त्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय, जीवतंत्रज्ञान मंत्रालय यांचे सचिव, आयआयटी दिल्लीचे संचालक, प्रा. व्ही. रामगोपाल राव, आयआयटीचे ग्रामीण तंत्रज्ञान केंद्राचे संचालक प्रा. व्ही. के. विजय, कौन्सिल फॉर सायन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि यांच्या मांडीला मांडी लावून असणार आहेत, रास्वसंघ आणि विहिंप प्रणीत विज्ञानभारती आणि गो विज्ञान अनुसंधान केंद्राचे तीन सदस्य. शिवाय संघसंचालित ‘विज्ञानभारती’चे संचालक-‘परम’वैज्ञानिक डॉ. विजय भटकर या समितीचे सहअध्यक्ष आहेत.
राज्यकर्त्यांच्या मर्जीवर झुलण्याची गरजही संपली अशा वयात असूनही, आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेली असूनही डॉ. रघुनाथ माशेलकरांसारखे वैज्ञानिक या साऱ्या सर्कशीत सहभागी होत आहेत, हे दुस्सह आहे. खरे तर हीच वेळ होती, सडेतोड प्रश्न विचारण्याची; हीच वेळ होती, छद्मविज्ञानाचा वापर शस्त्रासारखा करू पाहणाऱ्या राज्यकर्त्यांना सडकून काढण्याची. परंतु, हळदीघाटाची लढाई लढणारे म्हणून प्रसिद्धीस आलेले हे थोर वैज्ञानिक निराशा करीत आहेत, हे नक्की.
मुग्धाताई, खूप सूंदर….. सत्यनिष्ठ, निर्भीड, निस्पृह लेखन. लिंबु मिर्ची टागणारे, कुंडल्या काढूण घेणारे, गाईचे मृत्र पिणारे, वैज्ञानिक या देशाचे वाटोळे करायला निघालेले दिसतात……गाईच्या पंचगव्यात शेणही आले म्हणजेच स्वत: ‘शेण खाणारे’ आता सर्वांना ‘शेण खाण्या’ करीता आवाहन करताहेत…..किती ही शोकांतिका……. वैज्ञानिकांकडून या अपेक्षा नव्हत्या….. पण….. असो…. आपण सडेतोड व सत्य लिहून या विषयाची यथोचित चिरफाड केली…..
आपले धन्यवाद……. अन् “मिडीया वाॅच” चेही विशेष आभार…..