झुगझ्वँग आणि एको चेंबर्सचा घोळ

-संदीप गोडबोले

झुग्झ्वँग हा रशियन शब्द बुद्धिबळात वापरला जातो. त्याचा अर्थ ज्याची चाल खेळण्याची पाळी आहे त्याला चालीचे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. तिसरा पर्याय नाही.
एक निर्णय घेतला तर विनाश अटळ आहे.
दुसरा घेतला तर महाविनाश सुनिश्चित.
दोन पैकी कोणतीही चाल चेक मेट टाळू शकत नाही. अशावेळी चेसमध्ये रिझाईन हा पर्याय निवडता येतो. हार मान्य करायची; खेळ समाप्त.

देशाच्या बाबतीत हा रिझाईनचा पर्याय नसतो.

एको चेंबर्स
भौतिक शास्त्रात आवाजाचा अभ्यास करण्यासाठी प्रतिध्वनीखोल्या बनवतात.
जो स्वर उच्चारला त्याचे प्रतिध्वनी निर्माण होतील असे चेंबर्स. हे चेंबर्स साऊंडप्रूफ असणे अनिवार्य असते.
अर्थात या चेंबर्समध्ये बाहेरील आवाज आत येऊ नये अशी व्यवस्था असते. असे झाले तर मुख्य आवाजाच्या प्रतिध्वनीत बाहेरील आवाजाचे प्रतिध्वनी भेसळ करू लागतात. त्यामुळे आतील निर्धारित शक्ती क्षीण होते. निरर्थक कलकलाट निर्माण होतो. दुधात मिठाचा खडा.

आतील रव बाहेर गेला तर आतल्या आवाजाच्या शक्तीचा ऱ्हास होतो व बाहेर राईचा पर्वत. दुधात विरजण.

दोन्ही पैकी काहीही झालं तरी अपेक्षित सुसंगती उर्फ हार्मोनी कोलमडते.

मूळ आवाजाची क्षीण होत जाणारी नक्कल चेंबर च्या आतील श्रोत्यालाच ऐकू जाईल असेच प्रतिध्वनी आले पाहिजेत असे अपेक्षित असते. एखाद्या श्रोत्याने मधेच काही तरी बेसूर स्वर आळवू नये हा दंडक असतो. अर्थात श्रोत्याने मौन रहाणे हा शिस्तीचा भाग असतो.
( हल्ली नावडत्या प्रक्षेपकामुळे व त्याच्या म्हणण्याकरता श्रोत्यांनी शिस्त पालन करणे हे प्रक्षेपकावर फॅसिस्टचा शिक्का मारण्याचे अगदी नैसर्गिक कारण बनते. तसेच आवडत्या प्रक्षेपकाचे ध्वनी तरंग निमूटपणे ऐकून मूक श्रोता बनले तर देशभक्तीचे प्रशस्तीपत्रक चेंबरच्या इतर सदस्यांकडून मिळते जे अगदी तितकेच नैसर्गिक आहे.)

प्रत्यक्ष जीवनात संपर्क माध्यमातून दळणवळण यंत्रणेतून माहितीची देवाण घेवाण करणाऱ्या दृश्य आणि अदृश्य कम्युनिकेशन एको चेंबर्स ची क्लिष्ट आडवी,उभी, तिरपी, सिरीज व समांतर अशी अफाट उतरंड असते.
जगातील प्रत्येक व्यक्ती एकाच वेळी अनेक
कम्युनिकेशन एको चेंबर्सचा सदस्य आहे.
प्रत्येक कम्युनिकेशन एको चेंबर चा विशिष्ट उद्देश असतो. किती व कोणती माहिती प्रत्येक कम्युनिकेशन चेंबर च्या आतून बाहेर किती दूर, किती वेळ व कोणापर्यंत जावी याच्या मर्यादा नियंत्रित असायला लागतात.
तसेच चेंबरच्या आत येणारी माहिती कुठल्या स्रोतातून यावी, किती यावी ,कोणत्या वेळी यावी याचे पण नियंत्रण असणे अपेक्षित आहे.
फेसबुकचे प्रायव्हसी सेटिंग व एखाद्याला ब्लॉल हणणे हे या एको चेंबर्सच्या नियंत्रण योजनेचा भाग आहे.

एकाच माहितीचे असंख्य भिन्न व विचित्र विपरीत अर्थ काढण्यावर मानवी मेंदूचे नियंत्रण नसते. त्यामुळे पराचा कावळा होत असतो. ध चा मा होतो. राईचा पर्वत होतो.
कुजबूजीचा कोलाहल तयार होतो.

संपर्क योजनेत (कम्युनिकेशन सिस्टम)
मध्ये उद्घोषक आणि श्रोते यांच्यात माहितीचा प्रवाह थेट व सरळ असला तर आदर्श परिणामकारकता साधली जाते.
गल्लीपासून न्यूयॉर्क टोकियो दिल्लीपर्यंत नेते मंडळी आपल्या स्वतःचे कम्युनिकेशन एको चेंबर जाणीवपूर्वक बनवत असतात.
जितकी व्यक्ती लोकप्रिय व मोठ्या अधिकाराची, तितकी त्याच्या एको चेंम्बरचा आकार व संख्या मोठी असू शकते.
या सर्व एको चेंबर्सची मूलभूत वैशिष्टय असे की त्यांच्या Admin ला जे आवडते तेच पठण केले जाते.

