विदर्भ महाविद्यालय झाले १०० वर्षाचे !

सुरुवातीचं किंग एडवर्ड गव्हर्नमेंट कॉलेज, नंतरचं विदर्भ महाविद्यालय आणि आताच्या शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेला यावर्षी १०० वर्ष पूर्ण होत आहे . पश्चिम विदर्भातील या पहिल्या महाविद्यालयाची कहाणी मोठी इंटरेस्टिंग आहे . स्वातंत्र्यपूर्व काळात अतिशय महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या संस्थेने गेल्या १०० वर्षात विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची पताका फडकविणारे विद्यार्थी घडविले आहेत. १६६ एकरात पसरलेल्या या विशालकाय संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला असून या संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ सोमवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे . यानिमित्ताने विदर्भाचे भूषण असलेल्या या संस्थेची ही प्रेरणादायी कहाणी.

……………………………………………..

-प्रा. डॉ. के. एन. बड़ोदकर प्रा. डॉ. प्रभा भोगावकर

कोणत्याही संस्थेची स्थापना ही विचार, उच्चार आणि तीन क्रमानुसार होत असते. विदर्भाचे एक धोर नेते व बाकीपूर राष्ट्रसभेचे अध्यक्ष रावबहादूर नामदार रं. न. याच्यासारख्या काही नागरिकांच्या मनात या प्रांतात एखादी शिक्षणाची संस्था असावी असा विचार अनेक वर्षापासून घोळत असे, तरी त्याला उच्चाराचे स्वरूप सन १९१० पर्यंत आले आले नव्हते. १९१० साली ब्रिटीश बादशाह सातवे एडवर्ड यांचे निधन झाले. त्यांच्या स्मारकासाठी दि. १३ सप्टेंबर १९१० रोजी अमरावती जिल्ह्यातील राहिवाशांची एक सभा भरवून असा ठराव करण्यात आला की सातवे एडवर्ड यांच्या स्मरणार्थ विदर्भातर्फे अमरावतीत एक उचित स्मारक करावे. या करता वन्हाडच्या सर्व जिल्हयातून एकूण रु. १,२९,९१३ वर्गणी गोळा करण्यात आली.

प्रथम काहींचा असा विचार होता की बन्हाडात एखादी धातूकामाची शाळा उघडावी. परंतु तेव्हाचे वऱ्हाडचे कमिशन स्लाय यांनी लोकांची मते आजमावून पाहिली तेव्हा सर्वांचे मत अमरावतीस एखादे महाविद्यालय स्थापणे आवश्यक आहे, असे होते.  तेव्हा विद्यालयाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी एक प्रांतिक समिती स्थापन करण्यात आली व सर्व जिल्हयांतील देणगीदारांच्या संमतीने अमरावती एक महाविद्यालय स्थापावे असे ठरले. हळूहळू जमविलेला निधी दोन लाखा पर्यंत गेला होता, तथापि तो महाविद्यालयाच्या स्थापनेला अपुरा होता. तेव्हा रा. ब. मुधोळकर, सर मोरोपंत जोशी वगैरे पुढाऱ्यांनी नियोजित महाविद्यालय सरकारने स्थापावे व जमविलेल्या रकमेचा विनियोग या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास शिष्यवृत्त्या देण्यात करावा, अशी मागणी केली. या मागणीला सर फ्रँकस्लाय यांनी उचलून धरले.

२३ नोव्हेंबर १९१८ रोजी सध्याच्या इमारतीची कोनशिला ना. सर बेंजामिन रॉबर्टसन, चिफ कमिशनर, यांच्या हस्ते बसविण्यात आली.  महाविद्यालयाची मुख्य इमारत १९२३ साली पूर्ण झाली व महाविद्यालयाचे बारसे ‘किंग एडवर्ड कॉलेज ‘ असे झाले. जमा केलेल्या रकमेचा विनीयोग करण्यासाठी एक ‘किंग एडवर्ड मोरियल सोसायटी नावाची अधिकृत संस्था दि. १४ जाने १९२५ रोजी स्थापन होऊन १९२४ अखेर पर्यंत जमा झालेली रक्कम या संस्थेच्या हवाली करण्यात आली. त्या रकमेच्या व्याजातून प्रामुख्याने महाविद्यालयात शिकणाऱ्या बऱ्हाडच्या विद्यार्थ्यांना केवळ गुणांच्या आधारे शिष्यवृत्या देण्यात यावे असे ठरले. याच समृद्ध द्रव्य निधी मुळे विदर्भ महाविद्यालय हे सर्व प्रांतात शिष्यवृत्ती संपन्नतेत अग्रगण्य ठरले .

संस्थेची प्राणप्रतिष्टा

 -दि. २८ जुलै १९२३ हा दिवस विदर्भ महाविद्यालयाच्या इतिहासात सुर्वणाक्षरांनी लिहून ठेवला पाहिजे. कारण याच दिवशी मध्यप्रांत व विदर्भ प्रातांचे अधिपती सर फ्रैंक राय यांच्या हस्ते या महाविद्यालयाचे अनावरण झाले. या समारंभास या प्रांताचे शिक्षण मंत्री ना. रा. ब. नारायण राव केळकर हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे आध प्रवर्तक ना रावबहादूर मुधोळकर हे मात्र आपल्या मनातील स्वप्न मूर्त झालेले पाहावयास हयात नव्हते. संस्थापनेच्या दोनच दिवस अगोदर ते दिवंगत झाले. नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेत देखील त्यांचा सिंहाचा वाटा होता. सर मोरोपंत जोशी व दिवाण बहादूर केशवराव ब्रम्ह यांचे योगदान देखील या महाविद्यालयाच्या स्थापनेत फार मोठे होते… या दोघांनी सरकार दरबारी आपले वजन कुशलतेने खर्च करुन या संस्थेचा पाया मजबूत केला.

