राजस्थान हे तेथील सुस्थितीत असलेले किल्ले, भव्य राजवाडे, खाद्यसंस्कृती यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. भव्य-दिव्य राजवाडे, विस्तीर्ण वाळवंट, रंगीबेरंगी निरनिराळे उत्सव हे पर्यटकांना आकर्षित करत असतात. राजस्थान हे शूर राजपूतांचा इतिहास तसेच अनेक घनघोर लढाया, यासाठीही ओळखले जाते.
कृष्णभक्त मीरा हे नाव जवळपास प्रत्येक भारतीयाला माहीत आहे. मीरा ही राजपूत राजकन्या असूनही आपले ऐषोआरामाचे राहणीमान सोडून तिने जीवनभर कृष्णाची भक्ती केली. ती एक संत व कवी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सन्मानार्थ येथे भव्य मीरामंदिर बांधलेले आहे. विजयस्तंभाच्या जवळच राणा कुंभाचा महाल पाहायला मिळतो. अवशेषरूपी या महालाच्या जवळच राणी पद्मिनी व इतर राजपूत स्त्रियांनी जोहर केला ते ठिकाण आहे. नंतर आम्ही राणी पद्मिनीचा महाल पाहायला गेलो. या महालाच्या काही भागात सध्या भारतीय पुरातत्व खात्याचे वस्तुसंग्रहालय असून त्याचा काही भाग पाण्यात आहे. येथेच अल्लाउद्दीन खिल्जीने राणी पद्मिनीचे प्रतिबिंब पाण्यात पाहिल्याचे सांगितले जाते. हा महाल अजूनही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत इतिहासाची साक्ष देत उभा आहे. जवळपास ३ किलोमीटर क्षेत्रात बांधलेल्या या किल्ल्यामध्ये अनेक इमारती आढळतात. त्यातील काही सुस्थितीत तर काही भग्न स्थितीत पाहायला मिळतात. काही मंदिरेही येथे आहेत. या किल्ल्यात फिरताना आपल्या डोळ्यासमोर येथे घडलेला इतिहास उभा राहतो. किल्ला बघून बाहेर पडायला संध्याकाळ झाली. रात्री चितोडलाच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी हल्दीघाट पाहायला निघालो. निघताना सलीमभाईस त्यांची गाईड व वाहनाची फी विचारली तर तो म्हणाला, ‘आप दोस्त हो तो आपसे क्या लेना’, तरीपण त्यांना योग्य रक्कम देऊन आम्ही निघालो .
चितोडपासून ११० किमी अंतरावर असणारे हल्दीघाट येथे महाराणा प्रतापसिंग व अकबरचा सरदार मानसिंग यांच्यात घनघोर लढाई झाली होती. या युद्धात अकबर सेना जिंकली तरी आजही हल्दीघाटीतील लढाई ही महाराणा प्रतापसिंह व त्यांच्या चेतक नावाच्या घोड्याच्या पराक्रमासाठीच ओळखली जाते. हल्दीघाट हा भाग नावाप्रमाणेच पिवळी माती असलेला आहे. या पिवळ्या मातीवरूनच हल्दीघाट हे नाव पडले आहे. अरवली पर्वतरांगांमध्ये असलेली ही खिंड राजसमंद व पाली या जिल्ह्यांना जोडते. हल्दीघाटीकडे जेव्हा आम्ही निघालो होतो त्यादिवशी त्या भागात नुकत्याच झालेल्या एका आंतरधर्मीय विवाहामुळे त्या जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. इंटरनेटही बंद होते. जागोजागी बंदच्या खुणा दिसत होत्या. अशा परिस्थितीत परराज्यात असल्याने आम्हाला थोडा ताण आला होता. पण येथे आल्यावर या पावनभूमी च्या स्पर्शाने तो नाहीसा झाला .
Dear sir ,
One & Only online publication ,Captivating ,Keeps Spell Bound.
Range of Subjects is W~~~~~~~~~IDI.
Those Reading Fellow who love Reading ,it is Amazing.
I got a very good source through your article on Fort in Jalgaon Jamod , through Disha Whatsapp Group run by Shri Yadav Tarte Patil ,a keen Nature Lover.
Please keep me in loop & If you can post on Whatsapp ,Please do the Necessary.
Do Not Forget Me.
I am 66 ,Ex.Retired Banker & Presently stays in Navi Mumbai.
Earnest Regards ,
Arvind Tiple
Thanks a lot