व्यक्ती विशेष सध्या मोदी असल्याने त्यांच्या एको कम्युनिकेशन चेंबर मधील खालील ठळक
वैशिष्ट्ये
1. अबकी बार मोदी सरकार :एको चेंबर चा पाया
2.हर हर मोदी घर घर मोदी : एको चेंबर च्या भिंती
3.मन की बात : एको चेंबर चे विधिवत उद्घाटन
4. सवासो करोड पासून 135 करोड पर्यंत वाढलेले भारतीय एको चेंबरचे श्रोते.
5. आंतरराष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारताचे देश म्हणून एक एको चेंबर म्हणून असलेले इतर सर्व देशांसारखे जागतिक अस्तित्व
जोपासण्यासाठी हाउडी मोदी, वेलकम ट्रम्प , जीन पिंग सोबत साबरमती अवलोकन सारख्या कार्यक्रमातून एका बलदंड व सशक्त वैश्विक एको चेंबर चा चालक व उद्घोषक अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली.
6. अपवाद म्हणून देखील एकही खुल्लम खुल्ला पत्रकार परिषद न घेणे.
एको चेंबर मध्ये बेसूर प्रतिध्वनी गुंजत रहाणार नाहीत याची पूर्ण दक्षता.
(ट्रम्प उठता बसता रोज खुल्लम खुल्ला पत्रकार परिषद घेत स्वतःचे हसू करून घेतो)

7. मोदींचे उघड व छुपे पाठीराखे, उघड व छुपे विरोधक, लालफितीने चालणारी प्रशासन यंत्रणा, कूर्मगतीने चालणारी न्याय व्यवस्था
या सर्वां र नियंत्रण ठेवण्या साठी अमित शहा ( फक्त उदाहरण व अन्य अनेकजण) या अत्यंत जवळच्या सहकाऱ्याचे शिस्तबद्ध मौन हे एको चेंबरमध्ये चुकून सुद्धा प्रदूषण होऊ नये म्हणून घेण्यात येणारी डोळ्यात तेल घालून घेतलेली दक्षता आहे.

तर या घडीला सर्वात मोठा व सशक्त कम्युनिकेशन एको चेंबर मोदींचा आहे पण तो एकमेव अजिबातच नाही.
कोरोनाचे थैमान सुरू असलेल्या दिवसांमध्ये 135 करोड व्यक्तींचे स्वतःचे एको चेंबर्स देखील आहेत. त्यासोबत या सर्व जनतेचे कौटुंबिक, व्यवसायिक,सामाजिक, आर्थिक, जातीय, धार्मिक, राजकीय,प्रशासकीय,केंद्रीय, राज्यीय,जिल्हा ते ग्राम पंचायत अश्या असंख्य प्रकारच्या कॉम्बिनेशन्स चे कम्युनिकेशन एको चेंबर्स व त्यांचे लाखो सशक्त चालक अस्तित्वात आहेत.
हे सगळे कम्युनिकेशन चेंबर्स नियंत्रणात राहिले नाही तर काय होते त्याचे प्रात्यक्षिक आपण थाळी वाजवा चे रूपांतर मोर्चे ,दिव्यांचे मशालीत,सुरतची दंगल व वांद्र्याचा लोंढा हे अराजक माजण्याचे तीव्र होत जाणारे संकेत बघत आहेत.
समाजात मानसिक अस्वस्थता निर्माण झाली की सामूहिक क्रोध वाढतो सामाजिक द्वेष उफळतो,त्याची नशा चढते,
बुद्धीनाश होऊन विनाश ओढवतो. हे सगळं होण्याचे कारण एको चेंबर्सचे अराजक.

कोरोनाच्या झुगझ्वँगमध्ये
1.लॉक डाऊनमुळे होणारे नुकसान
2. मृत्यूचे अनिर्बंध तांडव… या शिवाय तिसरा पर्याय नाही.

अशा परिस्थितीत आपापल्या एको चेंबर्सला सुव्यवस्थित लॉकडाऊन करणे एवढंच आपल्या हाती आहे.

ते सर्वांनी करावे. सुरवात स्वतः पासून.
स्वतः चे एको चेंम्बर सोडून आपण कोणकोणत्या एको चेंम्बरचे सदस्य आहोत त्याचे सज्जड आकलन करता येते. आपले लिंग, कुटुंब, जात, धर्म, भाषा, प्रांत ,आपला पक्ष, आवडत नेता, व आपल्या सर्व आवडी निवडी मुळे आपल्या नकळत आपण अनेक एको चेंबर्सचे सदस्य बनलेले असतो.

काही एकोचेंबर्स आपण जाणीवपूर्वक टाळलेले असतात.

त्यांची भीती व द्वेष असू शकतो.
त्यात तारतम्य निर्माण करणे, सद्भावना वाढवणे, भयमुक्त होणे आवश्यक आहे.

(लेखक विविध विषयांचे अभ्यासक आहेत)

९४२२१ ५६७३०/८६६८८ १६७०५

Previous articleओबीसी ह्या प्रवर्गाचे जन्मदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Next articleजगातील सर्वांत महत्त्वाची निवडणूक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here