 या त्रिमूर्तिखेरीज या संस्थेच्या मूळ निर्मितीत ज्यांनी फार मोठा हातभार लावला त्या श्री. जी. एन. काणे, रा. ब. जयवंत, स. ब. के. जी. दामले व रा. ब. आर. व्ही महाजनी यांचा उल्लेख येणे अपरिहार्य आहे. या खेरीज या संस्थेला अनेकवार भेटी देऊन तिच्या कार्याला प्रोत्साहन देणारे अनेक उदार आत्मे त्या काळात या शहरात होऊन गेले. त्यात के. दादासाहेब खापर्डे, व रा. ब. डॉ. भट यांचा प्रामु ख्याने उल्लेख केला पाहिजे. महाविद्यालयाच्या त्या काळातील स्थानिक हित चिंतकांची परंपरा फारमोठी असून त्यात सर मोरोपंत जोशी आणि दि. ब. ब्रम्ह यांचे खेरीज, रा.मो. खरे, बाबासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी, न्यायमूर्ती मंगलमूर्ती, वाय जी. देशपांडे, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, श्री. ना. रा. बामणगावकर, रा. ब. श्री. द. रणदिवे, बॅ. रामराव देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख, बॅ. चौबळ, रा. व. द. वा. शिदोरे, श्री हरिहरराव देशपांडे अशा अनेक धोर नागरिकांनी हरतऱ्हेने मदत करुन या संस्थेची जोपासना केली आहे. शिक्षण मंत्री ना. संभाजीराव गोखले, ना. पु. का देशमुख, सौ. विमलाबाई देशपांडे, डॉ. झा, डॉ, मोडक, यांच्या सारख्या शिक्षण क्षेत्रातल्या उच्चपदस्थांनी संस्थेच्या हिताकडे वेळोवेळी लक्ष पुरविले.

१६६ एकरात पसरलेली विशाल संस्था

एकशे सहासष्ट एकरामधे विखुरलेल्या महाविद्यालयाच्या परिसरातील मूळ दगडी इमारतीचे प्राकृतिक सौंदर्य भव्यता याची कल्पना ती प्रत्यक्ष पाहिल्या खेरीज येणार नाही. उत्तराभिमुख प्रमाणशीर दगडी इमारत. प्रशस्त हिरवागार व अनेक वृक्षानी फुललेला परिसर, प्रवेशद्वारा समोरील उपवन, वनस्पती उद्यान, पूर्व पश्चिम मुलांचे वसतीगृहे, परिसरातील प्राध्यापकांचं टुमदार प्रशस्त बंगले, दोन मुलीचे वसतीगृहे, विस्तीर्ण खेळाचे मैदान, जिमखाना, रसायन व भौतिकशास्त्र विभाग, भूगोल विभाग, संगीत विभाग व  ग्रंथालयाची प्रशस्त इमारत, जीवशाल व गृहशास्त्र विभाग व १९९८ मधे पूर्ण झालेले आधुनिक सोयींनी सुसज्ज असे देखणे व प्रशस्त हीरक महोत्सवी सभागृह (Auditorium) या सर्व वास्तू महाविद्यालयाच्या सुंदरतेची व भव्यतेची साक्ष पटवितात.

संस्थेच्या विद्यमान संचालक डॉ .अंजली संजय देशमुख

१९२३ साली केवळ ८३ विद्यार्थी व १० प्राध्यापक घेऊन सुरु झालेल्या महाविद्यालय रूपी ईवल्याश्या रोपट्याचे आज वटवृक्षात परिवर्तन झालेले आहे. विकासाची ‘अमृतवेल’ गाठलेल्या या महाविद्यालयास १०० वर्षे पूर्ण झालीत. एकशे सहासष्ट एकर ऐवढा मोठा विस्तीर्ण परिसर सुमारे साडेचार हजार विद्यार्थी , जवळ जवळ पावणे दोनशे प्राध्यापक व तेवढयाच संख्येने शिक्षकेतर कर्मचारी, २२ विषयांचे पदवी व पदव्युतर विभाग, अनेक विषयात संशोधनच्या सोयी उपलब्ध असलेले हे आकाराने व संख्येने मोठे असलेले एकमेव शासकीय महाविद्यालय आहे, असे संस्थेच्या विद्यमान संचालक डॉ. अंजली देशमुख सांगतात.

या महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी अगदी स्थापनेपासूनच प्राचार्यांचे महत्वाचे योगदान लाभले. या संस्थेचे पहिले प्राचार्य श्री. एफ. पी. रास्टबिन यांचे कर्तृत्व अग्रगण्य आहे. त्यांनी या संस्थेसाठी दीड तप वेचले , कॉलेजच्या इमारतीच्या स्थापत्यापासून ते वसाहतीतील प्रत्येक व्यक्तीच्या सुख दुःखाशी तन्मय होण्यापर्यंत अनेक लहान मोठया बाबतीत त्यांनी जिवापाड मेहनत घेतली आणि कॉलेजला एक वळण दिले, आकार आणला व प्रतिष्ठा वाढविली ते १९२३ ते १९४९ असे सलग १८ वर्ष ते या महाविद्यालयाचे प्राचार्य होते.

