मे महिन्यात अनुभवता येईल शून्य सावली दिवस

 

– प्रा सुरेश चोपणे

       सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या  23.50 ° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात.उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा.तसेच सूर्य दर रोज 50 ° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो,त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते.

       भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस येतो तो दक्षिण भारतात तेलंगणा येथपर्यंत २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो.

     महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात.कोल्हापूर जिल्ह्यातील  सावंतवाडी येथे  ३ मे रोजी तर  धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येईल.भारतातून शेवटी  मध्यप्रदेशातील भोपाळजवळून २३.५० ° अंशावरून कर्कवृत गेले आहे,त्यामुळे शून्य सावलीचा हा शेवटचा भूभाग आहे.भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली,हिमाचल,काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नाही.

आता आपण महाराष्ट्रातील शून्य सावली दिवस पाहूया–महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात १५.६° अक्षांश ते धुळे जिल्यात २१.९८ ° अक्षांश ह्या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत,त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे,त्यामुळे आपण दुपारी १२.०० ते १२.३५ ह्या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. यासाठी साहित्य म्हणजे दोन,तीन इंच व्यासाचा ,एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप,कोणतीही उभी वस्तू,उन्हात सरळ उभी ठेवावी.

समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही.

(लेखक नामवंत खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष आहेत)

9822364473

महाराष्ट्रात मे महिन्यात खालील शहरात शून्य सावली अनुभवता येईल

३ मे सावंतवाडी,  मांगेली,खूषगेवाडी, ४ मेमालवण,आंबोली, ५ मेदेवगड,राधानगरी, रायचूर

६ मे-कोल्हापूर, इचलकरंजी,७ मेरत्नागिरी, सांगली, मिरज, ८ मेकऱ्हाड, जयगड, अफजलपूर

९ मेचिपळूण, अक्कलकोट, १० मेसातारा, पंढरपूर, सोलापू११ मेमहाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाई

१२ मेबारामती, बार्शी, उस्मानाबाद, १३ मेपुणे,मुळशी, दौड, लातूर,लवासा

१४ मेलोणावळा, अलिबाग, दाभाडे,पिंप्री-चिंचवड, देहू,जामखेड, आंबेजोगाई,

५ मेमुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड,माथेरान, राळेगण सिद्दी, सिरोंचा

१६ मेबोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर,नारायण गाव,खोडद,अहमदनगर, परभणी, नांदेड, निर्मल

१७ मे- नाला सोपारा, विरार,आसनगाव, अहेरी,आल्लापल्ली, १८ मे-पालघर,कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा

१९ मे औरंगाबाद,डहाणू,नाशिक,कोपरगाव,वैजापूर, जालना, पुसद,बल्लारशा,चामोर्शी,

२० मेचंद्रपूर, ,मेहकर,वाशीम,वणी,मूल

…………………………..

Zero Shadow day समजून घेण्यासाठी खालील Video नक्की पाहा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here