या ‘अपराधभावाला’ नकार ‘पारोमा’ सिनेमाचा मुख्य विषय आहे. एका श्रीमंत, कुलीन व सुखवस्तू कुटुंबातील गृहिणीने एका तरुणावर केलेले प्रेम आणि त्यात स्वतःला झोकून देणे, हा तिच्या अवतीभवतीच्या लोकांना अपराध वाटणे स्वाभाविक आहे. म्हणून तिच्या मनात ‘अपराधभाव’ असलाच पाहिजे असे ते गृहीत धरतात. आणि जणू काही तिचा तो अपराध मोठ्या मनाने ते पोटात घालू इच्छितात, म्हणून डॉक्टर तिला सुचवतात तिने मानसोपचार घ्यावे आणि पुन्हा ‘गृहिणी’ म्हणून कुटुंबाची सेवा करावी.
अतिशय सुंदर सिनेमा. तितकेच सुंदर लिखाण.
या सिनेमाच्या बाबतीत एक अभिमानास्पद कौतुक आहे. ‘परोमा’नंतर जवळजवळ दहा वर्षाने आलेल्या, ब्रिजेस ऑफ मॅडीसन काऊन्टी, या हॉलीवुडपटावर परोमाची सुखद सावली आहे. नायिका गृहिणी, नायक फोटोग्राफर आहे. पण ती मेरील स्ट्रीप असल्यामुळे कॅरेक्टर कुठल्याकुठं नेलंय तिनं. राखी ही बाई माझ्यामते बथ्थड आहे. असो. लेख मस्त झालाय.