  १ एप्रिल १९४१ ते २३ जून १९४५ पर्यंत ले. कर्नल एन. गांगूली यांची कारकीर्द होती. नंतर २४ जून १९४५ ते ११ जुलै १९४६ नागपूर च्या कॉलेज ऑफ सायंस चे प्राचार्य डॉ. के. कृष्णमूर्ती येथे बदलून आले. नंतर डॉ. ना. गो. शब्दे हे प्राचार्य म्हणूण बदलून आले. महाविद्यालयाच्या विविध क्षेत्रात त्यांच्या कार्याचा ठसा उमटला. अत्यंत शिस्तप्रिय प्राचार्य म्हणूण त्यांचा लौकिक होता. डॉ. शब्दे यांना लंडनची डी. एस्सी. ही उपाधी गणित विषयातील संशोधनासाठी प्राम झाली होती.२२ जाने १९४७ पासून महामहोपाध्याय वा. बि. मिराशी हे या महाविद्यालयास प्राचार्य म्हणून लाभले. नामवंत संशोधक व प्राच्य पंडित म्हणून ते आपल्या क्षेत्रात विख्यात होते. त्यांचे ठिकाणी प्राचार्य टॉस्टबिन यांची शिस्तप्रियता, ले. क. गांगूली यांची खिलाडू वृत्ती, डॉ. कृष्णमूर्ती यांची निरलस चिकाटी व डॉ. शब्दे यांचा मनमिळाऊपणा या सर्व गुणाचा समन्वय असल्यामुळे नवीन वातावरणात संस्थेची प्रतिष्ठा त्यांच्या हाती वृद्धिंगत झाली. त्यांच्या कारकिर्दीत महाविद्यालयाचे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर किंग एडवर्ड हे ब्रिटिश साम्राज्यशाहीचे प्रतीक असलेले नाव जाऊन विदर्भ महाविद्यालय असे नामकरण झाले. जुख्य सभागृहात सम्राट एडवर्ड बादशहाच्या जागी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो व बेंजामिन रॉबर्टसन व सर फैकस्लाय यांच्या जागी लोकमान्य टिळक गुरुदेव टागोर यांच्या प्रतिमा विराजमान झाल्या.

‘किंग एडवर्डियन’ या संस्थेच्या मुखपत्राला ‘विदर्भवाणी “हे नामाभिधान प्राप्त झाले. प्राचार्य मिराशी यांच्या कारकिर्दीत शिक्षणाप्रमाणे शिक्षणेतर कार्यातही महाविद्यालयाची प्रगती झाली. त्यांच्याच कारकिर्दीत दि. १२ डिसेंबर ते १७ डिसेंबर १९४८ पर्यंत महाविद्यालयचा रौप्य महोत्सव साजरा झाला. १९४७ ते १९५० अशी ३ वर्षे ते महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यानंतर १९५० ते ५१ डॉ एम. ए. मोघे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषविले त्यानंतर आर. निरुला १९५१ ते १९५५ अशी सलग ४ वर्षे या महाविद्यालयाच प्राचार्य राहिले. पोशाखाच्या बाबतीत अत्यंत चोखंदळ आणि मार्दवी वागणे, बोलणे यामुळे डॉ. निरुला महाविद्यालयात लोकप्रिय होते. त्यांच्या सेवा निवृत्ती नंतर पुन्हा एकदा डॉ. शब्दे  महाविद्यालयात बदलून आले. व १९५५ ते ५८ या कालावधीसाठी त्यांनी प्रशासन सांभाळले. १९५८ ते ५९ अशा अल्पकालावधीसाठी डॉ. एल. बी. काजळे प्राचार्य पदी राहिले. त्यांचा मोठा वचक असे वनस्पतिशास्त्राचे ते प्राध्यापक असल्याने त्यांनी महाविद्यालयाच्या उद्यानाच्या कामात चांगलाच रस घेतला. विद्यार्थ्यांना उद्यानात बसता यावे म्हणून झाडांभोवती पार बांधून घेतले. १९५९ ते १९६४ अशी ५ वर्षे डॉ. एच एम. एस. खतीब प्राचार्य पदी होते. अतिशय सौम्य प्रवृत्तीच्या डॉ. खतीबांनी केवळ आपल्या प्रेमळ स्वभावाच्या जोरावर प्रत्येकाला शिस्तीत राहणे भाग पाडले. त्यानंतर १९६४ ते १९६६ मराठी चे नावाजलेले विद्वान व साहित्यिक डॉ. व्हि. बी. कोलते हे प्राचार्यपदी होते. त्यांनी त्याआधी महाविद्यालयात अधिव्याख्याता पदावरही काम केले होते. ते अतिशय कडक शिस्तीचे भोक्ते होते. १९६६-६७ मधे प्राचार्यपदी डॉ. एस. नईमुद्दीन हे होते. १९६७ मधे डॉ. एस. मुकर्जी येथे प्राचार्य पदी नियुक्त झाले. उत्तर अमेरीकेतून थेट अमरावतीसारख्या त्यामानाने फारच लहान गांवातील महाविद्यालयात ते आले होते. प्रसन्न व्यक्तिमत्व, उमदा स्वभाव, उत्कृष्ट वक्तृत्व, आणि उत्तम प्रशासन ही त्यांची वैशिष्टे.  महाविद्यालयाचा उल्लेख ते प्रेमाने व अभिमानाने लघु विद्यापीठ (Mini Versity) असा करीत. १९७० पर्यंत ते येथे होते.

 नामवंत प्राचार्यांमधे डॉ. एम. जी. मराठे यांच्या कारकिर्दीचा उल्लेख प्रामुख्याने येणे अपरिहार्य आहे. १९७० ते १९७४ त्यांनी प्राचार्यपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. आज ते हयात नाहीत. त्यांना या महाविद्यालयाविषयी अत्यंत जिव्हाळा वाटे. वयाच्या २९ व्या वर्षी त्यांची या महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्रोफेसर म्हणून १९५६ साली नियुक्ती झाली. विषय शिकविण्याची असामान्य हातोटी, प्रसिद्धी मिळालेले संशोधन कार्य हे त्यांचे गुणविशेष. त्यांच्या कालखंडात रसायनशास्त्र विभागात पदव्युत्तर वर्ग सुरु झाले. या विभागात संशोधनाची परंपरा त्यांनीच रोवली अत्यंत देखणे व्यक्तिमत्व, गोरापान रंग, जाड भिंगाचा चष्मा असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. जानेवारी ७० साली प्राचार्य येथे ते रुजू झाले.  महाविद्यालयाच्या शैक्षणिक व इतर क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. त्यांच्याच कारकिर्दीत महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. दि. २० डिसेंबर ते २६ डिसेंबर असा  हा महोत्सव साजरा करण्यात आला.

