इज इट अबाउट जेंडर ऑर इज इट अबाउट पॉवर?

-उत्पल व्ही . बी .

गांधीजी : बातमी फारच इंटरेस्टिंग आहे रे…
मी: कुठली?
गांधीजी : कलम ३७७ संदर्भात ज्यांनी बरंच काम केलं त्या दोघी वकील मुली एकमेकींबरोबर आहेत. दे आर अ कपल…
मी : हो. पण काय हो? तुम्हांला धक्का नाही बसत का या नवीन रिलेशन्समुळे?
गांधीजी : म्हणजे?
मी : म्हणजे तुम्हांला हे सवयीचं नाही ना…
गांधीजी : हो, खरं आहे. पण तुला तरी कुठे सवयीचं होतं?
मी : हो, पण…
गांधीजी : पण तू आजच्या काळातला आहेस, मॉडर्न आहेस आणि मी जुन्या काळातला आहे वगैरे वगैरे…राइट?
मी : मला तसं नव्हतं म्हणायचं…
गांधीजी : गडबडतोस कशाला? मी गंमत केली. मी जुन्या काळातला आहे हे बरोबरच आहे. तू माझ्या खांद्यावर बसला आहेस. त्यामुळे तुला पुढचं दिसणारच.
मी : राइट…दॅट्स कूल.
गांधीजी : पण काय रे, माझ्या मनात एक विचार आला.
मी : कुठला?
गांधीजी : आता दोन पुरूष, किंवा दोन स्त्रिया एकत्र राहिल्या तर मग जेंडर बेस्ड विश्लेषण नाहीसंच होईल का?
मी : म्हणजे?
गांधीजी : म्हणजे असं बघ की स्त्री-पुरूष संबंधांचं विश्लेषण पुरूषप्रधान व्यवस्थेच्या बॅकग्राउंडवर होतं तेव्हा स्त्रीचं शोषण ती स्त्री आहे म्हणून होतं हा जेंडरचा अँगल येतो. बरोबर?
मी : बरोबर.
गांधीजी : मग दोन स्त्रिया एकत्र राहिल्या तर जेंडरच्या अँगलचं काय होईल?
मी : त्यावर लगेच तर काही सांगता येणार नाही. कारण अशा व्यवस्थेत त्या दोघींमध्ये किंवा त्या दोघांमध्ये स्त्री -पुरूषांमध्ये जे घोळ होतात तेच घोळ होतात का हे कळायला काही काळ जावा लागेल.
गांधीजी : हं…
मी : पण आता दोघी एकत्र आल्या किंवा दोघे एकत्र आले की काहीतरी घोळ व्हायची शक्यता असतेच. शेवटी दोन माणसं एकत्र आली की काही ना नाही चकमक उडणारच…
गांधीजी : बरोबर. मग मला एक बेसिक प्रश्न पडतोय…
मी : कुठला?
गांधीजी : इज इट अबाउट जेंडर ऑर इज इट अबाउट पॉवर? म्हणजे दोन स्त्रिया एकत्र राहत असतील आणि एकीने समजा दुसरीला त्रास दिला तर तिथे जेंडरचा मुद्दा येणार नाही. फक्त पॉवरचा येईल.
मी : हं…आणि दोन पुरूष एकत्र राहत असतील तरी फक्त पॉवरचा मुद्दा येईल.
गांधीजी : मग एक स्त्री आणि एक पुरूष एकत्र असतील तर पुरूषाकडे आणि स्त्रीकडे जेंडरच्या चष्म्यातून का बघायचं? पॉवरफुल आणि पॉवरलेस माणूस असं का नाही? मग ती स्त्री असो किंवा पुरूष. म्हणजे मग स्त्री स्पेसिफिक किंवा पुरूष स्पेसिफिक असं विश्लेषण कायम न होता किंवा तसे ग्रुप्स न पडता प्रॉब्लेम स्पेसिफिक विश्लेषण जास्त होईल….आणि ते कदाचित अधिक बरं होईल एकूणात.
मी : हं…
गांधीजी : गप्प झालास…
मी : प्रश्न चांगला आहे.
गांधीजी : उत्तर?
मी : अवघड आहे.
गांधीजी : बरं. विचार कर. तोवर मी आपल्यासाठी कॉफी करतो.
मी : टोटल ब्लॅक.
गांधीजी : बरं.


-9850677875

Previous articleप्रेम …पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास
Next articleफेल्युअर कोणाचं?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.