तू आणि ती…

-डॉ मंजुषा वाठ- झगडे

मला तू दिसतेस

 स्वतःच्या नटण्या मुरडण्यात किती तास आणि त्याचा पैसा  पार्लरमध्ये  घालवताना

 कुठल्याही साध्याच्या कार्यक्रमासाठी निवांत निखळ आनंद लुटताना. 

मनापासून फार नसल्या तरी लुटूपुटूच्या  मैत्रिणी करून तोंडाचे चंबू केलेले फोटो अपलोड करताना

 कुठलेही वाचन पुस्तक यांना जवळ फिरकू न  देता तो ऑफिसला गेला की मस्त ताणून देताना. 

संध्याकाळी नीट  घर आवरून प्रसन्न चेहऱ्याने तयार होऊन त्याच्या समोर जाताना 

किती सुंदर ,घरगुती, सर्वांचं करणारी म्हणून तुझ्याकडे त्याने  एक लडिवाळ कटाक्ष टाकताना.

 पार्टी समारंभ सहल कुठलेही कष्ट न करता मनमुराद आनंद लुटताना

साधा सर्दी पडसा ताप  आला तरी डोक्यावर पांघरून घेऊन दिवसभर कौतुक करून घेताना .

मुलांच्याही अभ्यासात फारसे डोकं न घालता त्यांना ट्युशन लावून मोकळ होताना

कुणी चंद्रावर गेलं काय कोणी ऑलम्पिक मध्ये जिंकला काय कुठलाही तणाव न घेता निवांत जगतांना.

तीही मला दिसते

घर आणि नोकरी करताना कितीतरी अग्नी दिव्य सहज पार करताना

बिना वेळापत्रकाच्या आणि पूर्व सूचना नसलेल्या अनंत परीक्षा दररोज देताना

झालेल्या जखमांच्या लवकरात लवकर मलमपट्टी करून हसत हसत उभे राहताना

सर्दी, पडसा, ताप तर सोडा प्रसुतीचं ,आजारपणाचं   कौतुक बाजूला करीत सहज वावरताना

शरीराचं आणि मनाचं अवघडले  पण बाजूला सारत परत नव्या दमान बाहेरच्या जगात स्वतःला सिद्ध करताना

नोकरीत झालेही खच्चीकरण तरीही तणाव्यविरहित चेहऱ्याने परत सिद्ध  होताना

आणि  हो नोकरीतले तणाव घरी न  दाखवता घराचे स्वास्थ्य जपताना

मुलांच्या  प्रगतीत सोबत करता करता बापापेक्षा तुम्ही  मुलांना  बोचताना

बाभळीचे काटे नसतील हल्ली पण मोहक गुलाबाची काटी  हळुवार बाजूला सारताना.

मेनोपोजमुळे आलेली चिडचिड बंड हे तुमच्या एकटीच द्वंद 

म्हणून स्वतःशीच झगडताना.

स्वतःला सुपर वुमन म्हणून सिद्ध करता करता घर आणि नोकरी अशी तारेवर कसरत करताना. 

तुझी  नवीन पिढी मात्र दिसत नाही  हल्ली या भावनिक गुंताऱ्यात पडताना.

तू अपडेट होत गेलीस परंतु  समाजाचे  जुने सॉफ्टवेअर दिसत नाही अपडेट होताना. 

अजूनही दिसतात भोवताली सारे तुम्हा दोघींकडून सारख्याच

 अपेक्षा ठेवताना

तरीही तू दिसतेस फाईल मध्ये डोकं घालताना विमान चालवताना, 

मोठमोठी भाषणे देताना,

कार्पोरेट जगात उच्च पदावर चमकताना, राजकारणात स्वतःला सिद्ध करताना .

कितीही उंच गेलीस तरी पिल्लांकडे सतत एक नजर ठेवताना .

स्वतः सोबतच घराला ,समाजाला, पर्यायाने देशालाही एका उंचीवर नेऊन ठेवताना                           

प्रत्येक दिवसच तसा तुझा  तरीही आनंद होतोय तुला महिला दिनाच्या शुभेच्छा देताना.

(कवयित्री अमरावतीच्या शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेत अधिव्याख्याता आहेत)                       9423424710

Previous articleसावित्रीबाईं फुले यांच्या शिक्षिका- सिंथिया फरार
Next articleमिशन एआय: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चित्तथरारक विश्‍वात
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.