त्यानंतर १९७४- ७५- डॉ. व्ही. आर. देवरस व १९७५ ते ७७- डॉ. एस. नईमुद्दीन प्राचार्यपदी होते .१९७७ ते १९८१ या काळात डॉ. जी. एस. बेडगकर ह्या महाविद्यालयात मुंबईहून प्राचार्य स्थानांतरीत होऊन आले. नखशिखान्त साहेबी राहणी, तोंडात युरोपियन थाटाचे इंग्रजी व परदेशी घेतलेल्या उच्च शिक्षणाची ऐट ,असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांना अमरावतीचे आयुष्य निवांत, सुस्त वाटत असे .त्यांना ते फार डाचत असे , णि आपल्या फटकळ स्वभानुसार ते थेट बोलूनही दाखवित. अगदी कांही प्राध्यापकांना देखील त्यांची भीती वाटे. ते अत्यंत कडक शिस्तीचे भोवते होते. मध्यंतरीच्या काळात महाविद्यालयात निर्माण झालेली काहीशी बेशिस्त त्यांनी काबूत आणली .अतिशय प्रामाणिकपणे व झपाटयाने काम करणे हे त्यांचे वैशिष्टय ! त्यांच्या कारकिर्दीमध्ये गृहशास्त्र विभाग ग्रंथालय व जीवशास्त्र विभागाची भव्य इमारत हे बांधकामे केल्या गेली. केवळ चार वर्षाच्या कारकिर्दीत मविद्यालयाच्या इतिहासात एक महत्वपूर्ण पान त्यांनी स्वतः च्या नावे अंकीत केले.

नंतरचे प्राचार्य प्रा. आर. एन. ढमढेरे हे महाविद्यालयाशी या न त्या नात्याने बराच काळ निगडीत राहिले . ते  प्राचार्य असतांनाच अमरावती विद्यापिठाची स्थापना झाली. विदर्भ महाविद्यालय विद्यापीठास सहस्तांतरीत करण्याचे उच्च पातळीवर जवळपास निश्चित झाले होते. विद्यार्थी यांस तयार नव्हते.  खुद्द प्रा ढमढेरे देखील विद्यार्थ्यांच्याच विचाराचे होते. त्यांनी स्वतच्या नोकरीचीही पर्वा न करता, कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता शासनाला या बाबतीत प्रखर विरोध केला.

१९८४ ते १९९० या कालावधीत प्रा. पी.एस काणे महाविद्यालयाचे प्राचार्य होते. राज्यशाखाचे अभ्यासक असलेले प्राचार्य काणे, उत्तम वक्तेही आहेत.  त्यांचे व्याख्यान किंवा सहज बैठकीतलं बोलणंही काव्यशास्त्र, विनोदाची मेजवानीच.  सहज आपलेसे करून घेऊन हवे तसे काम करवून घेण्याची त्यांची कार्यशैली वाखाणण्याजोगी होती. शासन न करताही उत्तम प्रशासन त्यांनी केले. महाविद्यालयास डीपीडीसीचं अनुदान सर्वप्रथम त्यांच्याच प्रयत्नाने मिळाले आणि आता तर तो परिपाठ झालेला आहे नंतरची दोन वर्षे म्हणजे ९० ते ९२ या कालात प्रा एम. आर. मोहोळकर येथे बदलून आले. ते हिन्दी साहित्याचे अभ्यासक होते. हिन्दी काव्य व कवि दोन्हीवर मनापासून प्रेम करणारा हा माणूस.हिन्दी चित्रपटांचे कित्येक प्रसिद्ध गीत लेखक (साहिर लुधियानवी, गुलजार, हसरत जयपुरी इ.) व देवआनंद यांच्या सारख्या अभिनेत्याशी घरेलू मैत्रीचे संबंध असणारे प्रा. माहोळकर मृदुभाषी व अत्यंत स्नेहशील होते. त्यांच्या ‘गीत यात्री’ या चित्रपट गीतांच्या वैशिष्टयपूर्ण पुस्तकास महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरविले होते. श्री. मधू कुळकर्णी, मौजेचे य. दि. फडके वगैरे साहित्यीक व विचारवंतानी महाविद्यालयात केवळ मोहोळकरांच्या प्रेमापोटी हजेरी लावली.

  १९९२ ते १९९५ च्या कालखंडात डॉ. एस. एस. पाध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी होते. एक विद्यार्थी, नंतर एक प्राध्यापक व शेवटी प्राचार्य असे सगळे महत्वाचे टप्पे त्यांनी याच महाविद्यालयात ओलांडले. त्यांनी भूगोल विषयात मोलाचे संशोधन केलेले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदांमधे त्यांनी शोध निबंध सादर केले विशेष म्हणजे अमरावती जिल्यातील अनेक महत्वाच्या भौगोलीक व भूगर्भशास्त्रीय – नकाशांचे ते कर्ते! अभ्यासूवृत्ती, मनमोकळा, दिलदार परंतु कांहीसा तापट स्वभाव, निर्भिड वृत्ती, निर्णय घेण्याची व त्याची जबाबदारी स्विकारण्याची तयारी, एखादी गोष्ट योग्य वाटत असल्यास कोणाची पर्वा न करता ती करण्याची वृत्ती आणि रोखठोक स्वभाव ही त्यांची खास वैशिष्टे. त्यांच्या कारकिर्दीत शासनाकडून भरीव अनुदाने मिळवून त्यांनी महाविद्यालयात अनेक परिवर्तने घडवून आणली. आधुनिक शिक्षणसाधने त्यंनीच महाविद्यालयात उपलब्ध करुन दिली. संगणकशास्त्र विभाग सुरु केला व त्यास मोठे अनुदान मिळवून दिले. विशेष अनुदान प्राप्त करुन महाविद्यालयात दर्शनी भागात ‘अप्सरा उद्यान’ तयार केले. या कामी वनस्पतिशास्त्राचे प्रा. अ. रा. कुळकर्णी यांनी अतिशय परिश्रम घेतले.

