साधारणपणे आपल्याकडे विमानतळांवर थर्मल स्कॅनर आढळतात. पण अलिकडे मोठे मॉल, चित्रपटगृहात प्रवेश करण्यापूर्वीही व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग केले जाते. आपण ताप मोजायला ‘थर्मामीटर’ वापरतो. तो जिभेखाली किंवा काखेत मिनिटभर ठेवून शरीराच्या तापमानाची नोंद घेतो. पूर्वी पारा असलेले थर्मामीटर असायचे. अलिकडे डिजिटल थर्मामीटर आलेत. त्याहीपुढे जाऊन हे थर्मल स्कॅनर आले आहेत. त्यातलाच प्रकार आपण हल्ली बघतो तो, थर्मल गन. ही गन काही इंच दुरून आपल्या कपाळावर धरली जाते आणि काही सेकंदातच आपल्या शरीराचे तापमान किती आहे, हे त्यातील इन्फ्रारेड स्क्रीनवर उमटते. हीच प्रक्रिया अधिक सविस्तरपणे शरीराचे स्कॅनिंग करून ज्यात केली जाते ते थर्मल स्कॅनिंग. तर, एखादा व्यक्ती जेव्हा या स्कॅनर समोर उभा राहतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात असलेले विषाणू शरीराच्या तापमानासह स्कॅनिंग होतात आणि ते इन्फ्रारेड चित्रांद्वारे दिसतात. ज्यांच्या शरीरात विषाणूंची संख्या सामान्यपेक्षा अधिक आढळते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीराचे तापमानही वाढलेले असते. अशा लोकांना वेगळे काढून त्यांची अधिक बारकाईने तपासणी केली जाते. थर्मर स्कॅनिंगद्वारे माणसाच्या त्वचेच्या पातळीवरचे तापमान घेतले जाते.
मात्र १४ दिवसांच्या गृह निरीक्षणात असतानाही या व्यक्ती घरातच राहतील याची शाश्वती नाही. या अनुषंगाने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ‘गुगल टॉयलेट लोकेटर’ हा प्रकार अस्तित्वात आहे. यात शहरातील सार्वजनिक शौचालये, प्रसाधनगृहांची माहिती ऑनलाईन मिळते. याच पद्धतीचा वापर करून कोरोना संशयित व्यक्तींचे लोकेशन गुगल सेवेस ऑनलाईन टॅग करून त्यांच्या सतत संपर्कात राहता येवू शकते. अशा व्यक्तींची १४ दिवसांची गृह निगराणी संपली की, योग्य आरोग्य तपासणीअंती त्यांना ‘अनटॅग’ करता येईल. हा पर्याय केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाच्या सचिवांनी नुकत्याच घेतलेल्या ‘व्हीसी’ मधून पुढे आला. तसेच संशयित व गृह निरीक्षणातील व्यक्तीच्या मोबाईलवरील ‘जीपीएस’ यंत्रणा २४ तास कार्यान्वित ठेवण्याचे आदेश देवून प्रशासनाने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, असाही एक पर्याय आहे. अशा संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी आणि गृह निरीक्षणात असणाऱ्यांना दिवसातून तीनवेळा ‘व्हिडिओ कॉल’ करून ते घरातच असल्याची खातरजमा त्यांच्याकडून करून घ्यावी. या उपायांमुळे गृह निरीक्षणात असलेले नागरिक घराबाहेर पडण्याची व कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता कमी होईल, हे नक्की.
खूप सुंदर माहिती प्रत्येकाने वाचावी अशी अपेक्षा आहे…..
Very good imfotmation given to you
.thanks
अप्रतीम लेख, सविस्तर माहिती करिता धन्यवाद….