या दहा-बारा वर्षांत उजवा ठरला का?
प्रश्न: याचाच एक वेगळा अर्थ असा काढता येईल का की, काँग्रेसमधल्या स्थानिक पातळीपासून राज्यपातळीपर्यंतच्या नेत्यांना सत्तेशिवाय राहणं अवघड जातं. कारण यांचं सामाजिक आणि राजकीय गणित सत्तेला केंद्रस्थानी ठेवून घडत असतं. त्यामुळेच काँग्रेस मागील पूर्ण पाच वर्षांची टर्म केंद्रीय सत्तेत नाही आणि दुसऱ्या टर्ममधील चार वर्षं बाकी आहेत, म्हणजे 2024 पर्यंत सत्ता मिळणं शक्य नाही. हे लक्षात आल्यावर काँग्रेसचे कित्येक लोक पक्ष बदलायला लागले आहेत का? कारण इतके पक्षबदल भाजप कित्येक वर्षं सत्तेत नव्हती त्यावेळी झाल्याचं आठवत नाही. पण काँग्रेसमध्ये – ज्योतिरादित्य सिंधिया किंवा इतरही अनेक उदाहरणं आहेत छोट्या मोठ्या पातळीवरची – हे पक्षबदल घडत आहेत. याच्या पाठीमागची कारणमीमांसा काय आहे?
प्रश्न: भाजपकडे वळण्याआधी काँग्रेसबद्दल एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो. कोरोना काळात म्हणजे साधारण 15 मार्चपासून ते आज आपण बोलतो आहोत तिथपर्यंतच्या साडेपाच महिन्यांच्या काळात दोन प्रमुख राजकीय घटना घडल्या. एक म्हणजे मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार गेलं; भाजपचं सरकार पुन्हा आलं. दुसरी, राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार जाता जाता वाचलं. याला कदाचित भाजपतल्या एका गटाचा छुपा पाठींबा कारणीभूत असेल किंवा आणखी काही कारणं असतील. पण देशातली दोन प्रमुख राज्यं काँग्रेसच्या ताब्यात होती, त्यातलं एक गेलं आणि एक आता तरी कसंबसं वाचलं आहे. या दोन घटनांकडे तुम्ही कसं बघता?