१९९५ ५६ मधे प्रा. एस. डी. भुसारी येथे प्राचार्य पदावर कार्यरत होते. त्यांनी याच महाविद्यालयात दीर्घ काळ वनस्पतीशास्त्राचे अधिव्याख्याता व विभाग प्रमुख म्हणून सेवा केली. १९९६ ते १९९९ प्रा. डॉ. विजया डबीर या प्राचार्यपदी होत्या. विद्यार्थी  ते प्राचार्यपद ही दीर्घ वाटचाल त्यांनी याच महाविद्यालयात केली. मेधावी विद्यार्थी, व्यासंगी प्राध्यापक व कुशल प्रशासक ही त्यांची तिनही रूपे या महाविद्यालयातच घडली. महाविद्यालयाबद्दल त्यांनाअपार प्रेम होते, आहे म्हणणे देखील – पुरेसे नाही. महाविद्यालय त्यांचे सर्वस्वच होते आहेही. महाविद्यालयाच्या त्या पहिल्या महिला प्राचार्य. तडफदार व्यक्तिमत्व,  अभ्यासू वृत्ती, काम करण्याची चिकाटी आणि त्याहीपक्षा अधिक महत्वाचे म्हणजे महाविद्यालयाच्या भल्याची कळकळ आणि अगदी झोकून देऊन काम करण्याची प्रवृत्ती! त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत महाविद्यालयात जणू सर्वत्र सळसळते चैतन्यच वावरते आहे असे वाटे. कार्यालयात रोज रात्री ७ वाजे पर्यंत साऱ्या कर्मचाऱ्याना घेऊन त्या काम करीत असत. काम करण्याची प्रामाणिक तळमळ व स्त्री सुलभ मार्दव आणि स्नेहवृत्ती यामुळे त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमधे स्वत:चे आत्मिय स्थान निर्माण केले होते. प्रशासकीय कार्यासोबत त्या दैनंदिन अध्यापनाचे कार्य देखील अतिशय नियमित करीत. किंबहुना शिकविणे हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या त्या शिल्पकारच म्हणायला हव्या. सतत मागणी करुनही शासनाने अमृत महोत्सवी वर्षासाठी एक पैसाही अनुदान दिले नाही. तेव्हा स्वबळावर अमृत महोत्सवी वर्षा साजरे करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सगळ्या प्राध्यापकांना व इतर कर्मचाऱ्यांना निधी उभारण्यास आवाहन केले. अपेक्षेप्रमाणेच त्यांना मन:पूर्वक प्रतिसाद मिळाला. पाहता पाहता निधी उभा राहिला आणि संपूर्ण वर्षभर एकाहून एका सरस कार्यक्रमांनी अमृत महोत्सवी वर्ष साजरे झाले.

महाविद्यालयातील नामवंत भूतपूर्व प्राध्यापक

या महाविद्यालयात गेल्या ७५ वर्षात विविध विषयांत अत्यंत नामवंत प्राध्यापक हाऊन गेलेत. त्यांनी सेवाकाळात आपल्या विद्वत्तेची, संशोधक वृत्तीची, अध्यापनाच्या उत्कृष्ट शैलीची छाप पाडली.  सर्वांची नांवे देणे शक्य नसले तरी कांही नामवंत प्राध्यापक ज्यांच्या कर्तृत्वामुळे हे महाविद्याल नावारूपास आले त्यांच्या नावांचा उल्लेख करणे आवश्यक वाटते.

संस्कृत- डॉ. हिरालाल जैन, प्रा. स. गो. सोमलवार, प्रा. सरस्वती प्रसाद चतुर्वेदी, प्रा. मधुकर आष्टीकर, प्रा. सु. ना. पेंडसे, प्रा. जी. जी. कुळकर्णी

मराठी – प्रा. शंकर वैद्य, डॉ. मा. गो. देशमुख, प्रा. श्री. ना. बनहट्टी, डॉ. वि. भि. कोलते, प्रा. कृ. व्य. पेशकार, प्रा. म. ग. नातू प्रा. भालचंद्र फडके, डॉ. सुशीला पाटील, डॉ. विजया डबीर, डॉ. प्रभा गणोरकर, प्रा. वसंत आबाजी डहाके.

उर्दू ,पर्शियन सै. म. आगा ह. ह. अबीदी, मंजुर हुसैन शोर, महमुद साहब, डॉ. सै. नईमुद्दीन, डॉ. स. म. आका ह.ह. अबीदी, डॉ. अ. सब ईरफान, डॉ. इकबाल अ. खान इ.

इंग्रजी– [प्र. रा. भ. पाटणकर, प्रा. मावळणकर, प्रा. मदनगोपाल, प्रा. प्रेमनारायण श्रीवास्तव, प्रा. गारेलाल शुक्ला, प्रा. के. एम. वैद्य, प्रा. के. ज. पुरोहीत, प्रा. एल. एम. काटे, प्रा. ओ. पी. भटनागर, प्रा. मधुसुदन नारे तत्त्वज्ञान- डॉ. ज्वाला प्रसाद, प्रा. रामनाधन, डॉ. च. घ. देशमुख, प्रा.डी. वाय. देशपांडे

अर्थशास्त्र- डॉ. चिं. द. दाने, प्रा. नानवटी, प्रा. लोथे, प्रा. शेळके, प्रा.ओझरकर, डॉ. दि.व्यं, जहागिरदार, प्रा. दे. रा. अग्रवाल, राज्यशास्त्र प्रा. प. सि. काणे, प्रा. श्री. गो. काशीकर, प्रा. नाणेकर भूगोल- डॉ. तामसकर डॉ. सुरेशचंद्र पाध्ये

गणित- डॉ. एन. जी. शब्दे, प्रा. नी. आ. शास्त्री, प्रा. कायंदे, प्रा. बॅनर्जी, प्रा. हिरूरकर, प्रा. शशी देशपांडे

भौतिकशास्त्र- डॉ. व्हि. ए. थत्ते, डॉ. वि. जी. खरे, डॉ. सी. एस.

रसायनशास्त्र- प्रा. एल. के. गोखले, प्रा. चक्रधर, डॉ. मराठे, डॉ. ना. बि. करवेलकर, डॉ. बी. जे. घिया, डॉ. के. बी. डोईफोडे, डॉ. गगढ वनस्पतिशास्त्र – डॉ. के. व्ही. बन्हाडपांडे, डॉ. व्हि. डी. टिळक. प्रा. आर. एम. पै. डॉ. पी. के. देशपांडे, डॉ.व्हि. आर. ज्ञानसागर, प्रा. जी. बाय. कुळकर्णी, प्रा. एम. व्ही. मिराशी, प्रा. आर. एन. ढमढेरे, प्रा. मोतीराम नगरकर, प्रा. सि. डी. महाजन, डॉ. एम. ए. ढोरे, प्राणीशास्त्र डॉ. रंगणेकर, डॉ. गोपालकृष्णन, प्रा. इ. एन. दास, डॉ.जे, एच, सबनिस

संगीत- प्रा. मनोहर कासलीकर, प्रा. कुमुद किरुरकर, प्रा. खर्डेनबीस

नामांकित विद्यार्थी

पूर्व काळातील कांही नामवंत विद्यार्थी श्री. सां. ना. हाडोळे (ए.डी.जे.), श्री. बा. आ. देशमुख (मंत्री) म. मुनशी (ए.सी. अबकारी), श्री. प्रिं. ल. जुनानकर ( ए.डी.जे) बोंडे (ई.ए.सी.). श्री. रा. गं. पाटील (ए.डी. अन्न) श्री अप्रैल (ई.ए.सी), श्री. द. व. असखेडकर (ई. ए. सी. ) श्री. बा.जोशी (ई.ए.सी.), प्रा. डॉ. दे. र. भबाळर, डॉ. व. मा. डोक्रस, बि. सी. साखरे, श्री. रा. ल. भिंगे (आय.पी.), प्रा. सौ. लीला अहत्यमुळे, श्री. ना. रा. बनसोड (अ.अकौट्स ऑ.), कॅप्टन म. प्र. मुंडले, हेर.श. जोग, कैप्टन बा.ग. पाठक, लेफ्टनंट म.प्र. बल्लाळ, श्री. गो. सुतवणे, वैमानिक य श्री रणदिवे.

मान्यवर लोकनेते

बी. ए. देशमुख, माजी मंत्री, (जुना) मध्यप्रदेश. ना. श्री. कल्याणरा वरील, राज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, ना. श्री. रा. सु. गवई, माजी सभापती विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य, व सदस्य लोकसमा. ना. श्री. आर. एम. पटेल, उपमंत्री, महाराष्ट्र राज्य, श्री. आर. ए. बेलसरे, माजी पार्लमेंटरी सेक्रेटरी, (जूना) मध्यप्रदेश, श्री. त्यं. गो. देशमुख, लोकसभा – सदस्य श्री जांबुवंतराव धोटे, लोकसभा – सदस्य श्री बबनराव मेटकर, महाराष्ट्र विधानसभा – सदस्य, श्री. शरदराव तसरे, महाराष्ट्र विधानसभा सदस्य, श्री धैर्यशीलराव बाघ, महाराष्ट्र विधानसभा सदस्य श्री. सुधाकरराव नाईक, माजी मुख्य मंत्री, राज्यपाल, श्री. बाळासाहेब घुईखेडकर, संचालक, भूविकास अधिकोष, महाराष्ट्र राज्य. प्रा. बी.टी. देशमुख, आमदार, जगदीश गुमा, आमदार श्री. राजेश दर्यापुरकर, संचालक सहकारी बैंक, यशवंतराव शेरेकर, माजी आमदार, डॉ. अनिल बन्हाडे माजी आमदार डॉ. देवीसिंह शेखावत, माजी आमदार श्री. हरिश मानधना

काही उच्च पदस्थ अधिकारी

डॉ. एम. एम. वानखेडे, अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबईण डॉ. के. जी. देशमुख, माजी सभासद महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई माजी कुलगुरु, अमरावती विद्यापीठ अमरावती. न्यायमूर्ती श्री जी. जी. भोजराज, हायकोर्ट जज, श्री. एल. एन. बोंगीरवार, माजी कुलगुरु . पंजाबराब कृषी विद्यापीठ, अकोला. श्री. पी. जी. गबई, आयुक्त, नागपुर विभाग श्री. एम. जी. गवई, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, महाराष्ट्र राज्य मुंबई. श्री. आर. एल. भीगे, डेप्युटी इन्सपेक्टर उसल ऑफ पोलिस, इंटेलिजन्स महाराष्ट्र राज्य, मुंबई. श्री. एस. एस. जोग, अॅडिशनल कमिश्नर ऑफ पोलिस, महाराष्ट्र मुंबई श्री. एस. जोशी, जिल्हाधीय, कोल्हापूर, श्री. डी. डी. राऊळकर, असिस्टंट पोस्ट मास्टर जनरल, मुंबई श्री. डी. एस. सपकाळे, डायरेक्टर ऑफ पोस्ट ऑफिसेस, मुंबई, श्री. बी. व्हि. जोशी, डिव्हिजनल सुपरिटेंडेंट सेन्ट्रल रेल्वे, झांशी, श्री. के. के. मोघे, सचिव, शिक्षण विभाग, महाराष्ट्र

राज्य मुंबई श्री. मन्जुल अमीन, स्टेशन डायरेक्टर, आकाशवाणी, जयपुर. श्री. व्ही. के. सेठ, आय.एफ.एस. इंडस्ट्रियल अॅडव्हयसर (फॉरस्टस) म.प्र. औद्योगीक विकास निगम भोपाळ श्री. एन. आर. बनसोड, डायरेक्टर (फायनान्स) हाऊसिंग अॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. दिल्ली श्री. डी. एच. कुळकर्णी, प्रिन्सिपॉल, फॉरेस्ट कॉलेज, डेहराडून, श्री. एच. बी. मुनशी सेल्स टैक्स कमिश्नर(सेवानिवृत्त) महाराष्ट्र राज्य, नागपूर, श्री. के. एच. काटेकर, डायरेक्टोरेट ऑफ फील्ड पब्लिसिटी मिनिस्ट्र आफ इन्फरमेशन, भारत सरकार, श्री. डब्ल्यू के अलमेलकर, जिल्हा व सत्र न्यायधीश, आणि सभासद, औधोगिक न्यायलय महाराष्ट्र राज्य, नागपूर, श्री. आर. एन. बोंगीरवार, जिल्हा व सत्र न्यायधीश श्री. एस. जी. ओक, जिल्हा व सत्र न्यायधीश, श्री. जे. वाय. देशमुख, जिल्हाधीश ( सेवानिवृत्त) महाराष्ट्र राज्य, अकोला. श्री. एम. एस. देशमुख, जिल्हाधीश (सेवानिवृत्त) महाराष्ट्र राज्य, नागपुर श्री के. के. देशमुख, जिल्हाधीश (सेवानिवृत्त) • महाराष्ट्र राज्य, अकोला. श्री. भगवंतराव सातारकर, जिल्हाधीश, महाराष्ट्र राज्य, नागपूर ,श्री. एस. व्हि. उपाध्ये ( डी. सी. पी. दिल्ली ) श्री. व्ही. एन. देशमुख, (डि.सी.पी. मुंबई), श्री. विक्रम बोके (एस. पी. वाशिम), श्री. एस. व्ही. जोशी ( सचिव, कृषी आणि दुग्धव्यवसाय), श्री. प्रदीप धारकर ( डे. डायरेक्टर, एज्युकेशन) श्री. एच. रहमान (डे. डायरेक्टर, एज्युकेशन) श्री. अखतर आबीदी, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, मुंबई, श्री. विनय दक्षिणदास (डे. डायरेक्टर एज्युकेशन ) श्री. डॉ. व्ही. ए. काळपांडे ( डायरेक्टर, बालभारती, पुणे ) श्री. विलास बर्डेकर ( आय. एफ. एस), श्री. बानुबाकोडे (आय. एफ. एस.) श्री. मोहन राठोड (एस.पी.बीड) डॉ. बी. आर. बाघमारे (डे. रजिस्ट्रार परिक्षा नियंत्रक, अमरावती विद्यापीठ) कै. दादासाहेब काळमेघ (माजी कुलगुरु, नागपूर विद्यापीठ नागपूर) श्री. नईमोद्दीन ताजी ( अ. कमीश्नर. से.टे. नागपूर ) डॉ. जी. व्ही. पाटील ( माजी कुलगुरु, अमरावती विद्यापीठ) श्री. ख्वाजा मसरूर अहमद (एस.डी.ओ.) श्री. जोशी (आय.पी.एस)

साहित्यिक

श्री. विश्राम बेडेकर, श्री. पद्माकर निमदेव, प्रा. म.प्र. मोहरील, श्री विद्याधर गोखले. श्री. श्रीकांत राय, श्री. ना. आगाशे, प्राचार्य राम शेवाळकर, प्रा. मधुकर केचे, श्री. सुरेश भट, प्रा. देवीदास सोटे, नुरुल जैन अली, जका सिद्दीकी, इकबाल अहमद खान, प्रा. प्रभा गणोरकर, प्रा. नारायण कुळकर्णी कवठेकर, प्रा. अशोक थोरात, प्रा. अनुराधा बन्हाडे, सुलभा हेर्लेकर, प्रा. प्रतिमा इंगोले, डॉ. श्रीकांत तिडके, प्रा. अरुण साधू, जोगींदर कौर महाजन, बबन सराडकर, आशा कर्दळे,डॉ. सै. नईमोरीन इत्यादी.

शिक्षणतज्ज्ञ व संशोधक

डॉ. व्ही. एम. डोक्रस, प्राचार्य, विश्वेश्वरय्या रीजनल कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग, नागपूर, डॉ. रा.ना. भवाळकर, प्रा. आणि विभागप्रमुख (सेवा निवृत्त) पदार्थ विज्ञान विभागए, सागर विद्यापीठ, साग,र डॉ. अ.ना. देशपांडे, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, मराठी विभाग, नागपूर विद्यापीठ, नागपूर डॉ. एम. एम. महाला. प्राध्यापक आणि पदव्युत्तर अध्ययन संशोधन विभाग प्रमुख रसायनशास्त्र, जिवाजी विद्यापीड स्वाल्हेर डॉ. के. के. खातु, अर्बन जिऑग्राफर ऑपरेशन्स सर्व ग्रुप डिव्हिजन ऑफ साराभाई टेक्निकल डेव्हलपमेंट सिंडिकेट प्रा.लि. बडोदा डॉ. एस. एस. उत्तरवार, सीनिअर टेक्निकल ऑफिसर () मेरूण हैदराबाद श्री. जी. एस बामनाचार्य, सांटिफिक ऑफिसर आयसोटोप डिव्हिजन, भाभा अॅटोमिक रीसर्च सेंटर, ट्रॉम्बे, मुंबई डॉ. दत्ता धर्माधिकारी (निरी) डॉ. व्ही एस जामोदे ( विभाग प्रमुख रसायनशास्त्र विभाग, अमरावती विद्यापीठ, अमरावती) डॉ. यु. एस चौधरी ( विभाग प्रमुख, वनस्पतिशास्त्र विभाग, अमरावती विद्यापीठ) डॉ. एच. एम. मेश्राम आय. आय. सी. टीण हैद्राबाद) डॉ. व्ही. एल. बकाले ( संचालक, विज्ञान संस्था, नागपूर) डॉ. शेषराव सूर्यवंशी ( संचालक, विज्ञानसंस्था, मुंबई) लषकरी अधिकारी, श्री. त्याबद्दल क्षमस्व! एम. एस. देवस्थळे, श्री. ए. आर. मावळंकर, श्री. सुशील प्रसाद,श्री. सी. एम. सगणे, श्री. पी. बी. गुर्जर, श्री. आर. टी. शहाणे, श्री. डी. एस. जोग, श्री. एस. एम. देव, श्री. व्ही. पी. साठे, श्री. ए. व्ही. मो श्री. ए. टी. ठाकुर, श्री. एस. एम. उबगडे, श्री. एस. आर. करकरे के श्री चंद्रकांत पाठक, श्री. अ.भ. देवघरे, श्री. आनंद साठे, श्री. विष्णू डोंगरे, श्री. अरुण मोघे, श्री. अरविंद प्रभूदेसाई, श्री. श्रीकांत जोशी, श्री. अरु जोशी, श्री. अरुण देऊसकर, श्री. विजय देऊसकर, के. आर. पी. जोशी, के श्री. भैय्या बोधनकर, श्री. जयंत सोमण

…………………………………………..

प्रख्यात साहित्यिक विश्राम बेडेकर यांच्या आठवणीतील महाविद्यालय

महाविद्यालयाची इमारत पुरी होत आली, तेव्हा गावातली मुले ती बघायला जात. प्रसिद्ध क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचे खेळातील भिडू व जिवलग मित्र श्री. नरूभाऊ यांनाही ही इमारत पहायला जावे असे वाटले. परंतू त्या बेळी दारा-खिडक्यांना काचा लावण्याचे काम सुरु असल्याने कुणालाच आत प्रवेश नव्हता. त्यामुळे चौकीदाराने अडविले. त्यावर नरूभाऊ ऐटीत म्हणाले, ” अरे मी दोन महिन्यांनी या कॉलेजमधे येणार आहे. ” त्यावर चौकीदार म्हणाला, “शादी से पहले बहू देखने आये है । अभी बाहर खड़े होके मूँह देख लिजिए। शादी होगी तब जितना चाहो ठीकसे देखते बैठना । “

● महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य टॉस्टेव्हिन अतिशय शिस्त प्रिय व हजर जबाबी होते. निरुद्देश इकडेतिकडे भटकणाऱ्या विद्यार्थ्यांना ते हटकीत असत. असेच एकदा एकाला हटकून ते म्हणाले, ” कुठे उडाणटप्पूपणा करतो आहेस ? ” त्यावर तो विद्यार्थी मोठया दिमाखाने उत्तरला, “सर, मी मासिक परीक्षेत तुमच्या पेपरमधे पहिला आलो आहे !” त्यावर टॉस्टेव्हिन चटकन् म्हणाले. ” others are fools. ” It is not because you are clever. But because the

● महाविद्यालयातील एक प्रोफेसर, श्री. मुखर्जी हे देशबंधू’ चित्तरंजनदास यांचे जामात होते. दास आपल्या कन्येस भेटावयास आले की सायन्सच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मिठाई खाण्यास बोलावीत. पंक्तीत मुले उघडपणे चळवळीच्या, देशभक्तीच्या, स्वातंत्र्याच्या आणि टॉस्टेव्हिनच्या अरेरावीच्या गोष्टी बोलत.

●महाविद्यालयाची लायब्ररी होती चिरेबंदी, ऐसपैस, मोठाली दारे आणि खिडक्यांची! त्यांच्या असंख्य काचा रोज साफ पुसलेल्या, धुतलेल्या, सकाळी बाहेरच्या व्हरांडयातून धावत बागडत आलेले ऊन जणू त्या काचांना बिलगे. त्या झळाळून जात. सकाळचा सूर्य जणूअगणित अल्लाउद्दिनचे दिवे तिथे उगाळीत बसला आहे! काचेच्या कपाटात पुस्तके अल्लाउद्दिनचे लाड पुरविणाऱ्या राक्षसासारखी! पण हे राक्षस सुंदर होते. त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी कव्हरांचे कपडे. त्यावर सुंदर चित्रांची नक्ष्यांची, बेल-बुट्ट्यांची जागजागी गोंदणे, छातीवर, डोक्यावर सोनेरी अक्षराची पदके आणि शिरपेच ही पुस्तके म्हणजे शब्दकळेची नवी दृष्टी देणारी, कल्पनेच्या बागेतली काळया चाफ्याची फुले !

(स्त्रोत ‘एक झाड दोन पक्षी’-विश्राम बेडेकर)

…………………………………..

(माहिती संस्थेच्या अमृत महोत्सवी विशेषांकातून साभार)